Discoverअनुस्वाद : अनुवादांचा पॉडकास्ट | Anuswad: Translated Literature Podcast
अनुस्वाद : अनुवादांचा पॉडकास्ट | Anuswad: Translated Literature Podcast
Claim Ownership

अनुस्वाद : अनुवादांचा पॉडकास्ट | Anuswad: Translated Literature Podcast

Author: Vidula Tokekar

Subscribed: 1Played: 17
Share

Description

Conversation and appreciation of translated literature from and into Indian languages. Created by TranslationPanacea (www.translationpanacea.in). Hosted by Vidula Tokekar (https://www.linkedin.com/in/vidula-tokekar-457b221b/) and Ujjwala Barve (https://www.linkedin.com/in/ujjwala-barve-25387518/) Having delivered language editions of about 300 titles in various languages to renowned publishers, they have many translation stories and insights to share. Anuswad will help readers to appreciate translated literature better. Anuswad will also be a friend of translators of literature.
19 Episodes
Reverse
 सिनेमाशी संबंधित काहीही काम करायचं म्हटलं की भलतंच ग्लॅमरस वाटायला लागतं. सबटायटल्स हा त्यातल्या त्यात एकट्यानं करता येण्यासारखा प्रकार.  पडद्यावर आपलं नाव झळकवणारा. सबटायटल्स लिहिणं आकर्षक आणि सोपं वाटणारं. त्यातली कला, आव्हान आणि तंत्र यांची तोंडओळख या एपिसोडमध्ये करून घेऊ या. ट्रान्सलेशनपॅनाशियामध्ये  सबटायटल्स करण्याचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर careers@panaceabpo.co.in ला मेल लिहा, किंवा https://www.facebook.com/translationpanacea या आमच्या फेसबुक पेजवर कळवा.  Making subtitles seems easy and glamorous. It is equally challenging, creative and painstaking.  Let's learn about its art, challanges and technique in this episode.  If you are interested in learning about it in TranslationPanacea trainings, write to careers@panaceabpo.co.in or on our facebook page https://www.facebook.com/translationpanacea  
कुठल्याही आशयाच्या अनुवादाला सुरुवात करण्यापूर्वी काय तयारी करायलाच हवी हे या भागात ऐका. अगदी थोडा वेळ खर्च करून तुमचं भाषांतर एका वेगळ्या उंचीवर कसं जाईल याच्या दहा युक्त्या.  #translation #marathi #translationpanacea #translator  
Working with the successful translators and editors around the world, TranslationPanacea shortlisted a few habits of translators. The things that they do every day. Here are those five habits of successful translators. If you, as a translator or an editor have any more habits, please do share in the comments box. If you follow any or all of these habits, share with us how you have benefitted from them.  #translation #languageskill #translationpanacea #translationskill
Anuswad brings to you,  Kalachuvadu which means ‘Time’s footprints’ in Tamil.  Kalachuvadu Publications (https://www.kalachuvadu.in/) is a major Tamil publication that has not only blazed the trail for the finest in contemporary Tamil writing but also brought the best of world literature in translation to the doorstep of the discerning Tamil reader. Mr. Kannan Sundaram, (https://www.linkedin.com/in/kannan-sundaram-62031411/)  Publisher, editor and the inspiration behind Kalachuvadu Publications talks to Ujjwala and Vidula in this episode about · Publishing Tamil translations of non-English and minority languages contemporary literature · Translations between Indian languages · Innovative initiatives to take Tamil literature far and wide – like auctioning the translation rights and many others. An inspiration to publishers, editors and translators, Kannan Sundaram  shares the confidence that huge commercial success is possible with innovation, consistency and sticking to one’s core values.
