Discover
Life of Stories
Life of Stories
Author: Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Subscribed: 4Played: 11Subscribe
Share
© 2025 Life of Stories
Description
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
1918 Episodes
Reverse
Send us a text अभ्यासात असे आढळून आले आहे की त्याच्या निर्मितीमागील टेथिस समुद्र हे आता नामशेष झाले आहे. टेथिस समुद्राच्या मृत्यूनंतर हिंद महासागराचे रहस्यमय गुरुत्वाकर्षण छिद्र तयार झाल्याचे शास्त्रशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. टेथिस समुद्र एकेकाळी पृथ्वीच्या कवचाचा भाग होता, परंतु 180 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवरील गोंडवाना या प्रदेशाच्या विघटनादरम्यान तो युरेशियन प्लेटच्या खाली गाडला गेला होता. अशाप्रकारे पृथ्वीच्या कवचाचे तुकडे या आवरणाखाली बुडाले. गोंडवाना हा एक प्राचीन महाखंड होता, जो १८० ...
Send us a text एकदा स्वर्गलोकांत ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांचे आपापसात श्रेष्ठ कोण यावरून कडाक्याचे भांडण जुंपले. तत्पूर्वी ब्रह्मदेवाला पाच शिरे होती. या दोघांच्या वादावर शंकरांनी तोडगा काढावा आणि निर्णय घ्यावा, तसेच दोन्ही देवांत ब्रह्मरूप कोणाचे हाही वाद उद्भवला. तेव्हा देवऋषी नारदांनी दोन्ही देवांना बदरीकाश्रमांत जाऊन तेथील महामुनींची भेट घेऊन या शंकेचे निरसन व्हावे यासाठी पाठविले. परंतु शिव हेच ब्रह्मस्वरूप आहेत, असे महामुनींनी सांगितलेले दोन्ही देवांना पटले नाही, मग पुन्हा ते ‘चार वेद...
Send us a text आम्ही सर्व उद्योजक आहोत. आम्ही अशी अनेक मशीन्स बघितली आहेत. तेथे गेलो होतो ,त्याला कारण म्हणजे त्या कारखान्याचे वेगळेपण पाहायचे होते. कारण तेथे एकंदर सव्वादोनशे कामगारांपैकी जवळजवळ पासष्ट कामगार गतिमंद होते. त्यांतील काही तर मतिमंद म्हणता येतील असे होते आणि तेच सुभाष चुत्तर यांच्या कारखान्याचे वैशिष्ट्य होते. व्यवस्थापकांनी आम्हाला असेम्ब्ली सेक्शन दाखवला. तेथे ‘फोर्स’ मोटरच्या गाड्यांच्या दरवाज्यांसाठी हिंजेस (बिजागरी) असेम्बल केली जात होती. तेथे तर सर्वच कामगार मतिमंद होते, इ...
Send us a text लग्नानंतर आठ महिन्यांनी अंजलीचा भारतातून अमेरिकेमधे झालेला प्रवास खूप अडथळ्यांचा होता. 21 तासात पूर्ण होणाऱ्या प्रवासासाठी तिला तीन दिवस लागले. ह्या प्रवासात तिला माणुसकीचे अनोखे दर्शन घडले. ऐकूया तिच्या शब्दात तिचा तो 41 वर्षापूर्वीचा परंतु अजूनही ताजा असलेला अनुभव.
Send us a text तुम्ही तुमचा सकाळचा कॉफीचा मग कसा उचलता, डाव्या हाताने की उजव्या? आपण अगदी यांत्रिकपणे करतो ही क्रिया.. पण तरीही, कोणी न कोणी हे ठरवत असेलच ना..? मग कोण बरं ठरवतं हे? आजकाल कसं, सगळं अगदी जेनेटिक लेव्हल पर्यंत पाहिलं आणि तपासलं जातं. मग तुमचे जीन्स किती प्रमाणात हे सगळं म्हणजे, डावखुरेपण वगैरे ठरवतात याचा विचारही होऊच शकतो.
Send us a text आपल्या लहानपणी पेनमधील शाई संपली की नवी रिफील घ्यायची प्रथा होती. आता तो पेन कचऱ्यात फेकून नवा पेन घ्यायची प्रथा रुजली आहे. आज ही मी जेव्हा पेन च्या रिफिलचा शोध घेत फिरतो तर बहूतांश पेनच्या रिफीलच मिळत नाहीत. कारण तेच. मग दुप्पट किंमतीला विकले जाणारे नवे पेन कोण विकत घेईल ? या "नियोजित अप्रचलन" नावाच्या विकृत व्यापार फंड्यामूळेच.. ‘वापरा आणि फेका’ ... नावाचा 'भस्मासुर' जन्माला आला.
Send us a text भवनाथ म्हणजे तलेटी, येथील दुधेश्वर शिवमंदिरापासून प्रदक्षिणेला सुरूवात करतात. गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेऊन त्याला प्रदक्षिणा घालणे यालाच परिक्रमा करणे असे म्हणतात. पुरातन काळापासून सदर परिक्रमा चालू आहे गिरनारच्या भोवतीने पूर्ण जंगल आहे. जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे. वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही; फक्त या परिक्रमेच्या कालावधीत ५ दिवस सर्वांसाठी प्रवेश मिळतो. या जंगलात मुंगी, विंचू या पासून अगदी सिंहा पर्यंत भरपूर प्राणी आहेत, पण या ५ दिवसात हे ...
Send us a text जेव्हा थ्री गॉर्जेस धरण बांधले गेले तेव्हा यांग्त्झी नदीचे 42 बिलियन टन पाणी त्या धरणाच्या मागे समुद्रसपाटीपासून 175 मीटरपर्यंत अडवले गेले. यामुळे पृथ्वीचा जडत्वाचा क्षण थोडासा बदलला, ज्यामुळे पृथ्वीचं रोटेशन अधिक हळू होतंय. पृथ्वीचे परिभ्रमण कमी झाल्यामुळे, एका दिवसाची वेळ 0.06 मायक्रोसेकंदने वाढली आहे. म्हणजेच दिवस आता काही क्षणांनी मोठा झाला आहे. थ्री गॅार्ज डॅमच्या बांधकामामुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुव देखील आपापल्या ठिकाणाहून प्रत्येकी 2 सेंटीमीटर सरकले आहेत असेही म्हट...
Send us a text आयुष्यात, तुम्हाला अधूनमधून साप चावणारच. इथे साप हे एक रुपक आहे. कोणीतरी तुमचा विश्वासघात करतो. जोडीदार खोटे बोलतो. कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्याशी गैरवर्तन करतो. मित्र तुम्हाला निराश करतो. सहकारी तुमच्या कामाचे श्रेय घेतो. तुमच्या कामाचे तुम्हाला बक्षीस मिळत नाही. हेच ते चावणारे साप..!!
Send us a text नंतर गोविंद पंत उभे राहिले, "सदाशिवने सांगितले आम्ही आता जेष्ठ आहोत. अहो, पण आपल्यातल्या बऱ्याच जणांचा बालीशपणा अजूनही आहे. आयुष्य सुंदर जगायचं तर तो खूप फायद्याचा असतो. आम्ही सुरुवातीला फक्त चार जण होतो आणि तेही पुरुषच. पण आता ह्या दोन वर्षात आपला समूह केवढा मोठा झाला बघा! त्याला कारणही ह्या सर्व आपल्या मैत्रिणी. ह्या ग्रुप मधे वेगवेगळे उपक्रम राबवतात. महिन्यातून चार पाच वेळा आपल्या खवय्या पार्ट्या असतात. त्यात आम्ही पुरुष कधी स्वयंपाक घरात घुसलो नव्हतो, आता मस्त डिशेस बनवतो. ...
Send us a text आपल्या आतड्यात 100 ट्रिलियनपेक्षा जास्त सूक्ष्मजंतू (बॅक्टेरिया) असू शकतात, जे 300 ते 1000 पेक्षा जास्त प्रजातींचे असू शकतात, आणि त्यांचे एकत्रित वजन सुमारे 1 ते 2 किलोग्रॅम (एका मोठ्या मांजरीएवढे) असू शकते. हे सूक्ष्मजंतू पचनक्रिया, रोगप्रतिकारशक्ती आणि शरीरातील जीवनसत्त्वे तयार करण्यात मदत करतात, आणि ते चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे असू शकतात, जे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत, आणि आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत कारण ते आपल्या जगण्याच्या प्रयत्नांमध्ये ...
Send us a text "प्रेमात पडल्यावर अनेक निर्णय भावना आणि मोहाने घेतले जातात . पण आयुष्यात खरं समाधान हवं असेल, तर काही वेळा फक्त प्रेम पुरेसं ठरत नाही. अशा वेळी मनातला आतला आवाज ऐकावा लागतो… आणि त्यानुसार पाऊल टाकण्यासाठी धाडसही दाखवावं लागतं."
Send us a text खरेतर बाबा आमटे म्हणाले होते “देश उभा करायला आणि बुडती नाव वाचवायला समुद्रात झोकून देणारे कॅप्टन हवे असतात.” हे कॅप्टन अंगमेहनती असले पाहिजेत, तासंतास एकाग्रचित्त होऊन वाचन करणारे अभ्यास करणारे विचारवंत असले पाहिजेत. रात्रंदिवस प्रयोगशाळेत प्रयोग करणारे शास्त्रज्ञच जपान-जर्मनीसारखे बेचिराख झालेले देश राखेतून उभा करू शकतात. पण आमचे जेंझी आणि अल्फा ज्यांच्यावर मिलनियल्सच्या म्हातारपणाच्या अपेक्षा आहेत त्यांची एकाग्रता पंधरा सेकंदावर आली आहे. आता पुढच्या पिढीतून कुठले अब्दुल...
