DiscoverLife of Stories
Life of Stories
Claim Ownership

Life of Stories

Author: Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Subscribed: 4Played: 11
Share

Description

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

1893 Episodes
Reverse
Send us a text अभ्यासात असे आढळून आले आहे की त्याच्या निर्मितीमागील टेथिस समुद्र हे आता नामशेष झाले आहे. टेथिस समुद्राच्या मृत्यूनंतर हिंद महासागराचे रहस्यमय गुरुत्वाकर्षण छिद्र तयार झाल्याचे शास्त्रशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. टेथिस समुद्र एकेकाळी पृथ्वीच्या कवचाचा भाग होता, परंतु 180 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवरील गोंडवाना या प्रदेशाच्या विघटनादरम्यान तो युरेशियन प्लेटच्या खाली गाडला गेला होता. अशाप्रकारे पृथ्वीच्या कवचाचे तुकडे या आवरणाखाली बुडाले. गोंडवाना हा एक प्राचीन महाखंड होता, जो १८० ...
Send us a text एकदा स्वर्गलोकांत ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांचे आपापसात श्रेष्ठ कोण यावरून कडाक्याचे भांडण जुंपले. तत्पूर्वी ब्रह्मदेवाला पाच शिरे होती. या दोघांच्या वादावर शंकरांनी तोडगा काढावा आणि निर्णय घ्यावा, तसेच दोन्ही देवांत ब्रह्मरूप कोणाचे हाही वाद उद्भवला. तेव्हा देवऋषी नारदांनी दोन्ही देवांना बदरीकाश्रमांत जाऊन तेथील महामुनींची भेट घेऊन या शंकेचे निरसन व्हावे यासाठी पाठविले. परंतु शिव हेच ब्रह्मस्वरूप आहेत, असे महामुनींनी सांगितलेले दोन्ही देवांना पटले नाही, मग पुन्हा ते ‘चार वेद...
Send us a text आम्ही सर्व उद्योजक आहोत. आम्ही अशी अनेक मशीन्स बघितली आहेत. तेथे गेलो होतो ,त्याला कारण म्हणजे त्या कारखान्याचे वेगळेपण पाहायचे होते. कारण तेथे एकंदर सव्वादोनशे कामगारांपैकी जवळजवळ पासष्ट कामगार गतिमंद होते. त्यांतील काही तर मतिमंद म्हणता येतील असे होते आणि तेच सुभाष चुत्तर यांच्या कारखान्याचे वैशिष्ट्य होते. व्यवस्थापकांनी आम्हाला असेम्ब्ली सेक्शन दाखवला. तेथे ‘फोर्स’ मोटरच्या गाड्यांच्या दरवाज्यांसाठी हिंजेस (बिजागरी) असेम्बल केली जात होती. तेथे तर सर्वच कामगार मतिमंद होते, इ...
Send us a text लग्नानंतर आठ महिन्यांनी अंजलीचा भारतातून अमेरिकेमधे झालेला प्रवास खूप अडथळ्यांचा होता. 21 तासात पूर्ण होणाऱ्या प्रवासासाठी तिला तीन दिवस लागले. ह्या प्रवासात तिला माणुसकीचे अनोखे दर्शन घडले. ऐकूया तिच्या शब्दात तिचा तो 41 वर्षापूर्वीचा परंतु अजूनही ताजा असलेला अनुभव.
Send us a text तुम्ही तुमचा सकाळचा कॉफीचा मग कसा उचलता, डाव्या हाताने की उजव्या? आपण अगदी यांत्रिकपणे करतो ही क्रिया.. पण तरीही, कोणी न कोणी हे ठरवत असेलच ना..? मग कोण बरं ठरवतं हे? आजकाल कसं, सगळं अगदी जेनेटिक लेव्हल पर्यंत पाहिलं आणि तपासलं जातं. मग तुमचे जीन्स किती प्रमाणात हे सगळं म्हणजे, डावखुरेपण वगैरे ठरवतात याचा विचारही होऊच शकतो.
Send us a text आपल्या लहानपणी पेनमधील शाई संपली की नवी रिफील घ्यायची प्रथा होती. आता तो पेन कचऱ्यात फेकून नवा पेन घ्यायची प्रथा रुजली आहे. आज ही मी जेव्हा पेन च्या रिफिलचा शोध घेत फिरतो तर बहूतांश पेनच्या रिफीलच मिळत नाहीत. कारण तेच. मग दुप्पट किंमतीला विकले जाणारे नवे पेन कोण विकत घेईल ? या "नियोजित अप्रचलन" नावाच्या विकृत व्यापार फंड्यामूळेच.. ‘वापरा आणि फेका’ ... नावाचा 'भस्मासुर' जन्माला आला.
