Discover
Around The World
Around The World
Author: Veena World
Subscribed: 0Played: 0Subscribe
Share
© Copyright Veena World
Description
प्रवास म्हणजे फक्त डेस्टिनेशन्स टिक करणं नाही, तर वाटेत भेटणारी माणसं, त्यांच्या गोष्टी, आणि परत आल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्याप्रती मिळालेला एक नवीन दृष्टिकोन, हे सर्वकाही मिळून बनतो तो म्हणजे खऱ्या अर्थाने आपला प्रवास.
हीच भावना मनात ठेवून वीणा वर्ल्ड घेऊन आलंय एक नवीन पॉडकास्ट सिरीज - 'Around The वर्ल्ड'.
इथे आपल्याला भेटणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेली आणि आपल्याला इन्स्पायर करणारी अशी काही व्यक्तिमत्व. त्यांच्या प्रवासकथा फक्त प्रवासवर्णनं नसून त्या आहेत अनुभवांच्या, भावनांच्या, आणि ‘ट्रॅव्हल’ म्हणजे नक्की काय हे सांगणाऱ्या, मनाला भिडणाऱ्या विलक्षण गोष्टी.
ही सिरीज म्हणजे कुतूहल, संस्कृती आणि कनेक्शन्सचं सेलिब्रेशन… तेच जे आपल्या प्रवासाला खऱ्या अर्थाने महत्त्व देतं.
तर आपणही ह्या रोमांचक प्रवासाचा भाग नक्की बना!
------------------------------------------------------
Travel isn’t just about ticking destinations off a list; it’s about the people we meet along the way, the stories we carry back, and the fresh perspectives that stay with us.
With this thought, we are excited to bring you “Around The World”, our brand-new podcast series featuring some truly inspiring guests. From different walks of life, each of them has a story that goes beyond borders, stories of journeys, experiences, and what travel really means to them.
At its heart, this series is a celebration of curiosity, culture, and connections, the things that make travel so meaningful.
Stay tuned to be a part of this journey with us.
हीच भावना मनात ठेवून वीणा वर्ल्ड घेऊन आलंय एक नवीन पॉडकास्ट सिरीज - 'Around The वर्ल्ड'.
इथे आपल्याला भेटणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेली आणि आपल्याला इन्स्पायर करणारी अशी काही व्यक्तिमत्व. त्यांच्या प्रवासकथा फक्त प्रवासवर्णनं नसून त्या आहेत अनुभवांच्या, भावनांच्या, आणि ‘ट्रॅव्हल’ म्हणजे नक्की काय हे सांगणाऱ्या, मनाला भिडणाऱ्या विलक्षण गोष्टी.
ही सिरीज म्हणजे कुतूहल, संस्कृती आणि कनेक्शन्सचं सेलिब्रेशन… तेच जे आपल्या प्रवासाला खऱ्या अर्थाने महत्त्व देतं.
तर आपणही ह्या रोमांचक प्रवासाचा भाग नक्की बना!
------------------------------------------------------
Travel isn’t just about ticking destinations off a list; it’s about the people we meet along the way, the stories we carry back, and the fresh perspectives that stay with us.
With this thought, we are excited to bring you “Around The World”, our brand-new podcast series featuring some truly inspiring guests. From different walks of life, each of them has a story that goes beyond borders, stories of journeys, experiences, and what travel really means to them.
At its heart, this series is a celebration of curiosity, culture, and connections, the things that make travel so meaningful.
Stay tuned to be a part of this journey with us.
17 Episodes
Reverse
'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे!आज आपल्यासोबत आहेत एक अत्यंत खास पाहुणे — दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर. अष्टपैलू कलाकार म्हणून त्यांना संपूर्ण जग ओळखतेच; पण या मनमोकळ्या गप्पांमध्ये यजमान वीणा पाटील यांनी त्यांच्यातील ‘निरीक्षक’ प्रवाशाला बोलते केले आहे.प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नव्हे, तर तो माणसे आणि संस्कृती जवळून अनुभवण्याचा एक मार्ग आहे — हे त्यांच्या गप्पांतून प्रकर्षाने जाणवते. या एपिसोडमध्ये ते त्यांचे वैयक्तिक प्रवासाचे तत्त्वज्ञान, जगाकडे पाहण्याची खास पद्धत आणि प्रवासातील काही अविस्मरणीय आठवणी शेअर करत आहेत.दोन अनुभवी व्यक्तिमत्त्वांचा हा समृद्ध संवाद तुम्हाला प्रवासाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन नक्कीच देऊन जाईल.संपूर्ण एपिसोड नक्की पाहा!वीणा वर्ल्डच्या Spotify चॅनेलला follow करा.Welcome to a new episode of the 'Around The World' podcast!In this very special episode, host Veena Patil is in conversation with the legendary Dilip Prabhavalkar. While the world knows him for his incredible acting prowess, this chat explores his identity as a keen observer of life and a passionate traveler.From his personal philosophy on travel to how he perceives different cultures and people, Dilip ji shares insights that are as profound as they are engaging. This isn’t just a conversation about destinations; it’s a look at the world through the eyes of a master storyteller.Watch the full episode for a truly enriching experience.Subscribe to Veena World’s YouTube channel.Credits:Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd.Production House: Evertale Studios