Send us a text सन १८१७ मध्ये फ्रेंच चिकित्सक हेन्री ड्युट्रोचेट यांनी त्वचेच्या प्रत्यारोपणावर गॅझेट डी सांतेच्या संपादकाला एक पत्र लिहिले होते जे भारतात तैनात असलेल्या त्यांच्या मेहुण्याच्या कथेवर आधारित आहे. पत्रानुसार, सैन्याच्या अधीनस्थ व्यक्तीला त्याचे नाक कापून शिक्षा देण्यात आली होती. त्या माणसाने त्वचेचे ग्राफ्टिंग करण्यात पारंगत असलेल्या स्थानिक लोकांचा शोध घेतला आणि त्याच्या नाकाची शस्त्रक्रिया करून पुनर्बांधणी केली. ड्युट्रोचेटच्या पत्राच्या सत्यतेबद्दल अनिश्चितता असली तरी शेकडो वर...
Send us a text पहाटेच्या सुमारास आजोबांचा श्वास मंदावत गेला आणि थोड्याच वेळात तो थांबला. मेजरने नर्सला जाऊन सांगितले. मेजरने तिला विचारले, “कोण होते ते?” ते माझे वडील नव्हते. मी त्यांना याआधी कधीच पाहिले नव्हते.” नर्स अधिकच गोंधळली. “मग मी तुम्हाला त्यांच्या जवळ घेऊन गेले तेव्हा तुम्ही काही का नाही बोललात?” तिने विचारले. मेजर म्हणाले , “तेव्हाच मला कळले होते की काहीतरी चूक झाली आहे. पण मला हेही माहीत होते की त्यांना त्यांच्या शेवटच्या घडीत त्यांच्या मुलाची गरज आहे, आणि त्यां...
Send us a text तितक्यात मी एक विलक्षण दृश्य बघितले. एक सहा फुट उंच, रुबाबदार अशी व्यक्ती तिथे आली, पटकन जमिनीवर खाली एक गुडघा टेकवून बसली, सॅमचा हात आपल्या दोन्ही हातांनी प्रेमाने धरून त्यांनी तो हात स्वतःच्या डोक्याला आणि ओठाना लावला, अतिशय मृदू आवाजात नम्रपणे ती व्यक्ती सॅम सरांबरोबर बोलत होती. खाली जमिनीवर अगदी सॅम सरांच्या पायाशी बसून त्यांचा संवाद चालू होता.
Send us a text ‘अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला’ ही बहिणाबाई चौधरी यांची कविता आपण सर्वांनी ऐकलेली आहे. परंतु, वास्तवात मादी नव्हे तर नर सुगरण पक्षी काडी-काडी जमा करून खोपा विणतो आणि मादीला आकर्षित करतो. त्याच झाडाच्या वेगवेगळ्या फांद्यांना किंवा झाडांना तो किमान दोन तर कमाल आठ ते दहा घरटी बांधतो.
Send us a text भगवंत म्हणले, "पाप काय आहे हे दुर्योधनच काय, तूही जाणतोस. तुला माहीत आहे ‘हे हेल्दी नाही’ तरीसुद्धा तू जेवण निवडताना तळण, चीज, ब्रेड, पिझ्झा, बर्गर असं जिभेला आवडणारं तेच निवडतोस." "तुला रात्री झोपायची वेळ कळते. सकाळी उठायचं महत्वही कळतं. पण तरीही रात्र–रात्र जागून सिनेमे, सीरियल्स, रील्स पाहत बसतोस." "दुर्योधनाने माझं सांगणं ऐकलं…पण आपल्यात बदल करायचा नाकारला." "तुझे तरी वेगळे कुठय? आई, बाबा, आपले मन यांचे ऐकलेस कधी?......" ================
Send us a text या स्टेशनचा एकमेव नियमित प्रवासी होती हायस्कूलमध्ये शिकणारी काना हराडा. तिच्या शिक्षणासाठी प्रवासाचा हा एकमेव मार्ग होता. स्टेशन बंद झालं असतं, तर तिची शाळाच बंद पडली असती. हे लक्षात येताच जपानी रेल्वेने आपला स्टेशन बंद करण्याचा निर्णय ३ वर्षे थांबवला....
Send us a text हजारो वर्षे पोलियो सक्रिय परंतु स्थिर अवस्थेत अस्तित्वात होता. १८८० नंतर पोलियोच्या साथींचे युरोपामध्ये मोठे उद्रेक होऊ लागले आणि नंतर लगेचच अमेरिकेत पोलियोच्या साथीचा प्रसार झाला. १९१० पर्यंत जगात पोलियोचा खूपच प्रसार झाला होता, आणि त्याच्या साथींचा उद्रेक ही अगदी नेहेमीची घटना होऊ लागली. या साथींमुळे हजारो मुले आणि प्रौढ व्यक्ती अपंग झाल्या, व यामुळे पोलियोवर उपायकारक लस शोधण्यासाठी 'महाशर्यत' सुरू होण्यास जोर मिळाला.



