Discover"राज"कारण " Rajkaran
"राज"कारण " Rajkaran
Claim Ownership

"राज"कारण " Rajkaran

Author: Sakal Media

Subscribed: 2Played: 45
Share

Description

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे.

ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट,  ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्षण, घडलेले राजकीय गुन्हे आणि बरंच काही...

https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1

Sarkarnama is the only leading political news publisher in Maharashtra.
It offers an in-depth analysis of political events, end-to-end coverage of election campaigns, and other important happenings in the political circle. It is a known name among politics and also political aficionados.

Taking a step toward making the coverage more holistic, Sarkarnama presents " 'Raj'karan" - a podcast that covers important historical political events. What exactly happened? What were the exact reasons? What led to the political turmoil? Check out some amazing political tales, conspiracies, defining political moments, unheard stories, political crimes, and more on Sarkanarma's Special Podcast...

Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators.
studio@ideabrews.com

https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1

Android | Apple
101 Episodes
Reverse
रामदास आठवले यांनी तिसऱ्यांदा केंद्रात मंत्रीपद मिळवले असून तिसऱ्यांदा राज्यसभेत प्रवेश केला आहे. पण साधं ग्रामपंचयातीचंही तिकीट फायदा असल्याशिवाय न देणारा भाजप आठवलेंना तिसऱ्यांदा राज्यसभा का देतोय? यामागील राजकारण काय आहे? तेच समजून घेऊ. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, bjp, Ramdas Athwale, RPI, Dalit Panther
इतिहासात फुले दांपत्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक महापुरूषांनी स्त्री उद्धाराच्या कार्याची सुरुवात महाराष्ट्राच्या मातीतून केली. आधुनिक काळातही महाराष्ट्रानेच ही परंपरा पुढेही चालू ठेवली. महिला धोरण ते राजकीय आरक्षण निर्मातीचा पाया महाराष्ट्रातच रचला गेला. 'चूल आणि मूल' हा वाक्प्रचार ज्याने कोणी तयार केला असेल त्याच्या विचारांना महाराष्ट्रानं आणि इथल्या महिलांनी पहिल्यांदा सणसणीत चपराक दिली. राजकारणापासून तंत्रज्ञानापर्यंत सर्व क्षेत्रात महिलांच्या सहभागाची प्रक्रिया आता नॉर्मलाईज झालीय. पण या प्रक्रियेच्या मुळाशी महाराष्ट्र आहे हे अभिमानाने सांगायला हवं. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, International Women's Day, Women’s Reservation, women’s politics
'माधव पॅटर्नमुळे' महाराष्ट्रात भाजपचे सध्या सर्वार्थाने 'अच्छे दिन' सुरू आहेत. कोणतीही निवडणूक असली तरी त्यात भाजपचाच डंका दिसून येतो. 2014, 2019 अन् 2014 अशा सलग 3 विधानसभा निवडणुकांमध्ये 100 पार जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा विक्रम केला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून पुनरागमन झाले आहे. भाजपच्या आजच्या या यशामागे दिवंगत वसंतराव भागवत आणि गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात राबवलेल्या 'माधव पॅटर्न'चा वाटा मोठा आहे. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, BJP, Gopinath Munde, Devendra Fadnavis, Rss, Narendra Modi, Amit Shaha
