गोष्ट दुनियेची

<p>जगातल्या प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे दर आठवड्याला दुनियेतली एक महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.</p>

चॉकलेट उत्पादन हवामान बदलामुळे कमी होत चाललंय का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची

चॉकलेट कुणाला आवडत नाही? पण सध्या कोको आणि चॉकलेटच्या उत्पादनांच्या किंमती वाढल्याचं तुमच्या लक्षात आलं असेल. फेब्रुवारी 2024 मध्ये तर चॉकलेटच्या किंमतीनं नवा विक्रम रचला. अमेेेरिकेतत कोकोची किंमत दुप्पटीनं वाढली आणि कोको आता तिथे प्रतिटन 5874 डॉलर्सला पोहोचलं आहे. कोको उत्पादन घेणाऱ्या प्रमुख देेशांना सध्या हवामान बदलाचा सामना करावा लागतो आहेे. त्यामुळेच या किंमती वाढल्या आहेत का? प्रेझेेंटर : जान्हवी मुळेे ऑडियो एडिटिंग : तिलक राज भाटिया

05-04
16:38

भविष्यात आपण जमिनीखाली राहायला जाऊ का? BBC News Marathi

जगाची लोकसंख्या आठ अब्ज आहे आणि त्यात अर्ध्याहून अधिक लोक शहरांत राहतात. येत्या 25 वर्षांत शहरात राहणाऱ्यांची संख्या आणखी वाढेल असा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे. विशेषतः आशिया आणि आफ्रिकेतल्या शहरांमध्ये ही वाढ मोठ्या प्रमाणात दिसेल. मग शहरातली वाढती गर्दी आणि हवामान बदलामुळे वाढलेली गर्मी यांचा सामना शहरं कसा करतील? त्यावर उपाय म्हणून जमिनीखाली शहरांचा विस्तार करण्याची योजना काहीजण आखत आहेत. खरंच असं शक्य आहे का? ऐका ही गोष्ट दुनियेचीमूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया

04-12
16:45

इजिप्तमध्ये पिरॅमिड का उभारले? या प्राचीन इमारतीचं काय होणार? BBC News Marathi

इजिप्तच्या गिझामधले पिरॅमिड या देशातल्या प्राचीन संस्कृतीची भव्य प्रतीकं आहेत. पण गेल्या काही शतकांत या पिरॅमिड्सची बरीच हानी झाली. त्यात ठेवलेला खजिना लुटला गेला. पिरॅमिडच्या बाह्य पृष्ठभागाचंही नुकसान झालं. आता इजिप्तच्या सरकारनं पिरॅमिडचा जीर्णोद्धार करण्याची योजना आणली आहे ज्यावरून वाद सुरू झाला आहे. आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याविषयीच जाणून घेणार आहोत, की इजिप्तच्या पिरॅमिडचं काय होणार?मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया

04-05
16:47

'या' देशांमध्ये मुलं जन्माला घालायला पैसे मिळतात | BBC News Marathi

अनेक युरोपिय देशांमधली लोकसंख्या म्हातारी होते आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आणि लोकसंख्या वाढवण्यासाठी युरोपियन देशांनी अब्जावधींची गुंतवणूक केली आहे. पण त्यातून काही मोठा बदल होताना दिसत नाही. मग युरोप आपला घटता प्रजनन दर वाढवू शकतो का?प्रेझेंटर : जान्हवी मुळेे ऑडियो: तिलक राज भाटिया मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज

03-26
18:20

मानवी पेशींचा नकाशा का तयार केला जात आहे? BBC News Marathi

एखादी जागा कुठे आहे, हे समजून घेण्यासाठी आपण काय करतो? तर अनेकदा त्या जागेचा नकाशा पाहतो. आपलं जग समजून घेण्यासाठी नकाशांचा वापर मानवी संस्कृतीत अगदी सुरुवातीपासून केला गेल्याचं दिसतं. इतकंच नाही, तर गेल्या काही दशकांत मानवी शरीराची मूलभूत रचना समजून घेण्यासाठी नकाशे बनवले जात आहेत. मानवी जनुक कसं कार्य करतात हे समजून घेण्यासाठी, सहा देशांच्या शास्त्रज्ञांनी 1990 मध्ये मानवी जीनोम प्रकल्प सुरू केला होता. गोष्ट दुनियेची मध्ये या भागात आपण जाणून घेणार आहोत की हा ह्युमन सेल अ‍ॅटलास काय आहे? मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया

03-19
17:04

चंद्रावर मानवाला पाठवण्याची शर्यत कोण जिंकेल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

जेमतेम सहा महिन्यांच्या कालावधीत भारताच्या चंद्रयान-3 पाठोपाठ जपानचा ‘स्लिम’ लँडर आणि अमेरिकेतल्या इंट्यूटिव्ह मशीन्स या खासगी कंपनीचं ओडिसियस हे यान चंद्रावर यशस्वीरीत्या उतरलं. सध्या वेगवेगळ्या देशांमध्ये चंद्रावर जाण्याची आणि माणसाला पुन्हा चंद्रावर नेण्याची चुरस रंगलेली दिसते आहे. हा सगळा खटाटोप कशासाठी सुरू आहे?मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया

02-29
18:09

रशिया युक्रेन युद्धापासून उत्तर ध्रुवावर संघर्ष का पेटला? BBC News Marathi

जगभरातल्या काही महत्त्वाच्या आणि रंजक गोष्टी, ज्यामुळे तुमचं विश्व होईल अधिक समृद्ध

02-23
17:47

सरगॅसम या सागरी शैवालाचं आव्हान आपण कसं सोडवणार? BBC News Marathi गोष्ट दुनियेची

1492 सालची गोष्ट. अटलांटिक महासागरात प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस आणि त्याच्या सहकाऱ्यांसमोर अचानक एक मोठं संकट उभं राहिलं, ज्याची त्या दर्यावर्दींनी कल्पनाही केली नव्हती. त्यांच्या जहाजासमोर मैलोनमैल दूर दाट शेवाळ पसरलं होतं. आपलं जहाज त्यात अडकून बुडणार तर नाही ना, अशी चिंता त्या खलाशांना सतावत होती. आता पाचशे वर्षांनंतर पुन्हा एकदा तेच सरगॅसम नावानं ओळखलं जाणारं लाखो टन सागरी शैवाल जगासमोर मोठं आव्हान म्हणून उभं राहिलं आहे. मोठ्या प्रमाणात हे सागरी शैवाल कॅरेबियन बेटांवर आणि अमेरिकेतील फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर पोहोचतंय. त्यामुळे तिथल्या रहिवाशांच्या आरोग्याला आणि अर्थव्यवस्थेलाही धोका निर्माण झाला आहे. हे सरगॅसमचं आव्हान काय आहे, याच प्रश्नाचं उत्तर आपण गोष्ट दुनियेचीमध्ये आज शोधणार आहोत. मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज

02-09
15:35

टोयोटानं खरंच इलेक्ट्रिक कार बॅटरीचा प्रश्न मिटवलाय का? BBC News Marathi

ऑक्टोबर 2023 मध्ये जगातल्या सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी टोयोटानं दावा केला की ते लवकरच इलेक्ट्रिक कार्ससाठी एक अशी बॅटरी बनवणार आहेत जिच्यावर गाडी 1200 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कापू शकेल. इतकंच नाही, तर ही बॅटरी फक्त दहा मिनिटांत रिचार्ज होऊ शकेल. टोयोटा कंपनीचे प्रमुख कोजी साटो यांनी टोकियोमध्ये ही घोषणा केली, ते म्हणाले की हा इलेक्ट्रिक कार्ससाठीच नाही तटोयोटानं खरंच इलेक्ट्रिक कार बॅटरीचा प्रश्न मिटवलाय का? गोष्ट दुनियेचीमध्ये या भागात आपण याचंच उत्तर शोधणार आहोत.र वाहन उद्योगासाठी एक मोठा क्रांतिकारी शोध आहे.

01-30
17:01

पॅरिस ऑलिंपिक 2024 च्या आयोजनासाठी तयार आहे का?

2024 मध्ये जगातला सर्वात मोठा क्रीडा सोहळा अर्थात ऑलिंपिकचं आयोजन फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये केलं जाणार आहे. त्यासाठी शहरात तयारी सुरू आहे. पण पॅरिसच्या सीन नदीचं प्रदूषण, मेट्रो लाईन्सचं अर्धवट काम आणि राजकीय आंदोलनं अशा गोष्टींचं आव्हान आयोजकांसमोर आहे.

01-09
17:06

2024 मध्येही वर्क फ्रॉम होम सुरू राहील का? BBC News Marathi

कोव्हिडच्या जागतिक साथीनंतर करोडो कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम ही सामान्य गोष्ट बनली होती. साथीच्या तीन वर्षांनंतर अनेक कर्मचारी आता ऑफिसात परतले आहेत, पण काही क्षेत्रांमध्ये अजूनही कर्मचारी घरून काम करण्याला प्राधान्य देत आहेत. तर कंपन्या आता आपल्या कर्माचाऱ्यांना ऑफिसमध्ये परतण्याचा आग्रह करताना दिसत आङेत. अर्थात प्रत्येक देशात परिस्थिती वेगळी आहे. मग आता यापुढच्या काळात कामाचं स्वरूप कसं असेल? ‘वर्क फ्रॉम होम’मुळे खरंच काम होतं का

01-01
14:49

मायग्नेन - डोकेदुखीच्या या प्रकारावर खरंच 'हे' औषध काम करेल का? BBC News Marathi

सप्टेंबर 2023 मध्ये युनायटेड किंग्डम म्हणजे युकेनं एक घोषणा केली, जी फक्त युकेच नाही तर कदाचित जगभरातच लोकांच्या आयुष्यात खूप मोठा बदल आणू शकते. युकेमधली नवीन औषधांना मंजुरी देणारी संस्था नॅशनल हेल्थ अँड केअर एक्सलंस अर्थात NICE ने तेव्हा एका नवीन मायग्रेनरोधक औषधाला मंजुरी दिली. मायग्रेन म्हणजे तीव्र डोकेदुखी हा एक अतिशय गुंतागुतींचा आजार आहे. जगभरात जवळपास एक अब्ज लोकांना त्याचा त्रास होतो. या आजारात डोकेदुखी इतकी जास्त होते की रोजचं काम करणंसुद्धा कठीण होतं आणि याचा परिणाम मग नातेसंबंधांवरही होतो. ज्यांना हा आजार आहे, अशा लोकांनाही हे नवं औषध दिलं जाऊ शकतं, असा दावा नाईसनं केला आहे. गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्यात आपण हाच प्रश्न विचारतोय, की मायग्रेनवरच्या उपचारांमध्ये आता काही बदल होणार आहे? मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया

12-23
14:40

भारताचा आणखी एक शेजारी बांगलादेश आता अस्वस्थ का होतोय? BBC News Marathi

बांगलादेशाची अर्थव्यवस्था आशिया-पॅसिफिक प्रदेशातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पाश्चिमात्य देशांमधल्या अनेक मोठ्या फॅशन कंपन्यांसाठी बांगलादेश हा मोठा कपडा पुरवठादार आहे. पण सध्या निषेध मोर्चे आणि वाढती महागाई यांमुळे बांगलादेशच्या आर्थिक यशावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. पुढच्या वर्षी जानेवारीत बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. पण त्याआधी पंतप्रधान शेख हसीना यांच्या वर्चस्वाला सामान्य जनता आव्हान देताना दिसते आहे. विरोधी पक्ष म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी अर्थात बीएनपी हसीना यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकते आहे. निवडणुकीआधी तटस्थ अंतरीम सरकार स्थापन झालं नाही, तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची त्यांची तयारी आहे. शेख हसीना यांच्यावर लोकशाही कमकुवत करण्याचा आरोप लावला जातो आहे, पण हसीना यांनी तो आरोप नाकारला आहे. त्या हजारो आंदोलकांवर कडक कारवाई करतायत. सरकार आणि विरोधक आपापल्या भूमिकांवर ठाम असल्याचं दिसतंय. बांगलादेशात अशी उलथापालथ का माजते आहे, याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहे आजची गोष्ट दुनियेची. मूळ पॉडकास्ट - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया

12-16
17:08

गाझा डायरी : इस्रायल हमासच्या युद्धात गाझामध्ये अडकलेल्यांच्या गोष्टी | BBC News Marathi

इंग्रजी शिक्षिका फरीदा आणि खालिद हा एक वैद्यकीय पुरवठादार गाझामधल्या युद्धात जिवंत राहण्यासाठीचा त्यांचा संघर्ष अत्यंत खासगी व्हॉईस संदेशांमधून जगाला सांगतायत.गाझामध्ये बिघडत चाललेल्या मानवतावादी संकटात अपार नुकसान होऊनही ते जिद्दीने तग धरून आहेत. गाझा डायरीची निर्मिती हया अल बदरनेह, लारा एल्गेबाली, ममदौह अकबिक मोहम्मद शलाबी आणि मेरी ओ'रेली यांनी केली होती.संपादन - रेबेका हेन्शके आणि सायमन कॉक्स मिक्सिंग - ग्रॅहम पुड्डीफूटबीबीसी वर्ल्ड सर्व्हिससाठी बीबीसी अरेबिक तपास उत्पादन.मराठी निर्मिती - जान्हवी मुळे ऑडिओ एडिटर - तिलक राज भाटिया

12-04
16:51

खूप झाला फराळ? आता पोटाची काळजी घ्या, कारण पोटाचा 'हा' प्रॉब्लेम आहे (BBC News Marathi)

आपण आयुष्यभर खातच असतो. खासकरून सणावारांना. आणि मग पोटाचं काही बिघडलं की आपण तब्येतील किंवा अन्नालाच दोष देतो. आपल्या पोटाचं शास्त्र आपल्याला कधी समजलंय का? ऐका ही गोष्ट दुनियेचीमूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया

11-18
15:29

भारत आणि चीन कधी मित्र होऊ शकतात का? BBC News Marathi

ऑगस्ट 2023 मध्ये भारत आणि चीनमधला तणाव पुन्हा वाढला. एकमेकांवरच्या विश्वासाला तडे गेले आणि सीमेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. दोन्ही देशांनी एकमेकांना संयमानं वागण्याचा सल्ला दिला. झालं काहीच नाही, पण दोन्ही देशांमधली मतभेदांची दरी आणखी वाढली. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या दोन देशांत अनेक दशकांपासून सीमावाद सुरू आहे. पण तणावामागे केवळ हे एकच कारण नाही. मग हे दोन्ही देश आपल्यातलं नातं सुधारू शकतात का, सारं काही आलबेल बनू शकतं का? गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्यात याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया

10-28
16:31

इस्रायलवर हमासचा हल्ला, आता पॅलेस्टाईनचं भवितव्य काय असेल? BBC News Marathi

7 ऑक्टोबर 2023. पॅलेस्टाईन कट्टरवादी गट हमासनं इस्रायलवर आजवरचा सर्वात मोठा हल्ला केला. इस्रायलनंही प्रत्युत्तरादाखल हमासच्या ताब्यात असलेल्या गाझा पट्टीवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. पण फक्त गाझा आणि इस्रायलच धुमसत नाहीये. तर इस्रायलच्या ताब्यातल्या वेस्ट बँक प्रदेशामध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी लोकांसाठीही 2023 हे वर्ष सर्वात हिंसक ठरलं आहे. पण सध्या केवळ वेस्ट बँकच पॅलेस्टिनी प्रशासनाच्या ताब्यात आहे तर गाझा पट्टीवर हमास या कट्टरतावादी संघटनेनं ताबा मिळवला आहे. गेल्या तीन दशकांत या हमास आणि इस्रायलमध्येच प्रामुख्यानं हिंसक संघर्ष होत आला आहे. पण आत्ताच्या हल्ल्यानंतर पुढे काय होऊ शकतं?ऐका ही गोष्ट दुनियेची.संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया

10-21
17:38

हे आदिवासी अमेझॉनचं जंगल वाचवू शकतात का? BBC News Marathi

21 सप्टेंबर 2023. ब्राझिलच्या अमेझॉनच्या जंगलात राहणाऱ्या आदिवासींमध्ये अशी आनंदाची, उत्साहाची लहर पसरली. यामागचं कारण होतं तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं दिलेला एक ऐतिहासिक निर्णय. पिढ्यानपिढ्या या जंगलांवर आदिवासींचा अधिकार होता आणि आता तो कोर्टानं कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे इथे आदिवासींसाठी आरक्षित जमिनींवर मर्यादा आणण्याच्या प्रयत्नांना आता खीळ बसू शकते. खरंतर एप्रिल 2023मध्ये अमेझॉनमधल्या सहा हजारांहून अधिक आदिवासींनी देशाची राजधानी ब्राझिलियामध्ये आंदोलन केलं होतं. राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लूला डिसिल्व्हा उर्फ लूला यांनी अमेझॉनच्या जंगलांचं आणि तिथल्या आदिवासींचं रक्षण करण्याचं निवडणुकीत दिलेलं वचन पूर्ण करावं, अशी त्यांची मागणी होती. तुम्हाला आठवत असेल की लूला आता परत निवडणून येण्याआधी जायर बोल्सेनारो ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदी होते. बोल्सेनारोंनी अमेझॉन खोऱ्यात शेती, खाणकाम आणि वृक्षतोडीसाठी परवानगी दिली होती. आता लूला यांच्या कार्यकाळात वृक्षतोड आता 33 टक्क्यांनी घटल्याचा सरकारचा दावा आहे. पण वृक्षतोड पूर्णपणे थांबावी आणि लूला यांनी अधिक व्यापक धोरणं आणावीत अशी मागणी आदिवासी करतायत. ॲमेझॉनच्या वर्षावनांचं भवितव्य हा संपूर्ण जगाच्या भविष्याचा मुद्दा आहे, असं ते सांगतात. पण खरंच असं आहे का?गोष्ट दुनियेचीमध्ये आपण हाच प्रश्न विचारतोय की ब्राझिलचे आदिवासी अमेझॉनला वाचवू शकतात का?मूळ निर्मिती- द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया

09-30
15:37

पृथ्वीशिवाय विश्वात आणखी कुठे जीवन खरंच असू शकतं का? BBC News Marathi

भारताच्या चंद्रयान-३ चं प्रपल्शन मोड्यूल 17 ऑगस्ट 2023ला विक्रम लँडरपासून वेगळं झालं. या मोड्यूलवरचं SHAPE हे उपकरण पृथ्वीवरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाच्या नोंदी ठेवतंय, ज्याच्या आधारे सूर्याशिवाय इतर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या पृथ्वीसारख्या ग्रहांचा शोध घेता येऊ शकतो. अशा ग्रहांवर कदाचित पृथ्वीसारखं जीवन असण्याची शक्यताही जास्त असेल. असा पृथ्वीबाहेरच्या सजीवांचा शोध घ्यावासा वाटणं ही नवी गोष्ट नाही. खगोलशास्त्र आणि अंतराळ प्रवासातल्या प्रगतीसोबतच विश्वात इतर कुठे जीवन आहे का हा प्रश्नही पडत राहतो. अनेकदा पृथ्वीवरच परग्रहवासी आल्याच्या चर्चा रंगतात. जुलै 2023 मध्ये असंच काहीसं घडलं. त्यावेळी अमेरिकेच्या एका संसदीय समितीच्या सदस्यांना तीन व्हिडियो दाखवण्यात आले. अमेरिकेन नौदलाच्या लढावू विमानांवरील कॅमेऱ्यांनी आकाशात टिपलेले ते ब्लॅक अँड व्हाईट व्हिडियो काहीसे अस्पष्ट म्हणजे ग्रेनी होते. पण त्यात एक चमकदार अंडाकृती वस्तू आकाशात वेगानं उडताना दिसत होती. ती रहस्यमयी तबकडी पाहिल्यावर पायलट्सची प्रतिक्रियाही या व्हिडियोमध्ये रेकॉर्ड झाली होती. अशीच रहस्यमय वस्तू इतर दोन वेगवेगळ्या वेळेला काढलेल्या व्हिडियोंमध्येही उडताना दिसत होती. हे व्हिडियो फुटेज खरंतर काही काळापूर्वी लीक झालं होतं. पण 2020 साली अमेरिकन संरक्षण मंत्रालयानं ते अधिकृतरित्या जाहीर केलं. यूट्यूबवर लाखो लोकांनी हे व्हिडियो पाहिले आहेत. पण यावर्षी जुलैत अमेरिकन काँग्रेसच्या म्हणजे तिथल्या संसदेच्या एका समितीच्या सदस्यांनी त्यावर चर्चा सुरू केली. या व्हिडियोंमागचं सत्य शोधून काढण्याचा आपला उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. आकाशात दिसणाऱ्या अशा रहस्यमयी वस्तू किंवा उडत्या तबकड्या काय आहेत? पृथ्वीशिवाय विश्वात इतर कुठे सजीवसृष्टी आहे का? ऐका ही गोष्ट दुनियेचीमूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया

09-16
17:34

देश एकमेकांशी आता अंतराळात स्पर्धा करणार? BBC News Maratih

23 ऑगस्ट 2023. भारताच्या चंद्रयान-3 चं लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि चांद्रमोहिमांच्या अध्यायातलं एक नवं पर्व सुरू झालं. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा पहिलाच देश ठरला. भारताचं हे यश आणखी विशेष ठरलं, कारण त्याआधी तीनच दिवसांपूर्वी रशियाच्या लुना-25 या यानाला चंद्राच्या याच भागात सॉफ्ट लँडिंग करताना अपयश आलं होतं. सध्या अमेरिका, चीन, जपान, इस्रायलही चांद्र मोहिमांवर काम करतायत. एक प्रकारे चंद्रावर जाण्यासाठी पुन्हा नव्यानं स्पेस-रेस सुरु झाल्याचं चित्र आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्रोनं त्याविषयी काही दिवसांपूर्वीच चिंता व्यक्त केली होती. 8 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर केलेल्या पत्रकात इस्रोनं म्हटलेलं की चंद्राच्या कक्षेत गर्दी होतेय. इथे सध्या नासाची चार, दक्षिण कोरियाचं एक आणि भारताचं एक अशी सहा यानं फिरतायत. पुढच्या दोन वर्षांत किमान नऊ यानं चंद्रावर येणार आहेत. त्यामुळे यानांची टक्कर होण्याचा धोका वाढेल अशी भीती इस्रोनं व्यक्त केली. हीच गोष्ट पृथ्वीलाही लागू होते. पृथ्वीभोवती उपग्रहांचं जाळं आहे आणि एखादं यान भरकटलं तर टकरींची मालिका सुरू होऊ शकते. नोव्हेंबर 2021 मध्ये रशियानं कॉसमॉस-1408 नावाच्या आपल्याच एका निकामी उपग्रहाचे मिसाईलनं तुकडे केले होते. याआधी अमेरिकेने 2008मध्ये आणि चीनने 2007मध्ये असं केलं होतं. त्यानंतर केवळ चुकून होणाऱ्या टकरीच नाही, तर एखादा देश जाणूनबुजून असा हल्ला करू शकतो अशी भीती निर्माण झाली होती. त्यामुळे या आठवड्यात गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत, की अंतराळात कुणी काय करावं, काय करू नये, याचे काही कायदे आहेत का? जगभरातल्या देशांमध्ये आता स्पेस वॉर होऊ शकतं का?

09-02
18:19

Recommend Channels