कावळा चाले हंसाची चाल
Description
द्रोणाचार्यांच्या मृत्यू पश्चात दुर्योधनाने कौरवांच्या सेनेचा सेनापती म्हणून कर्णाची नियुक्ती केली. कर्णाने दुर्योधनाला शब्द दिला की तो अर्जुनाचा वध करेल... आणि युद्धात दुर्योधनाचा विजय निश्चित करेल.
आपण अर्जुनापेक्षा सर्वतोपरि कसे श्रेष्ठ आहोत हे तो दुर्योधनाला पटवून देत होता. मात्र कर्ण म्हणाला, की अर्जुनाकडे सारथ्याच्या रूपात कृष्ण आहे... मग त्याने प्रस्ताव मांडला की जर शल्य त्याचा सारथी बनला
तर तो अर्जुनाच्या बरोबरीचा होईल. दुर्योधनाने शल्याच्या घोडे हाकण्याच्या कौशल्याची प्रशंसा केली केली.... तसेच तो असेही म्हणाला की या बाबतीत तो कृष्णाच्या बरोबरीचा आहे.
आणि त्याने शल्याला कर्णाचा सारथी बनवण्याचे आश्वासन दिले. शल्याने कर्णाचा रथ चालवत असताना त्याला एक गोष्ट सांगितली... ती अशी...
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices