DiscoverSports कट्टा
Sports कट्टा

Sports कट्टा

Author: Ideabrew Studios

Subscribed: 13Played: 558
Share

Description

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.
460 Episodes
Reverse
'प्रश्न तुमचे, उत्तरं आमची' ह्या सदराचा आरंभ इंडियन प्रीमियर लीगच्या 'बिझनेस एन्ड' चे औचित्य साधून करत आहोत. CCBK प्रेक्षक व श्रोत्यांचे प्रश्न अमोल कऱ्हाडकरला विचारत आहेत आमचे व्हिडिओ संकलक - एडिटर - सोहम कुरुळकर व तनिष्क मोहिते
ज्येष्ठ क्रीडामीक्षक सुनंदन लेले मेलबर्नमधून सांगत आहेत T२० वर्ल्ड कपमधील भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना खरंच पावसामुळे न होण्याचा धोका आहे? त्याचबरोबर लेले व अमोल कऱ्हाडकर करत आहेत चर्चा भारत खरंच अजिंक्यपदासाठी दावेदार आहे का, ह्या विषयावर.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंड ला 'The G' असं संबोधतात. तिथे २०२२ T२० वर्ल्ड कपचा  पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळताना रोहित शर्माच्या भारतीय संघाला कोणत्या विशेष बाबींकडे लक्ष द्यावे लागेल? MCG वर खेळायच्या आधी २००८ मध्ये धोनीने व २०१५ मध्ये रोहित व विराटने काय विशेष तयारी केली होती? आणि एक प्रेक्षक म्हणून तुम्हाला २३ ऑक्टोबर - व त्यानंतरही इतर सामन्यांमध्ये - MCG वरील सामना पाहताना कोणत्या गोष्टींवर बारीक नजर ठेवावी लागेल? सांगत आहे CCBK चा The G - गौरव जोशी - "बी. यु. भंडारी प्रस्तुत गॅवचा गुरुवार" मध्ये
शाकिब अल हसनच्या बांगलादेशकडून जेवढी निराशाजनक कामगिरीची खात्री आहे त्याच्या कित्येक पट आशा-अपेक्षांचं ओझं रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. भारताला १५ वर्षांनंतर T२० विश्वविजेता होण्यासाठी परिस्थिती खरंच अनुकुल आहे? हार्दिक पंड्या व सूर्यकुमार यादव झुकवू शकतील पारडं भारताच्या बाजूने? भारताच्या संघाचं 'बी. यु. भंडारी प्रस्तुत T२० आतषबाजी' मध्ये विश्लेषण करताना गौरव जोशी व अमोल कऱ्हाडकर देत आहेत त्यांचं प्रेडिक्शन. तुम्हाला भारत कुठवर पोहोचेल असं वाटतं ते नक्की कळवा
'होस्ट' ऑस्ट्रेलियानंतर जर एक संघ T२० विश्वचषकाचा प्रमुख दावेदार असेल तर तो म्हणजे इंग्लंड. खरंच इंग्लंड २०१० ची पुनरावृत्ती करू शकेल? जॉस बटलरला अजिंक्यपदाच्या शर्यतीत स्वतःच्या संघातील कुठले प्रमुख अडथळे पार करावे लागतील? आणि अफगाणिस्तान अखेर स्वतःची छाप वर्ल्ड कपवर सोडू शकेल? पाहूया 'बी. यु. भंडारी प्रस्तुत T२० आतषबाजी' च्या ह्या भागात
सर्वात संतुलित गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका मारू शकेल धडक T२० वर्ल्ड कपच्या बाद फेरीत? आणि पाकिस्तान टाकेल एक पाऊल पुढे गेल्या वर्षीच्या साखळी फेरीतील धडाकेदार कामगिरीनंतर? गौरव जोशी व अमोल कऱ्हाडकर टाकत आहेत नजर ह्या दोन संघांच्या ताकदी व उणीवांवर. तुमचं ह्या दोन्ही संघाचं प्रेडिक्शन नक्की सांगा आम्हाला
रोहित शर्माची फौज ऑस्ट्रेलियामध्ये पोचली आहे. भारताने पूर्वतयारीसाठी पर्थची निवड का केली?ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या देशात एक वर्ल्ड कप खेळताना काय आव्हाने आहेत? आणि साखळी स्पर्धेत प्रवास सोडून भारत खेळत असलेल्या प्रत्येक मैदानाचं वैशिष्ट्य काय आहे? ह्या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी CCBK च्या ऑस्ट्रेलियन-महाराष्ट्रीयन गौरव जोशीपेक्षा दुसरा कोणता पर्याय असेल? पाहूया "बी. यु. भंडारी प्रस्तुत गॅवचा गुरुवार"