Send us a text भवनाथ म्हणजे तलेटी, येथील दुधेश्वर शिवमंदिरापासून प्रदक्षिणेला सुरूवात करतात. गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेऊन त्याला प्रदक्षिणा घालणे यालाच परिक्रमा करणे असे म्हणतात. पुरातन काळापासून सदर परिक्रमा चालू आहे गिरनारच्या भोवतीने पूर्ण जंगल आहे. जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे. वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही; फक्त या परिक्रमेच्या कालावधीत ५ दिवस सर्वांसाठी प्रवेश मिळतो. या जंगलात मुंगी, विंचू या पासून अगदी सिंहा पर्यंत भरपूर प्राणी आहेत, पण या ५ दिवसात हे ...
Send us a text जेव्हा थ्री गॉर्जेस धरण बांधले गेले तेव्हा यांग्त्झी नदीचे 42 बिलियन टन पाणी त्या धरणाच्या मागे समुद्रसपाटीपासून 175 मीटरपर्यंत अडवले गेले. यामुळे पृथ्वीचा जडत्वाचा क्षण थोडासा बदलला, ज्यामुळे पृथ्वीचं रोटेशन अधिक हळू होतंय. पृथ्वीचे परिभ्रमण कमी झाल्यामुळे, एका दिवसाची वेळ 0.06 मायक्रोसेकंदने वाढली आहे. म्हणजेच दिवस आता काही क्षणांनी मोठा झाला आहे. थ्री गॅार्ज डॅमच्या बांधकामामुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुव देखील आपापल्या ठिकाणाहून प्रत्येकी 2 सेंटीमीटर सरकले आहेत असेही म्हट...
Send us a text फळवाल्या म्हातारीला कृष्ण म्हणतो, "ती सगळीच फळं मला दे. " म्हातारी आनंदली. म्हणाली, " हो हो देईन बाळा, पण मोल द्यावं लागेल." कृष्ण निरागसपणे विचारतो, "मोल म्हणजे काय ?" त्यावर ती समजावून सांगते, "लल्ला, आपण जेव्हा कोणाकडून काही घेतो, तेव्हा त्याच्या बदल्यात काही तरी देतो, त्यालाच मोल म्हणतात." कृष्णाचं बोलणं मोठं गोड आणि मन मोहून घेणारं आहे. तो तिला म्हणतो, "माझी आई तर मला रोज दही, दूध, लोणी देते. मला हवं ते सगळं सगळं देते. पण माझ्याकडून कधी काही घेत नाही. मग ती मोल का मा...
Send us a text काय अद्भुत होतं ते दृश्य! विजयी अल्फा नरने दुसऱ्याच्या मानेवर फक्त हलके दात टेकवले. चावा नाही, रक्तपात नाही . त्या क्षणी सत्तेचा प्रश्न सुटला होता. पराभूतात भेकडपणा नव्हता, विजेत्यात दया नव्हती — फक्त एक नाजूक समतोल होता. दोघांनीही एकमेकांकडे पाठ फिरवली. टोळी पुन्हा शांत झाली.
Send us a text ‘पिट्सबर्ग डिसपॅच’ या स्थानिक वृत्तपत्रात‘मुली कसल्या कामाच्या?’ अशा आशयाचा एक लेख छापून आला. अपत्यप्राप्ती करून देणे आणि घर राखणे, मुली एवढ्याच कामाच्या असे त्या लेखक महाशयांचे म्हणणे. वयाच्या जेमतेम विशीत पाऊल ठेवलेल्या एलिझाबेथने त्यावर एक खरमरीत प्रतिक्रिया लिहून पाठवून दिली. ती संपादकांना आवडली. त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रात तिला एक छोटा स्तंभलिहिण्याची संधी दिली. त्याकाळी स्त्रिया सहसा टोपणनावाने लेखन करीत. वृत्तपत्राच्या संपादकाने 'नेल्ली ब्लाय' हेच नाव टोपणनाव म्हणून दि...
Send us a text अगदी आदिमानवाच्या काळापासून उत्सव ही माणसाच्या मनाची गरज आहे. आदिमानव शोधीपारधी होता. अन्नाच्या, शिकारीच्या शोधात वणवणताना त्याला सगळीकडून शत्रूंचं, संकटांचं भय असे. त्या वेगवेगळ्या संकटांवर लक्ष ठेवायची जबाबदारी त्याच्या मेंदूतल्या एका केंद्राची होती. ते मेंदूच्या बुडाशी असलेलं बदामाच्या आकाराचं केंद्र (Amygdala) सतत धोक्याची घंटा वाजवत राही. मेंदूच्या इतर सगळ्या कर्त्याकरवत्या केंद्रांचं लक्ष नेहमी त्या बदामकेंद्रावरच खिळून असे.
Send us a text जेव्हा मोहम्मद घोरी आपल्या देशाला लुटून गजनीकडे परत गेला, तेव्हा "गजनीचे सर्वोच्च काझी व मोहम्मद घोरीचे गुरु निजामुल्क" यांनी त्याचे स्वागत आपल्या महालात केले आणि म्हणाले – "या घोरी या! आम्हाला तुझा अभिमान आहे की तू हिंदुस्थानवर विजय मिळवून इस्लामचे नाव उजळवलेस. सांग, त्या ‘सोने की चिड़ीया’ हिंदुस्थानचे किती पंख कापून आणलेस?"
Send us a text आपल्या हाताला धरून चालायला शिकलेली आपली मुलं जेव्हा मोठी होतात... शिक्षण-नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडतात तेव्हा त्यांच्या आचार-विचार-अनुभवांची कक्षा रुंदावत जाते. त्यांच्या आयुष्याच्या वाटेवर येणाऱ्या प्रत्येक बऱ्या-वाईट गोष्टीचा सामना करण्यातून ती परिपक्व होत जातात... आणि मग अशी वेळ येते जेव्हा त्यांच्या हाताला धरून आपली वाटचाल सुरू होते...
Send us a text रमेशजींचं वय आता ६५ वर्षांचं झालं होतं. वयानुसार त्यांचा स्वभावही हळूहळू बदलत चालला होता. आधी ते खूप हसतमुख आणि सर्वांशी मिसळणारे होते, पण आता त्यांच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ लागला होता. कोणत्याही छोट्या गोष्टीवर राग येणं, मुलांवर ओरडणं, किरकोळ कारणांवर नाराज होणं, हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला होता. घरच्यांना खूप त्रास व्हायचा. पत्नी विचारायची, “काय झालंय रमेशजींना? आधी इतके आनंदी असायचे, आता जरा जरी काही झालं तरी संतापतात.” मुलंही आता त्यांच्याशी बोलायला घाबरू लागली...
Send us a text 'नायट्रस ऑक्साईड' हा वायू 'लाफिंग गॅस' म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा शोध लागला तेंव्हा तो वायू हुंगण्याच्या पार्ट्या होत असत. मोठेमोठे अमीर-उमराव जेवणानंतर नायट्रस हुंगत आणि मोठ्यामोठ्याने हसत सुटत, एकमेकांच्या माकडचेष्टा करत, याने त्यांची चांगलीच करमणूक होत असे.. हे त्याकाळचे 'नाईट लाईफ'च होते म्हणा ना! असे नायट्रसचे प्रयोग 'फन फेअर्स' मध्ये देखील होत असत.. अशाच एका 'गार्डनर कोल्टन'ने 1844च्या नाताळात आयोजित केलेल्या सायन्स फन फेअर मध्ये नायट्रस हुंगून बावचळलेला एक माणूस स्टेजवर...
Send us a text मानसी जन्मतः कर्णबधिर. तिचं बधिरत्व १०५ टक्के: म्हणजे जलद लोकल जाताना होणाऱ्या आवाजाने फलाट दणाणतो तशा प्रकारच्या आवाजाला मानसीने प्रतिसाद दिला नाही. .. एके दिवशी मानसी दरवाजात उभी असताना जवळचे नातेवाईक घरी आले आणि मानसीला म्हणाले, 'ऐ बहिरे बाजूला हो... हो की बाजूला' असं दोन- तीनदा म्हणाले. त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या मनाला प्रचंड वेदना झाल्या. मी खूप रडले आणि मनाशी पक्कं केलं. माझी मुलगी बहिरी असेलही, पण सामान्य मुलांपेक्षा मोठी होईल... मी निर्धार केला, जणू पेटून उठले.....
Send us a text "आयुष्याचा वेग आपणच कमी करावा लागतो, काम कधीच संपत नसतात, आपणच ठरवून थांबायचं असत..काही बिघडत नाही चार गोष्टी झाल्या नाहीत तर ."
Send us a text "तू नाही रे महिषासुर, तू माझ्यातला महिषासुर मारला आहेस, गैरसमजा चा, रागाचा.."
Send us a text प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला एक चांगली व्यक्ती बनवायचे असते, जेणेकरून तो भविष्यात एक चांगला माणूस म्हणून घडू शकेल. जर आपण चांगल्या पालकत्वाबद्दल विचार केला, तर यामध्ये मुलाला चांगले संस्कार देणे, त्याच्या पोषणाची काळजी घेणे, मुलाच्या शारीरिक आणि मानसिक समस्या समजून घेणे इत्यादींचा समावेश होतो. मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी आपण जपानी पालकांकडून काही टिप्स घेऊ शकतो. उत्तम पालक बनणं हे खूप कठीण काम आहे. यात बरेच चढ-उतार येतात. जपानी मुले, कोणत्याही वयाची असो, त्यांच...
loading
Comments 
loading