ओपनहायमर: जगात अणू हल्ल्याचा धोका आता वाढतो आहे का? BBC News Marathi
Description
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जून महिन्यात एक घोषणा केली की त्यांनी अण्वस्त्रांचा एक साठा बेलारूसमध्ये तैनात करण्यासाठी पाठवला आहे.
युक्रेन युद्धाच्या सुरुवातीपासूनच पुतिन अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी देत होते.
पण पहिल्यांदाच त्यांनी असं ठोस पाऊल उचललं आहे.
बेलारूसमधून ही अण्वस्त्रं पोलंड आणि लिथुआनियावर हल्ला करू शकतात. त्याशिवाय रशियानं इथे अशी क्षेपणास्त्रं आणि लढाऊ विमानं पाठवली आहेत ज्यांद्वारा पाचशे किलोमीटर दूरवर अण्वस्त्र डागता येतील.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिकिन यांनी हे बेजबाबदार पाऊल असल्याची टीका केली आहे.
दरम्यान, रशियानं युक्रेनच्या झापोरजिया अणुशक्ती केंद्रावरही कब्जा केलाय. पण केवळ रशियाच्या पुतिन यांच्या धमक्याच चिंतेची गोष्ट नाही.
कारण सध्याच्या मल्टीपोलर म्हणजे बहुध्रुवीय जगात चीनही अण्वस्त्रांच्या उत्पादनात अमेरिका आणि रशियाची बरोबरी करू इच्छितो.
त्यात सगळीकडे अण्वस्त्र प्रसारबंदी करारांची मुदत संपते आहे आणि नवे करार होत नाहीयेत. म्हणजे मग आता जगात अणू हल्ल्याचा धोका वाढतो आहे का?
मूळ निर्मिती – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – जान्हवी मुळे
एडिटिंग – तिलक राज भाटिया