T२० वर्ल्ड कपसाठी काहीच दिवसांचा अवधी बाकी राहिला आहे. सुरु करूया CCBK चा काऊंटडाऊन "बी. यु. भंडारी प्रस्तुत T२० आतषबाजी" सदरात. पहिल्या भागात गौरव जोशी व अमोल कऱ्हाडकर करत आहेत विश्लेषण न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया ह्या तुल्यबळ संघाचं. तुमचं ह्या दोन्ही संघाचं प्रेडिक्शन सांगा व वर्ल्ड कपच्या सफरीत आमच्याबरोबर नक्की रहा.
जवळवळ गेली ४ वर्षे हार्दिक पंड्या चुकीच्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. २०२२ मध्ये मात्र त्याने स्वतःची अष्टपैलू खेळाडूची प्रतिमा वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहे. 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये अमोल कऱ्हाडकर सांगत आहे हार्दिकच्या 'कमबॅक'ची कहाणी
अर्जुन तेंडुलकरने येत्या देशांतर्गत हंगामांत मुंबई सोडून दुसऱ्या संघाकडून खेळायचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया डोमेस्टिक क्रिकेटमधील 'ट्रान्सफर मार्केट' चे नियम 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये अमोल कऱ्हाडकरकडून
क्रिकेटचा अतिरेक हेच फक्त बेन स्टोक्सच्या ODI निवृत्तीचे कारण आहे? का तोही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दुय्यम स्थान देणाऱ्या खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसला आहे? दक्षिण आफ्रिकेतील येऊ घातलेल्या लीगमध्ये का बरं IPL संघमालकांना एवढा 'इंटरेस्ट' आला? हे आहे का सूतोवाच भारतीय खेळाडू परदेशी लीग्जमध्ये खेळताना दिसण्याचे? सांगत आहे अमोल कऱ्हाडकर 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये
राष्ट्रकुल खेळ - ऊप्स, कॉमनवेल्थ गेम्स - मध्ये महिला क्रिकेटचा समावेश कसा झाला? कुठले देश बर्मिंगहॅममध्ये तीन पदकांसाठी लढतील? आणि कोण असतील भारताचे प्रतिस्पर्धी? पाहूया 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये
१० संघ, ५८ दिवस व ७० सामन्यांनंतर इंडियन प्रीमियर लीगचा पहिला टप्पा पार पडला आहे. 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये अमोल कऱ्हाडकर निवडत आहे त्याच्या ५ बहुचर्चित घटना
कशामुळे झालं आयपीएलच्या बाद फेरीचं रूपांतर प्लेऑफ्समध्ये आणि काय आहेत इतर लीग्जमधील शेवटच्या टप्प्याचे प्रकार. जाणून घेऊया 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये अमोल कऱ्हाडकरकडून
IPL २०२२ मधील चार नव्या भारतीय कर्णधारांच्या कामगिरीचा मागोवा घेत आहे अमोल कऱ्हाडकर 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये
वाढते वय हे T२०, विशेषतः इंडियन प्रीमियर लीग, खेळण्यासाठी मारक ठरते कि पूरक? पाहूया 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये
ऑस्ट्रेलियाचे असो अथवा दक्षिण आफ्रिकेचे, वेस्ट इंडिजचे असो वा श्रीलंकेचे, परदेशी खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटऐवजी इंडियन प्रीमियर लीगला प्राधान्य देण्याचे किस्से दर वर्षी होत राहतात. टाकूया एक नजर IPL व इतर T२० लीग्जमधील आर्थिक तफावतीकडे
१८ एप्रिल २००८ ला IPL चा पहिला सामना खेळला गेला खरा, पण तुम्हाला माहित आहे कि IPL चा पाया १९९५ पासून नकळतपणे रचला गेला होता? पाहूया IPL ची सुरुवात नक्की कशी झाली अमोल कऱ्हाडकरकडून 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये
'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये गौरव जोशी समजावून सांगत आहे डेटा ऍनालिस्टची T२० क्रिकेटमधील भूमिका आणि त्यांचे वाढते महत्त्व
IPL च्या ब्रीदवाक्याला अनुसरून "CCBK एक्स्प्लेनर' मध्ये अमोल कऱ्हाडकर ओळख करून देत आहे तीन भारतीय डोमेस्टिक खेळाडू ज्यांनी IPL २०२२ मध्ये आत्तापर्यंत स्वतःची चुणूक दाखवली आहे
loading