Biodiversity, Wildlife Conservation & Management या विषयात समर्थने त्याचं पहिलं मास्टर्स केलं आहे. आता Conservation and International Wildlife Trade या विषयात दुसरं मास्टर्स करण्यासाठी तो लंडनमध्ये शिकतोय. मजा मस्ती करण्याच्या वयात समर्थने Archaeology, Geology आणि Anthropology मध्ये डिप्लोमा पूर्ण केले. मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये समर्थ वयाच्या तेविसाव्या वर्षी Nature Education Officer म्हणून रुजू झाला. लोकांच्या मनात Wild Life बद्दल आस्था निर्माण व्हावी यासाठी त्याने तिथे अनेक भन्नाट गोष्टी राबवल्या. खूप कमी वयात त्याने केलेले करियर चॉइसेस, अतिशय वेगळ्या वातावरणात त्याच्यावर झालेले संस्कार, नॅशनल पार्कमध्ये त्याने केलेलं काम आणि अर्थातच त्याचे स्वतःचे Wild Life Experiences अशा विविध विषयांवर नविन काळे यांनी समर्थला बोलतं केलंय. म्हणूनच हा 'wild episode' चुकवू नये असाच!
व्यवसाय अनेक जण करतात ! पण किरण भिडे यांचं वैशिष्ट्य हे की ते एकाच व्यवसायात रमत नाहीत. ते दर चार पाच वर्षांनी व्यवसायाचं क्षेत्र बदलतात. आधी जपान लाईफ मध्ये जपानी गाद्या विकल्या, मग ते ‘माधवबाग’ या सुप्रसिद्ध हेल्थ कंपनीचे सह संस्थापक आणि डायरेक्टर झाले. मग ते सोडून त्यांनी ठाण्यात मेतकूट आणि काठ न घाट ही प्रसिद्ध हॉटेल्स चालवली. त्यानंतर जुनं मराठी साहित्य लोकांनी वाचावं त्यासाठी ‘पुनश्च’ नावाचे ऑनलाईन पोर्टल चालवलं. ते financial advisor देखील झाले. (नुकतेच ते पुन्हा एकदा माधवबाग मध्ये परत गेलेत CEO म्हणून ! पण ही मुलाखत आधी रेकॉर्ड झाल्याने तो संदर्भ या मुलाखतीत नाही.
अक्षय शिंपी हा कलाकार म्हणून किती ताकदीचा आहे याची प्रचिती येण्यासाठी तुम्हाला अक्षयचं दास्ताने बडी बाका आणि दास्ताने रामजी पाहायला हवं. कुठलाही सेट नाही, संगीतसाथ नाही, प्रकाशयोजना नाही… अक्षय आणि त्याची सहकलाकार फक्त performance च्या जोरावर तुम्हाला अडीच तास खुर्चीवर खिळवून ठेवतात. पण दास्तान गोई म्हणजे नेमकं काय? उर्दू भाषेतला हा प्रयोग अक्षयला मराठीत का करावासा वाटला ? या प्रयोगात नक्की काय घडतं ? या प्रयोगाचं सगळ्यांकडून इतकं कौतुक का होतंय ? हा प्रयोग उभा करण्याची प्रोसेस काय होती? अशा अनेक गोष्टींवर नविन काळेने अक्षयशी गप्पा मारल्यात.
एक आहे, तेच झेपत नाहीये असं म्हणणारे अनेकजण आजूबाजूला असताना शुभदा सतत कार्यमग्न असते. हर्षद मेहता, मुंबई बॉम्बस्फोट अशा खूप महत्त्वाच्या केसेस मधली शोधपत्रकारिता, लोकसत्तेच्या ‘चतुरंग’ पुरवणीची जबाबदारी, मुंबई ग्राहक पंचायतचं काम, मातृभाषेतून शिक्षणाची महाराष्ट्रव्यापी चळवळ, ‘वयम्’ या लहान मुलांसाठीच्या मासिकाची संपादिका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या मुलीचे पालकत्व अशा अनेक जबाबदाऱ्या ती अत्यंत लीलया पार पाडते. या पॉडकास्टमध्ये शुभदाच्या आजवरच्या प्रवासाबद्दल गप्पा झाल्यात पण parenting या विषयावरही शुभदाची मतं ऐकण्यासारखी आहेत ! 'कार्यमग्न शुभदा'शी गप्पा मारल्यात नविन काळेने!
या पॉडकास्टचा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे - MUSIC ! आनंद सहस्त्रबुद्धे गेली पंचवीस वर्षं music नावाच्या समुद्रात दिवसरात्र डुंबत असतो. तो एक प्रसिद्ध संगीत संयोजक आहेच, पण एक उत्तम कवी, हार्मोनियम प्लेअर आणि गायक सुद्धा आहे, हे तुम्हाला आजच्या पॉडकास्टमध्ये कळेल. संगीत या विषयावर आनंद बरोबर मारलेल्या या गप्पा तुम्हाला एक अवर्णनीय आनंद देतील. आपल्याला एखादं गाणं का आवडतं? गाण्यातल्या शब्दांची जादू नक्की काय असते ? RD बर्मन, जगजीत सिंग या दिग्गजांच्या आठवणी… असं बरंच काही घेऊन येतोय तुमचा होस्ट नविन आजच्या पॉडकास्टमध्ये !