'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! ७ फेब्रुवारीपासून ‘Men’s T20 Cricket World Cup’ सुरू होत आहे. भारतीय संघ आपले जेतेपद राखण्यासाठी सज्ज असतानाच, या वर्ल्ड कपच्या पूर्वसंध्येला आमच्या स्टुडिओमध्ये एक ‘चॅम्पियन’ व्यक्तिमत्त्व उपस्थित आहे — ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले.व्यावसायिक क्रिकेट पत्रकारितेमुळे त्यांना जगभर फिरण्याची संधी मिळाली, पण या प्रवासात फक्त क्रिकेटच नाही, तर जागतिक खाद्यभ्रमंती आणि तिथल्या लोकजीवनाचाही मोठा वाटा आहे. स्वतःला मिश्किलपणे ‘इंटरनॅशनल बकासूर’ म्हणवून घेणारे सुनंदन सर या मनमोकळ्या गप्पांमध्ये त्यांच्या प्रवासातील अनेक पैलू उलगडतात. या संवादात ते पाकिस्तानमधील त्यांच्या भेटीबद्दल बोलताना मराठा साम्राज्याच्या पराक्रमाच्या आठवणींना उजाळा देतात.अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या मराठा वीरांचा इतिहास त्यांना तिथे कसा आठवला, हे ऐकण्यासारखं आहे. न्यूझीलंडमधील निसर्गसौंदर्य, ऑस्ट्रेलियातील भन्नाट किस्से, तसेच यूके आणि आयर्लंडमधील अनुभव ऐकताना तुम्हालाही त्यांच्यासोबत प्रवासाची सफर घडेल. याशिवाय, हर्षा भोगले यांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांसोबतच्या त्यांच्या मैत्रीचे पडद्यामागचे रंजक किस्सेही त्यांनी या भागात शेअर केले आहेत. प्रवासाकडे मिश्किल, अभ्यासपूर्ण आणि तितक्याच अभिमानास्पद नजरेतून पाहणारा हा एपिसोड नक्की पाहा! वीणा वर्ल्डच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा. Welcome to a new episode of the 'Around The World' podcast! With the Men’s T20 Cricket World Cup kicking off on February 7, India is all set to defend its championship. On the eve of this major tournament, we have a true champion guest in our studio—renowned senior cricket journalist Sunandan Lele. While cricket has taken him across the globe, it is his sharp wit and love for food—earning him the nickname “International Bakasur”—that make his travel stories truly unforgettable. Sunandan reflects on his visit to Pakistan, recalling the legacy of the Maratha Empire at Attock.From calling New Zealand the most scenic destination to sharing hilarious anecdotes from Australia, the UK, and Ireland, he takes us on a captivating global journey. He also offers a peek into his long-standing friendships with icons like Harsha Bhogle, sharing fascinating behind-the-scenes travel stories. Watch the full episode for a unique perspective on travel through the eyes of a master storyteller. Subscribe to Veena World’s YouTube channel. Credits:Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd.Production House: Evertale Studios
'Around The World' पॉडकास्टच्या या नवीन भागात आपले स्वागत आहे!वैधानिक इशारा: हा एपिसोड पाहण्याआधी पोटभर जेवून घ्या—नाहीतर व्हिडिओ पाहताना प्रचंड भूक लागेल!आजच्या भागात होस्ट नील पाटील यांच्यासोबत आहेत ‘द कुणाल विजयकर’. एक उत्कृष्ट नट म्हणून आपण त्यांना ओळखतोच, पण त्याहीपलीकडे ते अन्नाचे चालते-बोलते ‘इन्सायक्लोपीडिया’ आहेत. त्यांच्या पदार्थांच्या वर्णनानेच माणसाला भूक लागावी, अशी त्यांची हातोटी आहे!या खुसखुशीत गप्पांमध्ये कुणाल यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणींपासून ते परदेशातील ‘फूड एक्सपेरिमेंट्स’पर्यंतचा प्रवास उलगडला आहे. पारसी, गोवन, केरळ ते अगदी ओरिसा आणि जपानी जेवणापर्यंत… प्रत्येक कुझिनची नसंनस त्यांना माहीत आहे.फक्त खाणंच नाही, तर रेस्टॉरंट बिझनेसमधले काही महत्त्वाचे ‘Do’s and Don’ts’, उत्तम सर्व्हिस म्हणजे नक्की काय, आणि सिझलर व फालुद्याबद्दलची खास ‘ट्रिव्हिया’ही त्यांनी शेअर केली आहे.परदेशात गेल्यावर आपल्या ‘कंफर्ट झोन’मधून बाहेर पडून तिथल्या स्थानिक अन्नाचा आस्वाद कसा घ्यायचा, हे कुणाल यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.हा चविष्ट आणि माहितीपूर्ण एपिसोड नक्की पाहा!वीणा वर्ल्डच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा.-------------------------------------------------Welcome to a brand-new, mouth-watering episode of the 'Around The World' podcast!Warning: Do not watch this episode on an empty stomach!In this episode, host Neil Patil is joined by “The Kunal Vijayakar.” While we know him as a fantastic actor, his knowledge of food is simply unrivalled. He has a rare talent for describing food in a way that can make anyone hungry instantly.In this candid conversation, Kunal traces his love for food back to his family roots and upbringing. He dives deep into the nuances of diverse cuisines—from Pathare Prabhu, Parsi, and Goan to Kerala, Odia, and Japanese. He also shares stories from his recent culinary trip to Madrid and talks about stepping out of one’s “Indian food comfort zone” to truly experience local cuisine.Beyond just tasting, the episode explores the business of food—what makes great restaurant service, the Do’s and Don’ts of dining, and some fascinating trivia about Sizzlers and Falooda.Listen to this delicious and insightful episode now!Credits:Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd.Production House: Evertale Studios
