Discover
Think Bank
14 Episodes
Reverse
क्वेस्ट (Quest) ही संस्था नक्की काय काम करते? अभिनयाबरोबर या संस्थेसाठी काम करावंसं का वाटलं? क्वेस्ट (Quest) मधून रिटायर व्हायचा निर्णय का घेतला? तरुणांनी राजकारणात यायची गरज आहे का? आपल्या शिक्षण संस्थेतच चूक आहे? समाज सेवा ही सेकंड इनिंग असते? एंटरटेनमेंट इंडस्ट्री कडे सध्याच्या जगात कसं बघता? सोशल मीडिया मुळे सेलिब्रिटीजचं आयुष्य नक्की कसं बदललं? अभिनेते कोणत्याच मुद्द्यावर ठाम भूमिका घेत नाहीयेत का? आत्ताच्या राजकीय परिस्थितीकडे बघताना तुम्हाला काय वाटतं? भारताच्या राजकारणाची भविष्यातील दिशा कशी असायला पाहिजे?
प्रख्यात अभिनेता अतुल कुलकर्णी यांची मुलाखत.
#thinkbank #filmindustry #marathifilms #atulkulkarni
प्रत्येकाने स्टॉक मार्केट मध्ये का आलं पाहिजे? शेअर मध्ये लाखाचे बारा हजार होतात का? एखादा शेअर कधी घ्यावा आणि कधी विकावा? तरुणांनी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करावी का? एखाद्या कंपनीचे मूल्य कसे ठरते? आर्थिक साक्षरता किती गरजेची आहे आणि कुठून शिकता येते? आजच्या तरुणांनी गुंतवूणक कशी आणि कुठे करावी? ४०व्या वर्षानंतर पैश्यासाठी काम करायची गरज लागायला नको या साठी काय करावे? शेअरमार्केटमधून खरंच खूप पैसा मिळतो?
"Romancing the Balance Sheet" व "Flirting with stocks" अशा आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक, कार्पोरेट ट्रेनर, फायनान्स गुरू "अनिल लांबा" यांची मुलाखत.
#sharemarket #personalfinance #finance #thinkbank
पुढील दशकातील जगासमोर कोणती आव्हाने आहेत? जगाने कोरोनाकडून कोणते धडे घेतले? आजचे राजकीय नेते संपूर्ण मानवजातीचे संरक्षण करण्यास असक्षम आहेत का? काही राष्ट्रे उग्र राष्ट्रवादाला का प्रोत्साहन देत आहेत? ट्रम्प यांना अमेरिकेतून इतका मोठा पाठींबा का मिळाला? ट्रम्प यांच्या पराभवाने आक्रमक राष्ट्रवादी ताकदीचा पराभव होईल का? पुढील दशकात कोणत्या गोष्टी देशांनी केल्या पाहिजे? २०३० चा भारत कसा असेल?
स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष व ६५ देशांचे सल्लागार संदीप वासलेकर यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत. भाग २
हे हरवलेलं दशक आहे असं का वाटतं? या दशकात अतिरेकीपणा आणि उग्र राष्ट्रवाद का वाढला? पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून हे दशक कसं होतं? न्यू स्टार्ट ट्रीटी काय आहे? जागतिक संघटना का मोडकळीस आल्या? केवळ विज्ञानातच देशाने प्रगती केली? नैतिक मूल्य असलेला जागतिक नेता का नाही? शांततेच्या दिशेने जाणाऱ्या जगाला कुठे ब्रेक लागला?
स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष व ६५ देशांचे सल्लागार संदीप वासलेकर यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत. भाग १
पोस्ट कोविड अर्थव्यवस्था कशी असेल? अर्थव्यवस्था नीट रुळावर येण्यासाठी काय करायला पाहिजे? आत्मनिर्भर भारत म्हणजे नेमका कसा? कोरोनानंतर 5 ट्रिलियन इकोनॉमी चे स्वप्न खरंच पाहावे का? चीन सोबतचे बहिष्कार धोरण किती योग्य? भारतीयांची खरेदी करण्याची क्षमता संपली आहे का? मोदी सरकारने कोणत्या क्षेत्रावर अधिक भर दिला पाहिजे? पुढील दशकतील अर्थव्यवस्थेसमोरील प्रमुख आव्हाने कोणती?
ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रदीप आपटे यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत. भाग 2