The host is the guest! Know more about TranslationPanacea in this episode. Our thinking, feeling, actins and plans. Our team, our processes and our value addition.  And above all, our love of languages.  Dr. Ujjwala Barve talks to Vidula Tokekar, the founder director of TranslationPanacea.  To know more about TranslationPanacea, do check www.panaceabpo.co.in  www.translationpanacea.in  https://www.facebook.com/translationpanacea/ https://twitter.com/translationpan1
अनुस्वाद पर्व २ भाग ३ आपल्याला ओळख करून देत आहे आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राची. तिथल्या निसर्गरम्य वातावरणात लेखक-अनुवादक निवांतपणे अनुवाद करू शकतात, त्यांचे प्रशिक्षण वर्ग होतकरू अनुवादकांना उत्तम मार्गदर्शन करतात. त्यांची चर्चासत्रे, संवाद हे जुन्या जाणत्या अनुवादकांना आणि साहित्य-अभ्यासकांना नव्या कल्पना मांडण्यासाठी-समजावून घेण्यासाठी हवेसे वाटतात. दर चार महिन्यांनी प्रकाशित होणारं मायमावशी हे नियतकालिक अनुवादाच्या समीक्षेला, मीमांसेला वाहिलं आहे. आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राशी संपर्कासाठी / मायमावशीचे अंक मिळवण्यासाठीः email: antarbharti.ask@gmail.com ; संपादकीय संपर्कः for editorial contact:  bhasha.karm@gmail.com cell phone: 9076282392 (श्री. जोगळेकर) कार्यालयः साने गुरुजी विद्यालय, खोली क्र. २, बेसमेंट, केटरिंग कॉलेजसमोर, भिकोबा पाठारे मार्ग, दादर (प.), मुंबई-४०० ०२८ Office: Sane Guruji HighSchool, Room no. 2, Basement, opp. Catering College, Bhikoba Pathare Road, Dadar (W.), Mumbai 400028. website: www.antarbharati.org (Under repairs) Anuswad Season 2 Episode 3 introduces Antarbharati Anuwad Suvidha Kendra. Its beautiful campus offers space and peace for authors-translators to collaborate on the translation, offers trainings for budding translators and a platform for seasoned professionals to share, update and critically appreciate each other’s work. MayMavshi is the periodical run by the Kendra documenting the thinking on the subject. Dr. Ganesh Vispute shares the concept and various activities with Vidula Tokekar and Ujjwala Barve.
25 Years of a movement called 'Kelyane Bhashantar'. It can be simply described as 'A quarterly periodical dedicated to translated stories' - but every issue is powered with passion and responsibility. Passion about literature and responsibility towards the art of translation.  The stories from lands and times unknown to common Marathi readers - German, Russian, Japanese, Spanish, French and many others. Ujjwala Barve talks to Anagha Bhat and Sunanda Mahajan about selection of content, views about translation, process and the long journey.  Kelyane Bhashantar has gone far beyond than just a publication of translated stories, it has culminated into a cultural movement nurturing budding translators to live shows.  Listen on! जाणकार मराठी वाचकांमध्ये 'केल्याने भाषांतर' त्रैमासिक न वाचलेला विरळाच. फ्रेंच, जर्मन, रशियन, जपानी आणि अनेक भाषांमधून आणलेल्या गोष्टी मराठी वाचकांपर्यंत पोचवण्याचं काम 'केल्याने भाषांतर' गेली पंचवीस वर्षे करत आहे. या प्रवासाबद्दल आणि गोष्टींची निवड, प्रत्यक्ष प्रकाशन, भाषांतराबद्दलचे विचार यांबद्दल उज्जवला बर्वे बोलत आहेत या मासिकाच्या संपादक सुनंदा महाजन आणि अनघा भट यांच्याशी. आता खरं तर 'केल्याने भाषांतर' हे केवळ त्रैमासिक न राहाता एक चळवळ बनलं आहे.  credits: interview- Dr. Ujjwala Barve; audio editing- Ankita Apte; cover design- Vama Designs, Nashik; Music - Milind Tulankar2
तुमच्या आवडत्या पॉडकास्टचे दुसरे सत्र सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.  या सत्राचं स्वरूप थोडं वेगळं आहे. अनुवादाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांच्या कामाचा परिचय या सत्रात आम्ही करून देणार आहोत.  आपल्या रूढ कल्पनेपेक्षा अतिशय वेगळं आणि कालसुसंगत काम करणाऱ्या या अनुवाद-प्रेमींबरोबर मारलेल्या गप्पा आपल्याला नक्कीच आवडतील.   या भागात धातुकार्य या मासिकाचे प्रकाशक उद्यम प्रकाशनचे श्री. दीपक देवधर आपल्याला या बहुभाषिक तंत्रज्ञानविषयक  मासिकाबद्दल माहिती देत आहेत. https://www.udyamprakashan.com/  We are happy to bring to you Season 2 of your favourite podcast : Anuswad! In this season we will get to know such individuals and organisations who have been working for better translation, better awareness about translation. The first episode in this season tells us about the novel monthly mangazine 'Dhatukaam'or 'Dhatukarya'.  The magazine gives highly technical information on machining in Kannada, Hindi, Marathi, Gujarati and Tamil.  The urge behind this initiative is to bring all technical knowledge in easy, good languages for the benefit of actual machine operators, who may be skilled in their work, but more comfortable in reading and learning in their own language.  In this episode Deepak Deodhar of Udyam Prakashan (https://www.udyamprakashan.com/)2 tells us about the thought behing this multilingual technical publcation, challenges, creative solutions and the plan ahead. Listen on! 
Mills and Boon love stories are an unique genre in itself. Exciting for reading, and equally challenging for translation into an entirely different culture.  TranslationPanacea had helped the publishers with Marathi translation of 11 novels by Mills and Boon, and in this episode, the translators Sayali Godse and Minal Pawar share with us how they successfully brought all the romance and love and variety of M&B into Marathi, maintaining sensibilites of the target language. शृंगार हा साहित्यप्रकार अनुवाद करायला फार कठीण. सांस्कृतिक फरकांना झेपेल, पण वाचकाला अनोख्या दुनियेतही घेऊन जाईल हा तोल शृंगारिक साहित्याच्या अनुवादात सांभाळावा लागतो, आणि ही पुस्तकं जेव्हा अगदी सर्वसामान्य वाचकांसाठी लिहिली गेलेली असतात, तेव्हा भाषेचा सोपेपणा हा एक कोनही त्यात येतो. मिल्स अँड बून च्या अकरा प्रेमकादंबऱ्यांचा अनुवाद प्रकाशित करण्यासाठी ट्रान्सलेशनपॅनाशियाने मदत केली होती. त्यांच्या अनुवादकांशी या भागात गप्पा मारल्या आहेत. सायली गोडसे आणि मीनल पवार या दोघी अनुवादक आपल्याला सांगताहेत प्रणयकथांच्या यशस्वी अनुवादांचं रहस्य.
Leben – Marathi edition स्वीकृत एक अतिशय संवेदनशील माणूस यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतून आणि प्रत्यक्षातून जातो त्याची जर्मन भाषेतली गोष्ट आहे लेबेन आणि लेखक आहेत डाविड वाग्नर. त्याचा डॉ. सुनंदा महाजन यांनी केलेला तितकाच संवेदनशील मराठी अनुवाद काँटिनेंटल प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे.  हा अनुवाद जर्मन भाषेतून थेट मराठी भाषेत केला आहे हे विशेष. वर्षानुवर्षे आपल्यासोबत असलेला आजार, प्रत्यारोपणाच्या कल्पनेने आणि प्रत्यक्षाने आलेली मानसिक भावनिक आंदोलने, आशा-निराशा, एकटेपण, रुग्णांचीच सोबत..... या सगळ्याकडे बघण्याची जर्मन दृष्टी आणि तिचं तंतोतंत मराठीकरण. वाचकांना एक अगदी वेगळा अनुभव देणारं खिळवून ठेवणारं पुस्तक – स्वीकृत. अनुवादक सुनंदा महाजन या जर्मन भाषा तज्ज्ञ आणि अनुभवी, जागरूक अनुवादक. त्यांनी केलेला अनुवाद हा भाषांतरकारांसाठी एक वस्तुपाठ आहे. काँटिनेंटल प्रकाशनाच्या देवयानी अभ्यंकरा यांनी हे पुस्तक निवडण्यामागची कारणंही समजून घेण्यासारखी आहेत. विदुला टोकेकर आणि उज्ज्वला बर्वे यांनी त्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून एक उत्कृष्ट अनुवाद कसा आकाराला येतो हे ऐकायला वाचक-श्रोत्यांना नक्की आवडेल. स्वीकृतची मराठी  छापील आवृत्ती इथे आणि इथे उपलब्ध आहे. मूळ जर्मन पुस्तकाची छापील आवृत्ती इथे आणि इथे  उपलब्ध आहे. तुम्ही गेल्या वर्षात कोणते अनुवाद वाचले ते आम्हाला कळवण्यासाठी आणि अनुस्वादसाठी अनुवादित पुस्तकं सुचवण्यासाठी आम्हाला anuswaad@gmail.com वर मेल करा. 
Immortal India by Amish Tripathi – Marathi edition अमर्त्य भारत लोकप्रिय इंग्रजी लेखक अमीश त्रिपाठी यांचं इम्मॉर्टल इंडिया हे नॉन-फिक्शन प्रकारातील पहिलंच पुस्तक. त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाचं आणि भाषणांचं संकलन. प्रचंड मोठ्या कालखंडात, प्रचंड बदलांना तोंड देत स्व-त्व टिकवून ठेवलेल्या या भारत देशाच्या अमर्त्य आत्म्याची ओळख करून घेण्याचा हा अमीशचा शोधप्रवास आहे. अतिशय प्रांजळपणे आणि खुल्या मनाने लिहिलेल्या या पुस्तकाचा तितक्याच सामर्थ्याने अनुवाद केला आहे विद्या हर्डीकर सप्रे (https://www.linkedin.com/in/vidya-sapre-8b81b441/) यांनी. अनुस्वादच्या या भागात मराठी आवृत्तीच्या प्रकाशक, यात्रा बुक्सच्या नीता गुप्ता  (https://www.linkedin.com/in/neetagupta/) सुद्धा सहभागी झाल्या आहेत. उज्ज्वला आणि विदुला यांनी या दोघींशी मारलेल्या गप्पांमधून अनुवादाचे अनेक पैलू उलगडले आहेत. हा भाग कॅलिफोर्नियातील अनुवादक, दिल्लीतील प्रकाशक आणि पुण्यातील अनुस्वादक यांच्यात वेगवेगळ्या वेळी केलेला संवाद आहे.  प्रकाशक भाषांतरासाठी पुस्तक कसं निवडतात, लेखकाच्या भाषेशी आणि विचारांशी तादात्म्य पावल्याने अनुवादावर कसा परिणाम होतो, मूळ पुस्तक आणि त्याचा अनुवाद लागोपाठ प्रसिद्ध होताना काय काय करावं लागतं, अशा अनेक गोष्टी या भागात ऐकायला मिळतील. इम्मॉर्टल इंडियाची मराठी आवृत्ती अमर्त्य भारतची छापील आवृत्ती आणि इबुक आवृत्ती इथे उपलब्ध आहे. मूळ इंग्रजी पुस्तक print edition, ebook edition and audio edition इथे उपलब्ध आहे.
