गोवर्धन पूजा | Govardhan Pooja

गोवर्धन पूजा | Govardhan Pooja

Update: 2022-10-25
Share

Description

एकदा कृष्ण आणि बलराम जंगलात काही वेळ मजेत घालवून पुन्हा ब्रिजकडे परतले. ब्रिजला पोहोचताच त्यांनी पहिलं की, इंद्रोत्सवाबद्दल सर्वच गोप खूप आनंदी आणि उत्साही आहेत. हे पाहून कृष्णाला कुतूहल वाटलं आणि त्याने विचारलं, "हा सण का साजरा करतात?"


 


श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून एक म्हातारा गोप म्हणाला, ''इंद्रदेव हा ढगांचा स्वामी आहे, तोच सर्व जगाचा रक्षणकर्ता आहे. त्यांच्या कृपेनेच पाऊस येतो. पावसामुळे आमची सगळी पिकं हिरवीगार राहतात, आपल्या गुरख्यांना गुरं चारण्यासाठी पुरेसं गवत मिळतं आणि इंद्रदेवाच्या कृपेने कधीही पाण्याची कमतरता भासत नाही, इंद्राच्या आज्ञेने ढग जमा होतात आणि बरसतात. कृष्णा! पाऊस या पृथ्वीतलावर जीवन आणतो आणि देवराज इंद्र खुष राहिला की पाऊस पडतो. त्यामुळे इंद्रदेवाची वर्षा ऋतुत पूजा केली जाते. सगळेच राजे मोठ्या आनंदाने इंद्रदेवाची पूजा करतात, म्हणून आम्हीही सर्वजण तेच करत आहोत . ' 


 


 श्रीकृष्णाने गोपांचं बोलणं फार काळजीपूर्वक ऐकलं आणि मग त्याने म्हंटलं, ''आर्य! आपण सर्व जण जंगलात राहणारे गोपाळ आहोत आणि आपली उपजीविका 'गोधना'वर अवलंबून आहे म्हणूनच गायी, जंगलं आणि पर्वत हे आपले देव असले पाहिजेत. शेतकऱ्याची उपजीविका शेती आहे, त्याचप्रमाणे आपल्या उपजीविकेचे साधन गायींचं संगोपन करणं हे आहे. जंगलं आपल्याला सर्वकाही प्रदान करतात आणि पर्वत आपलं संरक्षण करतात. आपण या सर्वांवर अवलंबून आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की आपण गिरियाचना करायला हवी. आपण झाडांजवळ किंवा डोंगराजवळ सर्व गायी एकत्र आणल्या पाहिजेत, त्यांची पूजा केली पाहिजे आणि एखाद्या शुभ मंदिरात सर्व दूध गोळा केलं पाहिजे. गायींना मोरपंखांच्या मुकुटाने सुशोभित केलं पाहिजे आणि नंतर फुलांनी त्यांची पूजा केली पाहिजे. देवांना इंद्राची पूजा करु द्यावी आणि आपण मात्र गिरीराज गोवर्धनची पूजा करू. "


 


 

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Comments 
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

गोवर्धन पूजा | Govardhan Pooja

गोवर्धन पूजा | Govardhan Pooja

Sutradhar