'Around The World' पॉडकास्टच्याया विशेष एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे!प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्षाच्यापार्श्वभूमीवर, भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रीमाननीय श्री. नितीनजी गडकरी आणि वीणा पाटीलयांच्यातील हा विशेष संवादसादर करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे.या एपिसोडचे वेगळेपण म्हणजे, पहिल्यांदाच आम्ही आमच्या पॉडकास्ट स्टुडिओच्या बाहेर जाऊन, थेट भारताच्या एकाकेंद्रीय मंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी या भागाचे शूटिंगकेले आहे. ‘Highway Man of India’ अशी ओळख असलेल्यानितीनजींच्या कार्यामुळे आज देशाच्या कानाकोपऱ्यातीलपर्यटन स्थळे एकमेकांशी अधिक सक्षमपणे जोडलीजात आहेत.या भागात इन्फ्रास्ट्रक्चरचा पर्यटनावर होणारा सकारात्मक परिणाम, ऑटोमोबाईल क्षेत्रातील नवे प्रयोग, तसेचदिल्लीतील प्रदूषणापासून ते जलमार्गांच्या विकासापर्यंतअनेक महत्त्वाच्या विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा झाली आहे. नितीनजींचाखवय्येगिरीतील उत्साह, शेतीबद्दलची त्यांची ओढ आणि वैयक्तिकप्रवासाचे अनुभव या संवादाला अधिकजिवंत बनवतात.सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांनीएकत्र येऊन भारताला ‘पर्यटनहब’ कसे बनवता येईल, यावर नितीनजींनी केलेले मार्गदर्शन मोलाचे आहे. वीणा वर्ल्डसाठीहे एक मोठे भाग्यआहे की आपल्याला अशामहान नेतृत्वाचे विचार ऐकायला मिळाले. हा संवाद नक्कीचप्रेक्षकांसाठी ज्ञानाची पर्वणी ठरेल.संपूर्ण एपिसोड नक्की ऐका!============================================Welcome to a landmark episode of the 'Around The World' podcast!Set against the backdrop of India’s 77th Republic Day, we are deeply honoured to present a special conversation between Hon. Shri Nitin Gadkari ji, Union Minister for Road Transport and Highways, and Veena Patil.Marking a significant milestone, this episode was recorded outside our podcast studio for the very first time - at the official residence of a Union Minister of India. Widely known as the ‘Highway Man of India,’ Nitinji’s visionary leadership has played a pivotal role in connecting India’s diverse tourist destinations like never before.In this insightful conversation, Nitinji discusses how infrastructure development is boosting tourism, shares his thoughts on innovations in the automobile sector, and addresses critical issues ranging from urban pollution in Delhi to the expansion of inland waterways. Beyond policy and governance, the episode also offers a glimpse into his love for food, his deep connection with agriculture, and his personal travel experiences.His vision of public and private sectors coming together to make India a global tourism hub is a powerful takeaway. For the Veena World team, this has been a truly humbling experience, resulting in an episode that stands apart in every sense.Listen to the full episode now!Credits:Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd.Production house: Evertale Studios
'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! मुंबई म्हणजे फक्त एक शहर नाही, तर ती एक जिवंत कथा आहे. आज आपल्यासोबत आहेत भारत गोठोसकर, ज्यांनी 'खाकी टूर्स'च्या माध्यमातून मुंबईच्या इतिहासाला आणि वारशाला एक नवी ओळख मिळवून दिली आहे.होस्ट नील पाटील यांच्यासोबतच्या या मनमोकळ्या गप्पांमध्ये, भारत आपल्याला मुंबईच्या त्या भागात घेऊन जातात जिथे सहसा पर्यटकांची पावलं वळत नाहीत. परळ, लालबागपासून ते दादर, माहिमपर्यंत—इथल्या गल्ल्या, इथले लोक, कोळी बांधवांचा वारसा, इराणी कॅफेज आणि इथल्या मातीने जपलेल्या आठवणी... या सर्वांतून मुंबईचं Tourism Potential कसं उलगडतं, हे या संवादातून समजते.इतिहासाला केवळ पुस्तकात न ठेवता, तो आपल्या भविष्यासाठी प्रेरणादायी कसा ठरू शकतो, हे सांगणारा हा एपिसोड मुंबईवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी एक पर्वणी आहे. संपूर्ण एपिसोड नक्की ऐका! वीणा वर्ल्डच्या Spotify चॅनेलला follow करा. ==================================================Welcome to a new episode of the 'Around The World' podcast! In this episode, host Neil Patil is in conversation with Bharat Gothoskar, the founder of 'Khaki Tours', who has given a fresh identity to Mumbai’s rich history and heritage.This casual yet profound conversation explores the parts of Mumbai where tourists seldom wander. From the industrial roots of Parel and Lalbaug to the historic lanes of Dadar and Mahim, we dive into the diverse communities, Irani cafes, and the rich Koli heritage that define the city. Bharat discusses why preserving these stories is key to unlocking Mumbai’s true Tourism Potential.Experience your city through the eyes of a master storyteller and discover a unique perspective on travel. Listen to the full episode now! Credits:Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd.Production house: Evertale Studios
'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे!सिनेमा बनवणारे जेव्हा स्वतः ‘प्रवासी’ बनतात, तेव्हा काय घडतं? या भागात, होस्ट वीणा पाटील यांच्यासोबत गप्पा मारत आहेत सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव आणि निर्मात्या मेघना जाधव.'नटरंग' आणि 'टाइमपास' सारख्या सुपरहिट कलाकृती देणाऱ्या या जोडीने या पॉडकास्टमध्ये आपल्या भटकंतीचे अनेक पैलू उलगडले आहेत. जपानमधील संस्कृती, तिथलं मनोरंजन आणि शिस्त पाहून ते कसे भारावून गेले, याचे किस्से त्यांनी शेअर केले आहेत.पण जगभर फिरतानाही त्यांना खरी ओढ लागते ती आपल्या मातीची! कोकणातील untouched किनारे आणि हिमालयातील तो दैवी अनुभव… हे सगळं त्यांच्यासाठी कसं खास आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितलं आहे.स्कुबा डायव्हिंगचा थरारक अनुभव आणि सिनेमासाठी लोकेशन्स निवडतानाची त्यांची नजर… हे ऐकताना तुम्हालाही प्रवासाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळेल.प्रवास म्हणजे फक्त फिरणं नव्हे, तर तो एक बदल आहे जो आपल्याला आतून घडवतो—हा विचार मांडणारा हा एपिसोड नक्की पाहा!-----------------------Welcome to a new episode of the 'Around The World' podcast!What happens when storytellers become travellers? In this episode, host Veena Patil is in conversation with renowned director Ravi Jadhav and producer Meghana Jadhav.The creative duo behind hits like Natarang and Timepass opens up about their global wanderlust. They share fascinating stories from Japan—Tokyo and Osaka—describing how the culture, entertainment, and discipline there left them mesmerized.Yet, despite travelling the world, their hearts remain deeply connected to India. They draw beautiful parallels between the untouched beaches of Konkan and the divine serenity of the Himalayas. From thrilling scuba diving adventures to their unique “director’s eye” for selecting film locations, this conversation is packed with insights.Travel isn’t just about sightseeing; it’s a transformation that shapes us from within.Listen to this inspiring episode now! Credits:Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd.Production House: Evertale Studios
तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!२०२६ च्या पहिल्या एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या भागाची सुरुवात थोडी रोमँटिक आणि तितकीच अॅडव्हेंचरस आहे.होस्ट सुनीला पाटील यांच्यासोबत गप्पा मारत आहेत भाडीपा फेम आणि नवविवाहित जोडी—सारंग साठ्ये आणि पॉला मॅकग्लिन. पुणे ते कॅनडा हे अंतर प्रवासाने कसं मिटवलं आणि त्यांच्या नात्याचा पाया ‘प्रवास’ कसा ठरला, याची ही गोष्ट आहे.या गप्पांमध्ये सारंगने वाराणसीतील त्याचे आयुष्य बदलणारे अनुभव शेअर केले आहेत, तर पॉलाने जपानमधील तिच्या सोलो ट्रिपच्या आठवणींना उजाळा दिला आहे. बर्लिन, अमेरिका ते स्कॉटलंड अशा अनेक ठिकाणचे किस्से आणि “रोड ट्रिपवर गेल्यावरच समोरचा माणूस खरा कळतो” हे त्यांचे निरीक्षण…हे सगळं काही या एपिसोडमध्ये!त्यांच्या लग्नाचा आणि प्रवासाचा हा सुंदर प्रवास नक्की पाहा.वीणा वर्ल्डच्या Spotify चॅनेलला सबस्क्राइब करा.----------------------------------------------------Wishing you all a very Happy New Year!Welcome to the first episode of 2026. We begin the year with a perfect blend of romance and adventure. Host Sunila Patil is in conversation with the BhaDiPa-fame newlyweds—Sarang Sathaye and Paula McGlynn.This is the story of how travel bridged the distance between Pune and Canada, becoming the foundation of their relationship. In this candid chat, Sarang shares his life-changing experiences from Varanasi, while Paula reminisces about her memorable solo trip across Japan.From stories of Berlin, the USA, and Scotland to their insightful observation that “you only truly get to know a person on a road trip,” this episode has it all.Join us on their journey of love and travel.Listen to the full episode now!Subscribe to Veena World’s Spotify channel.
'Around The World' पॉडकास्टच्या या वर्षातील (२०२५) शेवटच्या एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे!आपल्या प्रत्येकासाठी ‘जेवण’ हे गरजेचं असतं, पण काही जणांसाठी ती एक ‘भावना’ (Emotion) असते. या भागात होस्ट नील पाटील यांच्यासोबत गप्पा मारत आहेत असेच एक अस्सल खवय्ये आणि प्रसिद्ध यूट्यूबर, सुकीर्त गुमास्ते.सुकीर्तसाठी प्रवासाचं प्लॅनिंग ‘डेस्टिनेशन’वरून नाही, तर तिथे काय ‘खायला’ मिळणार आहे, यावरून ठरतं! या गप्पांमध्ये त्यांनी अन्नाचं आणि मानवी भावनांचं असलेलं हे घट्ट नातं उलगडून दाखवलं आहे.महाराष्ट्राच्या मातीतल्या झणझणीत चवी असोत, भारताच्या विविध प्रांतांमधील स्ट्रीट फूड असो किंवा जागतिक स्तरावरील खाद्यसंस्कृती… सुकीर्त यांचा हा प्रवास तुमच्या तोंडाला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही.त्यांच्या नजरेतून (आणि जिभेचे चोचले पुरवत!) जग कसं पाहायचं, हे जाणून घेण्यासाठी हा एपिसोड नक्की पाहा.पूर्ण एपिसोड आता उपलब्ध आहे.वीणा वर्ल्डच्या Spotify चॅनेलला follow करा!Welcome to the final episode of the 'Around The World' podcast for 2025!For most, food is a necessity but for some, it is an emotion. In this episode, host Neil Patil sits down with one such passionate foodie and popular YouTuber, Sukirt Gumaste.For Sukirt, travel planning doesn’t start with ‘where to go’, but with ‘what to eat’! In this conversation, he dives deep into the profound connection between food and human emotion.Whether it’s the spicy, rustic flavors of Maharashtra, the vibrant street food across India, or culinary gems from around the world, Sukirt’s journey is sure to leave you craving for more.Tune in to discover how to see the world through the lens of a true foodie.Listen to the full episode now! Don’t forget to follow Veena World’s Spotify channel.Credits:Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd.Production House: Evertale Studios
'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे!या भागात, होस्ट वीणा पाटील यांच्यासोबत गप्पा मारत आहेत डॉ. आनंद नाडकर्णी. एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतोच, पण या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत त्यांच्यातील संवेदनशील ‘प्रवाशाला’.कोणार्कच्या सूर्यास्तासमोर किंवा जैसलमेरच्या वाळवंटात त्यांना स्वतःशी संवाद कसा साधता येतो? तुर्कस्तान, स्पेन ते भूतान आणि आफ्रिका… ‘निवांत’ प्रवासाची त्यांची पद्धत कशी असते?केवळ फोटोग्राफी नाही, तर ‘स्केचिंग’मुळे प्रवासाचा आनंद घेण्याची त्यांची दृष्टी कशी बदलली, याचे सुरेख किस्से त्यांनी या एपिसोडमध्ये शेअर केले आहेत.प्रवासाने त्यांना कसं घडवलं, लेखक आणि कवी होण्यात प्रवासाचा वाटा काय, आणि भारतीय जंगलांमधील सफारी हे ‘मनःशांती’चं साधन कसं ठरू शकतं… यावर झालेला हा मनमोकळा संवाद.आणि हो, प्रत्येक प्रवाशासाठी त्यांनी दिलेली खास ‘पंचसूत्री’ नक्की ऐका!संपूर्ण एपिसोड नक्की पाहा.वीणा वर्ल्डच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा.Welcome to a new episode of the 'Around The World' podcast!In this episode, host Veena Patil engages in a profound conversation with Dr. Anand Nadkarni. We know him as a renowned psychiatrist, but here we meet the sensitive ‘traveler’ within him.How does he connect with his inner self while watching a sunset at Konark or sitting in the deserts of Jaisalmer? From Turkey and Spain to Bhutan and Africa, Dr. Nadkarni shares his philosophy of ‘slow and leisure’ travel. He beautifully narrates how sketching during his journeys—rather than just photography—has transformed the way he absorbs travel experiences.Discover how travel played a role in shaping him as an author and poet, why he considers jungle safaris a true source of ‘Manahshanti’ (mental peace), and don’t miss the special ‘Panchasutri’ (5 Commandments) he shares for every traveler.Credits:Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd.Production House: Evertale Studios
'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे!या भागात, वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील संवाद साधत आहेत ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्याशी.त्यांचा प्रवास हा फक्त ठिकाणांना भेट देण्यापुरता मर्यादित नाही, तर तो तिथल्या समाजाचा आणि संस्कृतीचा अभ्यास आहे. पाश्चिमात्य देशांतील शिस्त आणि शहरांचे नियोजन त्यांना का भावते? 'रस्त्यांवरील ट्रॅफिक' आणि 'माणसांचे वागणे' यांचा एकमेकांशी काय संबंध असतो? यावर त्यांनी अत्यंत मार्मिक भाष्य केले आहे.तसेच, एक पत्रकार म्हणून जग फिरताना आलेले अनुभव ते भारताच्या जंगलात मिळणारी शांतता... गिरीश कुबेर यांच्या प्रवासाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे हे विविध पैलू नक्की पाहा.वीणा वर्ल्डच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा.Welcome to a new episode of the 'Around The World' podcast!In this episode, host Veena Patil engages in a thought-provoking conversation with Senior Journalist Girish Kuber.His travels go beyond sightseeing; they are an exploration of society and human behavior. Why does he admire the discipline and city planning of the West? What is the deep connection between ‘traffic behavior’ and a region’s culture? Girish Kuber shares his insightful views.From his global expeditions as a journalist to finding peace in the forests of India, join us as we explore the many fascinating sides of his journey.Listen to the full episode now!Credits:Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd.Production House: Evertale Studios
'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! या भागात, होस्ट सुनीला पाटील यांच्यासोबत गप्पा मारत आहेत आपल्या सर्वांची लाडकी गिरीजा ओक गोडबोले. आपण त्यांना 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखतो, पण या पॉडकास्टमध्ये तुम्हाला भेटेल एक 'लहरी' आणि जबाबदार 'सोलो ट्रॅव्हलर' गिरीजा. या गप्पांमध्ये त्यांनी महिला पर्यटकांच्या सुरक्षेबद्दल (Women's Safety) खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत, जे प्रत्येक सोलो ट्रॅव्हलरने ऐकलेच पाहिजेत. प्रवास नेहमीच सुखद असतो असं नाही. स्पेनमध्ये पाकीटमारीचा एक 'कटू अनुभव' (Bad experience) त्यांना आला. पण तरीही न खचता, त्यांनी त्या ट्रिपची फक्त 'सकारात्मक बाजू' (Positive side) कशी बघितली आणि आपला आनंद कसा शोधला, हे ऐकण्यासारखे आहे. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट? इतकं देश-विदेशात फिरूनही, त्यांच्या 'ट्रॅव्हल बकेटलिस्ट'वर पहिल्या क्रमांकावर कोणतं ठिकाण आहे माहित आहे? - 'आपला महाराष्ट्र'! स्वतःच्या राज्यात इतकं फिरूनही अजून खूप काही बघायचं बाकी आहे, असं त्यांना का वाटतं? तर अलीकडेच भारताची नॅशनल क्रश ठरलेल्या ह्या हरहुन्नरी अभिनेत्रीच्या सोलो ट्रॅव्हलिंगच्या अनुभवांपासून, जिम कॉर्बेटच्या जंगलातल्या गप्पांपर्यंत... हा पॉझिटिव्ह आणि 'बबली' एपिसोड नक्की पाहा! वीणा वर्ल्डच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा. Welcome to Episode 7 of the 'Around The World' podcast! In this episode, host Sunila Patil chats with the vibrant Girija Oak Godbole. While the world knows her as the 'National Crush', this conversation reveals her side as a 'Lahari' (impulsive) and thoughtful Solo Traveler. Girija dives deep into the realities of traveling alone, sharing pertinent points about safety that every woman traveler should hear. Travel isn't always perfect. Girija opens up about a tough experience in Spain where she faced a pickpocketing incident. Despite this, she shares how she chose to look at the "brighter side" of travel, refusing to let one bad moment ruin her journey. And the biggest surprise? After traveling across the globe, guess what tops her bucket list? It’s exploring the depths of her own home state, 'Aaplaa Maharashtra'! She explains why, despite being a local, she feels there is still so much magic left to discover right here. So get ready to see the happy and bubbly side of this multi-talented actress who has recently been hailed as India’s new national crush, and to hear her fantastic travel stories! Watch the full episode now! Subscribe to Veena World's YouTube channel. Credits: Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd. Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd. Production house: Evertale Studios
'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे!आजच्या भागात, होस्ट नील पाटील गप्पा मारत आहेत 'द ऑर्किड हॉटेल्स' चे CEO—विशाल कामत यांच्याशी. विशाल कामत हे नाव फक्त एका हॉटेलिअरचं नाही, तर जबाबदार पर्यटन रुजवणाऱ्या एका विचाराचं आहे.या गप्पांमध्ये त्यांनी उलगडला आहे 'ऑर्किड' चा प्रवास — जो फक्त बिझनेस नाही, तर निसर्गाला परत देण्याचा एक वसा आहे. मग ते टर्टल कॉन्झर्व्हेशन असो किंवा कोरोना काळात भारतीयांना क्वारंटाइन करण्यासाठी दिलेली सेवा असो—त्यांची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे. पण या ‘सीईओ’ च्या कोट-सूटच्या मागे एक अस्सल ‘प्रवासी’ दडलेला आहे!ईशान्य भारत आणि नागालँडच्या 'हॉर्नबिल फेस्टिव्हल'चा अनुभव सांगताना त्यांना आपल्या देशाबद्दल वाटणारा अभिमान स्पष्ट दिसतो. एका बाजूला बँकॉक आणि न्यू यॉर्कच्या रस्त्यांवर झालेले स्कॅम्स,तर दुसऱ्या बाजूला कन्याकुमारी ते जवाईचे अचानक ठरलेले प्लॅन्स—हे ऐकताना त्यांची प्रवासाची आवड दिसून येते. वयानुसार आणि परिस्थितीनुसार माणसाचा प्रवासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलत जातो,हे त्यांनी अतिशय सुंदर रित्या मांडलं आहे.विशाल कामत यांचा साधेपणा आणि त्यांचे अनुभव तुम्हाला नक्कीच विचार करायला लावतील. संपूर्ण एपिसोड नक्की ऐका!--- Welcome to a new episode of the 'Around The World' podcast!In this episode, host Neil Patil sits down with Vishal Kamat, CEO of 'The Orchid Hotels'. Vishal Kamat is not just a hotelier; he is a pioneer of sustainable and eco-luxury tourism.In this heartfelt conversation, he opens up about how 'The Orchid' is more than just a business—it’s about giving back to society and the environment. He shares inspiring stories about their turtle conservation projects and the fulfilling experience of serving quarantined Indians during the COVID pandemic. But beyond the boardroom, there is a passionate traveller in him!He shares how his travels to North East India and the Hornbill Festival in Nagaland instilled a deep sense of patriotism in him. He also recounts his candid stories of getting scammed in Bangkok and New York, his impromptu travel plans to places like Jawai, and his profound thoughts on how travel evolves with age. Listen to the full episode now!