When We Were Orphans by Sir Kazuo Ishiguro – Marathi Translation नोबेल पुरस्कारप्राप्त लेखक काझुओ इशिगुरो यांची व्हेन वुई वेअर ऑर्फन्स ही गाजलेली साहित्यकृती. बुकर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेली ही कादंबरी युद्धाची गोष्ट सांगते – मनातल्या आणि बाहेरच्या. महायुद्धाच्या मोठ्या पटावरची ही कथा माणसांच्या मनातल्या ममत्व, पोरकेपण, असहायता, निश्चय, मैत्री, अशा तरल भावनांनाही हळुवार स्पर्श करते. ही कथा अनोळखी प्रदेशात, अनोळखी काळात, अनोळखी माणसांच्या आयुष्यात घडत असली, तरी जगभरातील वाचकांना ती अगदी आपलीच वाटते. ४० भाषांमध्ये समीक्षकांची आणि वाचकांची आवडती कादंबरी मराठीत आणली आहे वेस्टलँड अमेझॉनने, त्यांच्या एका या उपक्रमाअंतर्गत. मराठीत अतिशय सुंदर अनुवाद केला आहे सुश्रुत कुलकर्णीने (https://www.linkedin.com/in/sushrut-kulkarni-9a955712/ ) आणि अनुवादाचं संपादन केलं आहे सुवर्णा अभ्यंकरने (https://www.linkedin.com/in/suvarna-abhyankar-865756b7/) . अनुस्वादच्या या भागात उज्ज्वला आणि विदुला या दोघांशी संवाद साधत आहेत. या भागात तुम्ही या पुस्तकाबद्दल तर ऐकालच, पण अनुवाद प्रक्रियेबद्दल सुद्धा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर झालेली चर्चा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि उपयुक्तही वाटेल. व्हेन वुई वेअर ऑर्फन्स मराठी ची   छापील आवृत्ती आणि ई-बुक आवृत्ती इथे उपलब्ध आहे. मूळ इंग्रजी पुस्तक print edition  ebook edition and audio edition   इथे उपलब्ध आहे
पावित प्रदेशातील इलेक्सनची, इश्काची आणि दुश्मनीची रंगतदार कहाणी मूळ इंग्रजीत लिहिली आहे अनुजा चौहान यांनी. त्याचा तितकाच सुंदर अनुवाद आश्लेषा गोरे यांनी केला आहे. समकालीन कादंबरीचा अनुवाद करताना काय मजा येेते, काय विचार करावा लागतो, मूळ कादंबरीचा वेग, विनोद, परिणाम कायम ठेवण्यासाठी अनुवादकाला काय करावं लागतं हे या भागात उलगडलं आहे आश्लेषा, उज्ज्वला आणि विदुला यांच्या गप्पांमधून. मजेदार भाषा, मजेदार पात्रं आणि आपल्या अगदी ओळखीची गोष्ट - पण एका वेगळ्या कोनातून पाहिलेली - याबद्दल ऐकायला तुम्हाला नक्की आवडेल.  मराठी अनुवाद जिन्नी पुस्तकांच्या सर्व दुकानांमध्ये उपलब्ध. तसेच ऑनलाइन खरेदीसाठी https://www.amazon.in/Jinni-Marathi-Anuja-Chauhan/dp/B07Z2VNTX7 तसेच इबुक आवृत्तीसाठी https://www.amazon.in/Jinni-Battle-Bittora-Marathi-ebook/dp/B075FX3WCN  हे पुस्तक किंडल अनलिमिटेड वरही उपलब्ध आहे.  चला ऐकू या बिट्टोरा ते जिन्नी या प्रवासाची बखर!
भायखळा ते बँकॉक या उज्ज्वला बर्वे यांनी अनुवाद केलेल्या पुस्तकाचं रसग्रहण. अनुवादाच्या दृष्टीने या पुस्तकाची वैशिष्ट्यं, भाषा, प्रयोग, बलस्थानं यांच्याबद्दल गप्पा मारणारा हा अनुस्वादचा पहिला भाग. याचं सुंदर कव्हर तयार केलं आहे स्मिता देशपांडे, वामा डिझाइन्स, नाशिक यांनी. आणि याचं संगीत मिलिंद तुळाणकर, जलतरंग वादक यांनी उपलब्ध करून दिलं आहे.  ऐका आणि हा भाग कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. तुम्हाला आणखी कोणत्या अनुवादांचं रसग्रहण ऐकायला आवडेल तेही कळवा.   अनुस्वाद : आस्वाद अनुवादाचा!    लाइक करा,  शेअर करा, सबस्क्राइब करा. 
मराठीमध्ये आणि मराठीतून अनुवादित झालेल्या पुस्तकांचं रसग्रहण करणारा पॉडकास्ट ३० ऑक्टोबर २०२० रोजी शरद पौर्णिमेला सुरू करत आहोत.  त्याचा परिचय करून देणारा हा परिचय-भाग. Introduction of Marathi podcast Anuswad : Aswad Anuvadacha, being launched on October 30, 2020.
