DiscoverEr Priti Moreअन्न दानाचे महत्त्व
अन्न दानाचे महत्त्व

अन्न दानाचे महत्त्व

Update: 2022-07-10
Share

Description

*💢अन्नदानाचे महत्व महादान💢*

१. अन्नदान करणाऱ्याच्या २१ पिढ्यांचा उद्धार होतो.

२. अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे. अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजा रती देवास स्वर्गलोकाची प्राप्ती झाली.

३. जे अन्नदान करीत नाहीत त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते.

४. अन्नदान करणारा शिवलोकात जातो. तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही.

५. अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो.

६. अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता-भोक्ता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात. इतर सर्व दानाचे फळ अप्रत्यक्ष असते.

७. जो पर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुखेच्या भावनेचा अनुभव येत आहे तो पर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही.

८. लक्ष्मी रुसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवेल, हे सांगता येणार नाही म्हणून दान तात्काळ करावे. यथाशक्ती, यथासामर्थ्य दान देत राहावे.

९. अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही ते नित्य वाढतच असते, जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वच्छ होऊन पाण्याचा साठाही वाढतो.

१०. संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठदान पूर्वीही नव्हते व पुढेही नसेल. अन्नामुळेच शरीराचे बल वाढते. अन्नाच्या आधारेच आपले प्राण टिकून राहतात म्हणून
अन्नदान करणारा प्राणदाता सर्वस्व देणारा समाजाला जातो.

११. न्यायिक मार्गाने मिळविलेल्या उत्पन्नातील एक दशांश भाग भगवंताच्या कार्यासाठी उपयोगात आणावा असे शास्त्र सांगते.

१२. अन्नदाता परमात्मा आहे. त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे. चवीला बळी न पडता, जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे याचे नाव `सात्विक आहार' होय.

१३. शेकडो मनुष्यात एखादा शूर असतो, हजारात एखादा पंडित असतो, लाखात एखादा वक्ता असतो, परंतु या सर्वात एखादाच दाता असतो किंवा नसतो.

१४. अन्नदानासारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही.

१५. भुकेलेल्याला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे स्मरण करणे या दोनच गोष्टी परलोकात उपयोगी पडतात.
॥ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
! ! श्री स्वामी समर्थ ! !
Comments 
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

अन्न दानाचे महत्त्व

अन्न दानाचे महत्त्व

Priti More