'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! या भागात, होस्ट वीणा पाटील यांच्यासोबत गप्पा मारत आहेत डॉ. संदेश मयेकर – ज्यांना 'Father of Aesthetic Dentistry in India' म्हणून ओळखले जाते. एका सामान्य प्रवासापासून ते जागतिक स्तरावरील या क्षेत्राचे नेतृत्व करण्यापर्यंतची त्यांची कहाणी, या मनमोकळ्या संवादात उलगडते. जगभरात ज्ञान आणि व्यवसाय वाढवण्यासाठी केलेले प्रवास, प्रवासातून त्यांना मिळालेले नवे 'नेटवर्किंग' आणि 'बिझनेस' करण्याची संधी, तसेच 'मेडिकल टुरिझम' याबद्दलचे त्यांचे अनुभव ते शेअर करतात. जगात अनेक ठिकाणी प्रवास करूनही भारतावर असलेले त्यांचे प्रेम आणि योगदान देण्याची त्यांची इच्छा, याबद्दल डॉ. मयेकर अत्यंत प्रांजळपणे बोलतात. प्रवासाच्या एका नवीन, वैयक्तिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनासाठी हा संपूर्ण एपिसोड नक्की पाहा! वीणा वर्ल्डच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा. Welcome to a new episode of the 'Around The World' podcast! In this episode, host Veena Patil is in a candid conversation with Dr. Sandesh Mayekar, widely recognized as the 'Father of Aesthetic Dentistry in India'.The discussion explores his inspiring story, starting from humble beginnings to becoming a global leader in aesthetic dentistry. He shares his personal experiences covering his extensive travels worldwide for knowledge and business, how travel created new 'networking' and 'business' opportunities, and his insights on 'Medical Tourism'.Despite the demands of his high-profile work, travel remains his true passion. Dr. Mayekar speaks sincerely about his deep love for India and his strong desire to contribute most to his country. Don't miss the full episode for a fresh, personal, and professional perspective on travel! Subscribe to Veena World's YouTube channel. Credits: Client: Veena World Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd.Production house: Evertale Studios
Welcome to a new episode of the 'Around The World' podcast!On the occasion of Children's Day, our guest is Rohan Mapuskar. He's a renowned Casting Director and Director of 'April May 99' (a film celebrating children and Konkan)... but beyond that, he's an incredible storyteller with a deep love for his roots.This casual chat explores his personal memories from his village in Konkan, his passion for road trips across India, his favourite hidden food joints, and what travel truly means to him.The conversation also touches on his magical ability to showcase destinations, like Ladakh in '3 Idiots' or the stunning Konkan in 'April May 99', and why these places are so special to him. Get a unique perspective on travel through the eyes of a master storyteller.Watch the full episode now!Subscribe to Veena World's YouTube channel.Credits: Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd.Production house: Evertale Studios
‘Around The World’ पॉडकास्टच्या नवीन भागात आपले स्वागत आहे! या भागात होस्ट नील पाटील यांच्यासोबत इंद्रनील चितळे मनमोकळ्या गप्पा मारतायत. ‘चितळे बंधू’ या प्रतिष्ठित मराठी ब्रँडचे तरुण CEO म्हणून त्यांची ओळख आहे; पण त्यांच्या प्रवासाची आवड आणि जाण तितकीच प्रेरणादायी आहे. या सखोल संवादात ते कामामुळे त्यांना जगभर फिरण्याची संधी कशी मिळाली हे सांगतायत. बिझनेस ट्रॅव्हलर, कुटुंबवत्सल प्रवासी आणि सोलो ट्रॅव्हलर म्हणून त्यांचे वेगवेगळे अनुभव ते उलगडतायत. एवढंच नव्हे, तर जागतिक स्ट्रीट फूड, बाईकिंगची त्यांची आवड, आणि भारत तसेच परदेशातील आवडीची ठिकाणं - अशा अनेक विषयांवर ते बोललेयत. स्कूबा डायव्हिंग, बाईकिंग आणि कॅम्परव्हॅन प्रवास यांसारख्या त्यांच्या साहसी गोष्टी खरंच ऐकण्यासारख्या आहेत. हा ‘मिलेनियल-टू-मिलेनियल’ एपिसोड प्रवासप्रेमींसाठी पर्वणी आहे. दोन प्रतिष्ठित मराठी व्यवसायांच्या पुढच्या पिढीचे प्रतिनिधी - नील पाटील (वीणा वर्ल्ड) आणि इंद्रनील चितळे (चितळे बंधू) - एकत्र आले की प्रवासाच्या गप्पा आणखी उंचावतात. संपूर्ण भाग नक्की पाहा! वीणा वर्ल्डच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा.--------------------------------------------------------Welcome to a new episode of the ‘Around The World’ podcast! In this episode, host Neil Patil is in conversation with Indraneel Chitale. While many know him as the young CEO of the iconic Marathi brand Chitale Bandhu, his passion for, and knowledge of, travel are just as inspiring. In this deep dive, Indraneel talks about how his work has taken him around the world. He shares his experiences as a business traveller, a family man, and a solo traveller. He also touches on many topics - from global street food to his love for biking, plus his favourite destinations in India and abroad. His adventurous side, including scuba diving, biking, and campervanning, makes for some fascinating stories. This millennial-to-millennial episode is a treat for travel lovers. When the next-gen representatives of two iconic Marathi businesses - Neil Patil (Veena World) and Indraneel Chitale (Chitale Bandhu), sit down together, the conversation reaches a new level. Neil hosts Indraneel in this special episode. Don’t miss it. Credits: Client: Veena Patil Hospitality Pvt. Ltd. Agency: Till It Clicks Studio Pvt. Ltd. Production House: Evertale Studios
वीणा वर्ल्डच्या Around The World पॉडकास्टच्या या भागात आपल्यासोबत आहेत मराठी चित्रपट, मालिका आणि नाट्यसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री कविता मेढेकर! या खास भागात कविता मेढेकर ह्यांनी त्यांच्या अभिनय प्रवासातून मिळालेल्या जग फिरण्याच्या भन्नाट अनुभवांबद्दल अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत.मराठी नाटकांच्या प्रयोगांमुळे जगभर फिरायची मिळालेली संधी, परदेशात त्यांना करायला आवडणारी शॉपिंग, आणि जेटलॅगवरचे त्यांचे हटके उपाय - सगळंच एकदम मजेशीर! अमेरिका-इस्रायलपासून ते महाराष्ट्रातील छोट्या गावापर्यंतच्या या अफाट भटकंतीने त्यांना मिळालेला मोठा दृष्टिकोन, प्रवासात स्वतःसाठी वेळ काढण्याचे त्यांचे खास तंत्र, आणि आवडते परदेशी खाद्यपदार्थ - हे सगळं त्यांनी अगदी मोकळेपणाने सांगितलं आहे. तुम्हाला या गप्पांमधला कोणता किस्सा सर्वात भारी वाटला? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा! -----------------------In this episode of Veena World’s Around The World Podcast, we are joined by the super talented Marathi film, TV, and theatre actress - Kavita Medhekar! In this fun and heartfelt conversation, Kavita opens up about all the incredible travel experiences she’s had through her acting journey.From performing Marathi plays around the world to her favourite kind of shopping abroad, and even her personal tricks to beat jet lag - she shares it all with a smile! From the US and Israel to the smallest towns of Maharashtra, this journey has given her a whole new perspective on the world. She also talks about how she manages to find ‘me time’ even while travelling for work and, of course, her go-to food picks when she’s abroad. Listen to the entire episode now!Credits:Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd.Production house: Evertale Studios#AroundTheWorld #VeenaWorld #KavitaLad #sunilapatil #kavitamedhekar #PodcastSeries #Episode2 #TravelStories
Veena World च्या 'Around The World' पॉडकास्टच्या पहिल्या-वहिल्या भागात रंगणार आहेत खास गप्पा. सोबतीला आहेत, माननीय श्री. राज ठाकरे!एक पर्यटनप्रेमी व्यक्तिमत्व असलेले श्री. राज ठाकरे या भागात त्यांचे स्वतःचे जगभरातील अनुभव मोकळेपणाने सांगतायत, जिथे त्यांनी केवळ विविध देशांच्या संस्कृती जाणून घेतल्या नाहीत, तर त्या समाजांची दूरदृष्टी आणि विचारसरणीही जवळून अनुभवली. त्यांचा प्रवास म्हणजे फक्त भटकंती नसून, त्यात एक ठोस उद्देश आणि व्यापक दृष्टी आहे. आणि हो, त्यांचे प्रवासातले खास किस्से त्यांच्या 'ठाकरे' शैलीत ऐकायला तर मिळणारच आहेत! प्रवासाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देणारा हा संपूर्ण एपिसोड नक्की बघा. तुम्हाला या गप्पांमधला कोणता विचार सर्वात जास्त भावला? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा!-------------------------------------------------------------------------------------------------------In the inaugural episode of Veena World's 'Around The World' podcast, we're joined by a very special guest for an exclusive conversation: the Honorable Shri. Raj Thackeray!In this episode, Shri. Raj Thackeray walks us through his journeys across India and the world. He views the world not just as a tourist, but as a conscious observer and an artist. He candidly shares his vision for India's progress, inspired by the development he has witnessed in other countries.And of course, get ready to hear some of his fascinating travel anecdotes, told in his signature 'Thackeray' style!For him, travel isn't just about visiting destinations; it's a transformative experience with the power to change individuals and society. Don't miss this episode for a whole new perspective on what it means to travel.What was your biggest takeaway from the conversation? Let us know in the comments below!Credits:Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd.Production house: Evertale Studios#VeenaWorld #ShriRajThackeray #RajThackeray #AroundTheWorld #PodcastSeries #WorldTourismDay2025 #TravelStories #VisionForIndia




















