आज प्रत्येक जण मी काय नाही केलं तुझ्यासाठी म्हणंत आपले महत्त्व दाखवून देत असतात पण मला सांगा निसर्ग...भगवंत ह्यांनी कधी म्हणतात का असे..नाही ना..तेव्हा निस्वार्थ जगणे म्हणाजे काय ते ह्या अनामिक कवी ने शब्दात मांडले आहे...
काहीसं छान... ऐकावं अस वाटणारं...ही ध्वनिफीत मालिका परत एकदा आपल्या साठी घेऊन येत आहोत...
मित्र आणि मैत्र ह्यात एका इकाराचा फरक असला तरी अर्थ मात्र खूप सखोल आहे ..मैत्र म्हणजे एकरूपता हेच काय ते जीवन आंनदी करायचे रहस्य
घरात सगळी काम करता करता सगळ्यांची मन जपता जपता एक स्त्री ची किती दमछाक होते..पण काम हे काम म्हणून न बघता जेव्हा ते कर्तव्य म्हणून बघितल्या जाईल तेव्हा कशी परिस्थिती बदलते हे सांगणार आजची ध्वनिफित
आयुष्याचा आणखी एक पैलू म्हणजे समाधानकारक जगणे पण असे समाधानकारक जगण्यासाठी 'तुलना' करण्याची प्रवृत्ती सोडणे गरजेचं आहे...'ठेविले अनंते तैसे ची राहावे' आणि सुखी समाधानी आयुष्य जगावे हाच काय तो कानमंत्र..
मराठी भाषा ही किती सुंदर..अर्थपूर्ण आणि रसाळ आहे ह्याची प्रचेती ह्या लेखातून येते...शब्द आणि त्यांचे अर्थ ह्यांचा परस्पर संबंध कसा असतो तर तो त्याच्या स्थान..व्यक्ती ह्यावर अवलंबून असतो
खरंच आपण आयुष्यात ज्या गोष्टीना महत्त्व देतो त्या खरच तितक्या महत्वाच्या असतात का ?? कोणीतरी करतंय.. सांगतंय..वापरतंय म्हणून किंवा त्या गोष्टीबद्दलचा ज्ञानाचा अभाव ह्यामुळे आपण मोहित होऊन आयुष्याची गंगा मालिन तर करत नाही ना..!! सुजाण बनून समाधानी जगणे आणि स्वतःच्या आयुष्याची किंमत ओळखणे हे आज गरजेचे आहे ...
आयुष्य हे एकदाच भेटते ..पण ते जगायचे कसे हे मात्र आपल्या हातात असते. मग ते कण्हत कुथत जगायचे की आनंदात ते आपण ठरवायचे असते. परिस्थिती कशीही असो आपल्याला मात्र मनसोक्त जगता आलं पाहिजे
प्रत्येकाच्या आयुष्यात एक बॉण्ड असतो..मग तो कोणत्याही रुपात असू शकतो..हा इमोशनल बॉण्ड हृदयाचा असतो त्या साठी अंतर किती आहे ह्याचा फरक पडत नाही ...ह्यावर भाष्य करणारा हा छोटासा लेख