द गर्ल इन रूम 105 हे प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांचं गाजलेलं आणि थोड्याशा वेगळ्या म्हणजे रहस्यकथेच्या अंगाने जाणारं पुस्तक. याचा मराठी अनुवाद केला आहे सुवर्णा अभ्यंकर यांनी. रहस्यकथा हा साहित्यप्रकार हाताळताना त्यातलं रहस्य शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी अनुवाद करताना अनुवादकाला काय काळजी घ्यावी लागते, आजच्या तरुणाईच्या भाषेत सहज येणारे इंग्रजी आणि इतर भाषांमधले शब्द त्यातली संवादात्मकता आणि सहजता न घालवता भाषांतरित करण्याची प्रक्रिया कशी असते त्यासाठी कोणत्या गोष्टींची मदत होते हे समजून घेणं मराठी वाचकांसाठी निश्चितच रंजक ठरेल. या आणि अशा इतरही गोष्टींवर सुवर्णा अभ्यंकर यांच्याशी संवाद साधला आहे उज्जवला बर्वे आणि विदुला टोकेकर यांनी.  तुम्ही सध्या कोणते अनुवाद वाचताय किंवा नुकतेच वाचून संपवले, किंवा कोणत्या अनुवादित पुस्तकांबद्दल अनुस्वाद मध्ये ऐकायला आवडेल हे आम्हाला anuswaad@gmail.com वर जरूर कळवा. The Girl in Room 105 is a famous and different book by celebrated writer Chetan Bhagat which comes under the genre of suspense thriller. It is translated into Marathi by Suvarna Abhyankar. How careful the translator has to be while translation suspense thrillers to make sure that the suspense remains the suspense till the very end, what is the process of translation the English and Hindi words which are used so often by the young generation into Marathi without losing the spontaneity and natural flow of the language and how it is done will be very interesting to know for Marathi readers. Ujjwala Barve and Vidula Tokekar are in conversation with Suvarna Abhyankar on these and many more interesting points in this episode.  Do write to tell us which translations you read recently and which ones you would like to hear about in Anuswad. Write to us - anuswad@gmail.com 
सेवन हॅबिटस् ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे स्टीफन आर. कवी यांचं पुस्तक जगभर प्रचंड गाजलेलं आहे आणि कोट्यवधी कुटुंबांवर याने परिणाम केला आहे. त्याचा मराठी अनुवाद विदुला टोकेकर यांनी केला आहे. स्वमदत पुस्तकांचं भाषांतर करताना भाषा कशी ठेवावी, सर्व प्रकारच्या वाचकांना हे लेखन स्वाभाविक वाटेल आणि त्यांना त्याचा उपयोग होईल अशी अकृत्रिम लेखनशैली कशी असावी यांसारख्या मुद्द्यांवरची चर्चा वाचक आणि अनुवादक दोघांनाही रंजक वाटेल. सेवन हॅबिटस् ची रचना विशिष्ट प्रकारची आहे.  त्यात अनेक सुंदर शब्द, कल्पना आल्या आहेत.  त्यांच्याबद्दल गप्पा मारल्या आहेत उज्ज्वला बर्वे आणि विदुला टोकेकर यांनी. तुम्ही सध्या कोणते अनुवाद वाचताय किंवा नुकतेच वाचून संपवले, किंंवा कोणत्या अनुवादित पुस्तकांबद्दल अनुस्वाद मध्ये ऐकायला आवडेल हे आम्हाला anuswaad@gmail.com वर जरूर कळवा. Seven Habits of Highly Effective People is a book that has affected milions of families across the globe.  its translated into Marathi by Vidula Tokekar. Translation of 'self help' books demand easy language, should keep in mind a cross section of readers while translating. Seven Habits is designed in a particular way.  It has peculiar words and concepts.  It is interesting to understand how these points are highlighted in its Marathi translation. Sure Marathi readers and translators both would find the conversation between Ujjwala Barve and Vidula Tokekar interesting and useful. Do write to us to tell us which translations you read recently and which ones you would like to hear about in Anuswad. Write to us - anuswaad@gmail.com  
'गांधीविचार' याचे अनेक पैलू आहेत, ७२ वर्षांनतरही त्यातल्या अनेकांवर अजूनही नव्याने संशोधन, विचार होत आहे, आणि त्यातून आजच्या काळातील प्रश्नांच्या उत्तरांच्या नव्या शक्यताही समोर येऊ शकतात. गांधीविचाराला कोणत्याही कप्प्यात टाकण्याअगोदर त्यातले काही नीट समजावून तरी घेऊया. स्थलांतर, खादी, धर्म आणि राजकारण हे विषय आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. खादी हे तर क्रांतीचे प्रतीक मानले आहे. याच तीन विषयांवर सेज प्रकाशनाने इंग्रजीत प्रकाशित केलेल्या तीन पुस्तकांच्या मराठी आवृत्त्या सेज भाषा तर्फे प्रसिद्ध झाल्या आहेत. इंग्रजी संशोधनपर पुस्तकांचा मराठी अनुवाद या निमित्ताने समोर ठेवत आहोत. अस्सल भारतीय विषयावर इंग्रजीत झालेल्या संशोधनाचे मराठी अनुवाद प्रस्तुत आहेत का, भारतीय भाषांसाठी जड लेखनाचे सुलभीकरण करावे का अशा काही प्रश्नांचाही विचार या भागात तुम्हाला ऐकायला मिळेल. ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि गांधीविचाराचे अभ्यासक श्री. जयदेव डोळे यांच्याशी वार्तालाप केला आहे उज्ज्वला बर्वे आणि विदुला टोकेकर यांनी. या भागात तुम्ही पुढील पुस्तकांबद्दल ऐकणार आहात -  अटलांटिक गांधी, मूळ लेखक नलिनी नटराजन, अनुवादक विजया देव.  खादी – गांधींच्या क्रांतीचे महाप्रतीक, मूळ लेखक पीटर गोंसाल्विस, अनुवादक अन्योक्ती वाडेकर.  गांधी आणि अली बंधू – एका मैत्रीचे चरित्र, मूळ लेखक राखहरि चटर्जी, अनुवादक तृप्ती कुलकर्णी. तुम्ही सध्या कोणते अनुवाद वाचताय किंवा नुकतेच वाचून संपवले, किंंवा कोणत्या अनुवादित पुस्तकांबद्दल अनुस्वाद मध्ये ऐकायला आवडेल हे आम्हाला anuswaad@gmail.com वर जरूर कळवा.   
कित्येक वर्ष लोकांच्या मनावर गारूड करणारी हॅरी पॉटर मालिका. तिचा आठवा भाग सुरू होतो सातव्या भागातील कथाभागानंतर एकोणीस वर्षांनी. तो लिहिला आहे नाट्यरूपात. अशा आगळ्यावेगळ्या फँटसीचा अनुवाद अतिशय वाचनीय आहे. तो रंजक, वाचनीय होण्यामागे अनुवादकांची प्रतिभा, अभ्यास, विचार किती महत्त्वाचे आहेत हे समजून घेण्यासारखे आहे. किशोरवयातील हॅरी या पुस्तकात एक प्रेमळ पिता, जादू मंत्रालयाचा जबाबदार कर्मचारी म्हणून आपल्या समोर येतो. तरी त्याचा हळवेपणा तसाच आहे आणि लहानपणीची मैत्रीही घट्ट टिकून आहे आणि तेव्हाचा द्वेषही अजून तितकाच ताजा आहे. पुस्तक अतिशय लोकप्रिय आहे आणि त्यांच्यावरच्या चित्रपटांमुळे वाचकांच्या डोळ्यांसमोर काही प्रतिमाही तयार झाल्या आहेत. अशा आव्हानात्मक साहित्यकृतीचा तितकाच समर्थ अनुवाद केला आहे शिरीष सहस्रबुद्धेआणि डॉ. सोनल सहस्रबुद्धे यांनी. उज्ज्वला आणि विदुला यांनी या दोघांशी मारलेल्या गप्पांमधून अनुवादाचे अनेक पैलू उलगडले आहेत. हॅरी पॉटर आणि शापित पुत्र ही मराठी  छापील आवृत्ती इथे उपलब्ध आहे. मूळ इंग्रजी पुस्तक print edition, ebook edition with audio/video  इथे उपलब्ध आहे.
Comments 
Download from Google Play
Download from App Store