बंटी उर्फ सतेज पाटील आणि मुन्ना उर्फ धनंजय महाडिक... महादेवराव महाडिकांच्या तालमीत तयार झालेले दोन पैलवान. दोघेही एकेकाळी जिवलग मित्र होते, हे कोणाला सांगूनही पटणार नाही. पण शैक्षणिक काळापासून ते आणि राजकारणापर्यंत यांची मैत्री डोळे दीपावणारी होती. त्यांच्या दोस्तीचे किस्से रंकाळ्यावर फेऱ्या मारताना चर्चिले जायचे. मग एवढ्या जीवघेण्या संघर्षापर्यंत हे दोन मित्र कसे आले? नेमका कुठे खडा पडला? पाहुया आजच्या राजकारण पॉडकास्टमध्ये... KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Satej Patil, Dhananjay Mahadik, NCP, Shivsena, BJP, Kolhapur Politics
केंद्रात काँग्रेसची ताकद वाढत होती. विरोधी पक्षात बसून राजकारण करण्यापेक्षा सत्तेत यावं असे राजीव गांधी यांचे मत होते. खासदार असताना शरद पवार यांचा राजीव गांधी यांच्यासोबत संवाद व्हायचा. त्यावेळी त्यांनी बोललेल्या एका वाक्यानंतर शरद पवार यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, congress, Sharad Pawar, Rajiv Gandhi
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांची राजकीय उंची सांगणारे वेगवेगळे लेख, बातम्या वाचनात येत आहेत. पण नेते घडवणारे 'विद्यापीठ' म्हणूनही अजितदादांची ओळख होती, हेही तितकेच खरे आहे. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Ajit Pawar, NCP, Pune
फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे. सुरुवातीला एकत्र काम करणारे रामराजे नाईक निंबाळकर आणि हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्षाचा वाद दुसऱ्या पिढीत पोचला आहे. दुसऱ्या पिढीत मात्र तो वाद वैयक्तिक पातळीवर येऊन पोचला आहे. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Phaltan Politics, Ramraje Naik Nimbalkar, Ranjeetsinha naik Nimbalkar, NCP, BJP, Congress
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर विरुद्ध विमानाचे कॉकपिट सोडून राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणारा त्यांचाच सख्खा नातू संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातील वर्चस्वाची लढाई संपूर्ण राज्याने बघितली. सत्तेच्या वारशाच्या वादाने, विचारांच्या लढायांनी उंबरठे ओलांडले आणि बघता बघता निलंग्याचा राजवाडा 2 राजकीय भागात विभागला गेला.
शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि विलासराव देशमुख या दोन दिग्गज मुख्यमंत्र्यांमधील हा संघर्ष केवळ दोन नेत्यांमधील वाद नव्हता, तर जिल्ह्याची नाडी कोणाच्या हातात राहणार आणि राज्याच्या सिंहासनावर कोणाचे वर्चस्व असणार, याचा ऐतिहासिक लढा होता. एकेकाळी मार्गदर्शक असलेल्या निलंगेकरांच्या विरोधात विलासरावांनी पुकारलेले हे बंड म्हणजे राजकीय महत्त्वाकांक्षेचा सर्वोच्च बिंदू होता. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Latur Politics, Vilasrao Deshmukh, Shivaji Patil Nilangekar, Congress
मुंबई महापालिकेची निवडणूक नेहमीच चर्चेचा विषय असते. आधी शिवसेना विरुद्ध काँग्रेस असे असणारे चित्र आता शिवसेना विरुद्ध भाजप असे झाले आहे. विरोधक बदलले असले तरीही शिवसेना या लढाईत गेल्या 60 वर्षांपासून लढत आहे. पण शिवसेनेने पहिल्यांदा मुंबई महापालिका कधी जिंकली? पहिल्यांदा शिवसेनेचा महापौर कसा झाला? त्याचाच हा इतिहास KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, BMC Election, Shivsena, BJP, Congress
सहकाराच्या मातीत पेरलेले राजकारण जेव्हा सत्तेच्या संघर्षात रूपांतरित होते, तेव्हा अहिल्यानगरच्या राजकारणात दोनच नावे गाजतात ते म्हणजे कोल्हे आणि विखे-पाटील! ही केवळ दोन घराण्यांची लढाई नाही, तर कोपरगाव आणि राहाता या दोन साम्राज्यांच्या वर्चस्वाची लढाई आहे. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Shivsena, NCP, BJP, Congress, Kolhe Vs Vikhe, Radhakrishna Vikhe Patik, Sujay Vikhe Patil, Vivek Kolhe
गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंमध्ये तीन दशकांपूर्वी पडलेल्या वादाची ठिणगी आजही शमलेली नाही. प्रस्थापितांची गढी रोखण्यापासून ते थेट आव्हान देण्यापर्यंतचा हा थरार आजही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतो. एकाच पक्षात असूनही त्यांच्यातील कोल्ड वॉर संपलेले नाही. त्यांच्या भुतकाळातील संघर्षांचे मूळ निवडणुकीतील टक्कर आणि राजकीय वर्चस्वात आहे, ज्यामुळे हे वारंवार चर्चेत राहिले आहेत. या टोकाच्या संघर्षाची सुरुवात नेमकी कशी आणि कुठून झाली? पाहुया आजच्या राजकारण या पॉडकास्टमध्ये...
नारायण राणेंची राजकारणातील जुनी आणि सुरुवातीची ओळख सांगायची तर अगदी चड्डीत असल्यापासून बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता अशी होती. मुंबईत शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात रस्त्यावर उतरून राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नारायण राणे यांचे नाव पुढे असायचे. हेच राणे एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, केंद्रीय मंत्री झाले. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Narayan Rane, Shivsena, BJP, Nitesh Rane, Nilesh Rane
बीडच्या गेवराईतील पवार–पंडित घराणं. एकमेकांशी सख्ख्या नातेसंबंधात असलेले आणि स्वतःला घरंदाज म्हणवणारे हे लोक जेव्हा एकमेकांना मारायला उठतात, तेव्हा सगळ्यांच्या भुवया उंचावतात. नगरपालिकेच्या निवडणुकांनी गेवराईत पवार–पंडितांचं रस्त्यावरचं भांडण राज्यभर चर्चेचं बनलं. पण हे आजच पहिल्यांदाच झालंय का? तर नाही. गेवराईत यापूर्वीदेखील असे राडे झाले आहेत. गोदाकाठच्या या मतदारसंघाचं राजकारण खूप इंटरेस्टिंग आहे. मागच्या तीन–चार पिढ्यांचा मागोवा घेतला तर हा विषय नक्कीच तुम्हाला लक्षात येईल. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, NCP, BJP, Congress, Beed, Beed politics, Shivajirao Pandit, Amarsinh Pandit, Vijaysinh Pandit, Laxman Pawar, Balraje Pawar
एकनाथ गणपतराव खडसे. कधीकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाच्या रेस मध्ये असणारा नेता. तब्बल 40 वर्षांचा राजकारणाचा इतिहास या नेत्याला आहे. भाजपला महाराष्ट्रात रुजवण्यात आणि वाढवण्यात या नेत्याने अमाप कष्ट उपसले. पण मागच्या दहा वर्षांच्या कालखंडात अशा काही घडामोडी घडल्या की ज्यामुळे आज भाजपाचेच नेते खडसे यांना 'कोण होतास तू? काय झालास तू? अशा शब्दांमध्ये हिणवत आहेत. त्यांच्यावर ही वेळ येण्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत आहे तो एक शिवसैनिक. याच शिवसैनिकांने खडसेंचं राजकारण जवळपास संपवत आणलं आहे. अर्थात याला भाजपमधील छुपा पाठींबाही होताच. नेमकं खडसे यांचा राजकारणाचा उदय कसा झाला आणि कसं एका शिवसैनिकांने त्यांचं राजकारण संपवतं आणलं तेच आपण आज पाहूया... KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, BJP, Shivsena, Jalgaon Politics, Eknath Khadse, Chandrakant Patil, Raksha Khadse, Rohini Khadse, Girish Mahajan
राज्यात काही मोठी राजकीय घराणी आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. त्यामध्ये बीडच्या क्षीरसागर घराण्याचाही महत्वाचा समावेश आहे. काँग्रेस नेत्या आणि बीडच्या दिवंगत खासदार केशरकाकू क्षीरसागर या राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. या कुटुंबाची सात दशकांची राजकीय परंपरा आजही कायम आहे. केशरकाकूंना चार मुले — जयदत्त, रविंद्र, भारतभूषण आणि पवित्रा. या चौघांसह त्यांच्या कुटुंबातील तीसहून अधिक व्यक्ती आजही एकाच बंगल्यात राहतात. सध्या घर एकच असले तरी तीन भाऊ वेगवेगळ्या पक्षांमध्ये सक्रिय आहेत. हेच या राजकीय घराण्याचे वैशिष्ट्य आहे. KEYWORDS: Political podcast, Marathi politics, Indian politics 2025, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Political analysis India, Congress, NCP, BJP, Beed, Beed Politics, Kesharkaku Kshirsagar
राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर जयंत पाटील यांचे वय केवळ २१ वर्षेही पूर्ण झाले नव्हते. इस्लामपूर भागातील जनतेच्या मागणीनुसार त्यांच्या मोठ्या भावाऐवजी जयंत पाटील यांना पाठवण्याचे ठरले. मुंबईत जाताना ते फक्त एका बॅगेवर आले होते आणि चार महिने मुंबईत राहतील, असे ठरले होते. त्यानंतर येथील नागरिकांची मागणी कमी झाली की ते अमेरिकेला शिक्षणासाठी रवाना होतील, अशी योजना होती. पण पुढे ते राजकारणात कसे सक्रिय झाले? जयंत पाटील यांचा राजकीय प्रवास कसा होता? याचा हा आढावा… KEYWORDS: Political podcast, Marathi politics, Indian politics, 2025, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Political analysis India, Rajarambapu Patil, Jayant Patil, NCP
संघाचे स्वयंसेवक ते मंत्री असा राजकीय प्रवास राहिलेल्या ज्येष्ठ भाजप नेते, महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि गोंदिया जिल्हा निर्मितीचे शिल्पकार महादेवराव शिवणकर यांची राजकीय कारकीर्द संघर्ष, समर्पण आणि दूरदृष्टीने गाजलेली अशीच राहिली आहे. शिवणकर हे आमगाव विधानसभेचे 5 वेळा आमदार आणि चिमूर लोकसभेचे एक वेळा खासदार म्हणून त्यांनी कार्यकाळ सांभाळला. यासह १९९५ साली राज्यात पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये सिंचन आणि अर्थमंत्री म्हणून धुरा सांभाळली. KEYWORDS: Political podcast, Marathi politics, Indian politics 2025, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Political analysis India, BJP, BJP Leader, Gopinath Munde, Mahadeorao Shivankar
राजकारणातील प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या एका साध्या दुधवाल्याचा, ज्याने नगरच्या राजकारणात प्रवेश करून सरपंच, आमदार आणि शेवटी मंत्रीपदापर्यंतचा प्रवास केला. ऐका हा खास भाग RAJ'KARAN PODCAST मध्ये! KEYWORDS: Political podcast, Marathi politics, Indian politics 2025, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Political analysis India, BJP, Congress, NCP, Shivajirao Kardile
विधानसभा आणि विधान परिषद या राज्यातील दोन्ही सभागृहांमध्ये सध्या विरोधी पक्षनेता नाही. सत्ताधारी पक्षांकडून किमान १० टक्के सदस्यसंख्येकडे लक्ष वेधले जात आहे, तर विरोधी पक्षांकडून आतापर्यंतच्या परंपरेची उदाहरणे दिली जात आहेत. राज्यासमोर सध्या अतिवृष्टी, बेरोजगारी, महागाई, आरक्षणाचे वाद यांसारखे अनेक गंभीर प्रश्न आहेत. अशा काळात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन जनतेच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षित आहे. विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवून राज्याच्या प्रगतीला खीळ घालण्याचा हा प्रकार आहे. KEYWORDS: Political Podcast, Marathi Politics, Indian Politics 2025, Maharashtra Politics, Rajkaran Podcast, Political Discussions, Maharashtra Political Updates, Political Analysis India, Shivsena, Shivsena UBT, BJP, Congress
loading
Comments (1)

Viju Kumar

It SEEMS that you are on payroll against BJP. असे वाटते की भाजपा विरोधाची ठेकेदारी घेतली आहे. प्रेताला किती ही फुलाने झाकले तरी त्याचा भयाणपणा लपत नाही. काश्मीर, राम मंदिर, तीन तलाक, भारताची सध्याची प्रगती, जगात आताची धमक, उरी स्ट्राइक, balakot bombing etc हे सर्व विसरलायला एक पिढी जावी लागेल. तो पर्यंत करा तमाशा.

Apr 22nd
Reply