अखेर निवडणुकीचा उपचार संपून मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे बऱ्याच काळानंतर बिगर गांधी अध्यक्ष झाले. त्यांच्यासमोर आव्हाने कोणती? यावर बरीच चर्चा झाली, मात्र तें यशस्वी का होण्याची शक्यता आहे, तें सांगणारा आजचा #लक्ष असतं माझं
महाराष्ट्राला आता राज्यगीत मिळालं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठीच्या, मराठी माणसाच्या अस्मितेचा अर्क असलेल्या या गाण्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
ज्या पोटनिवडणुकीमुळे शिवसेनेचे नाव व चिन्ह जाऊन दोन नावं आणि चिन्ह जन्मली, त्या मुंबईतील अंधेरीची पोटनिवडणूक अखेर बिनविरोध होण्याची चिन्ह आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'पत्र'कारितेमुळे भाजपने आपला उमेदवार मागे घेतला, असं म्हटलं जातंय. मात्र, नवरा गेला तिथं पत्नीला बिनविरोध निवडून द्या, अशा न्यायाने लोकशाही चालवायची का? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
सध्या महाराष्ट्रात 1, 2 नाही...चार चार हिंदुत्ववादी पक्ष झालेत. सगळेच म्हणतायत आम्ही हिंदुत्ववादी! पण, मुळात हिंदुत्व म्हणजे काय? या पक्षांचं हिंदुत्व कोणत्या व्याख्येत बसतं? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
गुजरातमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. त्यातच, पंतप्रधान मोदींनी गुजरातेत अर्बन नक्षल घुसलेत, असा दावा केलाय. एकीकडे भारत सरकार अर्बन नक्षल असल्याचं अधिकृतरित्या नाकारत असताना मोदीच असा दावा करत असतील तर विषय गंभीर आहे. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांची पुढची लढाई चिन्ह आणि पक्षाच्या नावावरून सुरु आहे. वस्तुत: निवडणूक आयोगाने अनेक चिन्ह पर्याय म्हणून दिली असताना विशिष्ट चिन्ह्नाना पसंती का असते? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
काल ठाकरे आणि शिंदे गटांचे मेळावे झाले. दोन्हीकडील समर्थक आमचाच मेळावा जोरदार म्हणतायत. मात्र, तटस्थपणे पाहिल्यास काय दिसतं? यावरच आहे आजचा लक्ष असतं माझं
'आदिपुरुष'वरून सध्या वाद सुरु झालेत. खासकरून त्यातील सैफ अली खानने साकारलेल्या रावण आणि देवदत्त नागेच्या हनुमानावर अगदी हिंदुत्ववाद्यांनीही आक्षेप घेतलेत. यावरच आहे आजचा 'लक्ष असतं माझं'
राहुल यांची 'भारत जोडो' यात्रा लवकरच महाराष्ट्रात येईल. आधी भाजपकडून दुर्लक्ष करण्यात आलेल्या या यात्रेकडे आता तेही गांभीर्याने पाहतायत. यावरच आहे आजचा लक्ष असतं माझं
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या शाळेतील सरस्वतीचे फोटो की सावित्रीमाईंचे, यावरील वक्तव्याने वाद निर्माण झाला. मात्र, अशी विभागणी आणि प्रतिकांची वाटणी कशाला? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'च्या पुण्यातील निदर्शनादरम्यान, 'पाकिस्तान जिंदाबाद' अशी घोषणा दिली गेली, असे दावे झाले. मात्र, पुणे पोलीसांनी यावर पुरेसा प्रकाश टाकला नाही. alt न्यूज सारख्या fact चेकिंग वृत्त संस्थेने तर अशा घोषणा झाल्याच नाहीत, असं fact चेक करून टाकलं. मात्र, 'साम' टीव्हीला काय दिसलं? यावरच आहे आजचा 'लक्ष असतं माझं'
आज जागतिक बातमी दिन. फेक न्यूज आणि प्रचारकी मीडियाच्या काळात चांगली बातमीदारी व पर्यायाने चांगली पत्रकारिता करण्यासाठी तुम्हा मायबाप प्रेक्षक, वाचकांचं तन मन आणि मुख्य म्हणजे धनपूर्वक सहकार्य हवंय. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
आज विधिमंडळ परिसरातला राडा सर्वांनी पहिला. ज्यांचे आदर्श घ्यायचे तेच एकमेकांवरी धावून जातायत. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
आज 'जागतिक वडापाव दिवस' आहे. यानिमित्त, आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठामोळ्या या फास्ट फूडवर आजचा #लक्ष असतं माझं....
'आप'चे मनीष सिसोदिया आता केंद्रीय यंत्रणाच्या रडरावर आलेत. मात्र, यामुळे पुन्हा एकदा ईडी, सीबीआय भाजपच्या ईशाऱ्यावर चालतायत असा आरोप सुरु झालाय. त्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
बॉयकॉटमुळे आमीर खानची फिल्म 'लालसिंग चढढा'ला मोठा फटका बसला. पण, आता ज्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येतायत आणि स्वतः ही फिल्म पाहिल्यावर जे वाटलं, त्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी कामकाजात यापुढे 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम' म्हणावे, असा निर्णय घेतलाय. यावरून उलट-सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्यात. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि मराठा आरक्षण लढाईतील अग्रणी विनायक मेटे यांचं अपघाती निधन धक्का देणारं ठरलं. यानिमित्ताने जगभर युद्धापेक्षाही जास्त जीव घेणाऱ्या अपघातांबद्दल आणि त्यावरील सुरक्षेच्या उपायांबद्दल आहे आजचा #लक्ष असतं माझं
#'लक्षअसतंमाझं'मध्ये परवा सुबोध भावे, आमिर खान यांच्यावरील एपिसोड नंतर अनेकांनी यापूर्वी विक्रम गोखले, कंगना राणावत यांच्यावरील एपिसोडचे दाखले देत एकांगीपणाचे आरोप केले. त्यालाच उत्तर देणारा आजचा #लक्ष असतं माझं
भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी आज एकेठिकाणी अशा आशयाचे विधान केले की देशात फक्त भाजप राहील आणि अन्य पक्ष नष्ट होतील. मात्र, इतिहास काय सांगतो? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं