होकायंत्र
Update: 2020-05-08
Description
होकायंत्र. एक अत्यंत महत्वाचे यंत्र. जेव्हा आपण भरकटतो, काही कळत नाही आपण कुठे आहोत, जाण्याचं ठिकाण कुठल्या दिशेला आहे. आपण योग्य दिशेला चाललो कि विरुद्ध दिशेला, तेव्हा हेच होकायंत्र मदतीला येतं.
पण जेव्हा आपल्या आयुष्याचीच दिशा हरवते, आपल्याला नक्की कळत नाही बरोबर काय अन् चुक काय, तेव्हा काय करायचं? कुणाची मदत घ्यायची? तेव्हा आपल्या अंतस्थ होकायंत्राचा वापर करायचा. हे यंत्र प्रत्येकात असतं. कुणात जागरुक तर कुणात निद्रीस्त. गरज असते या कडे लक्ष द्यायची.
प्रत्येक निर्णयाच्या वेळी आपलं मन ओढ घेतं एका बाजूकडं, तीच खरी दिशा असते आपल्याला जाण्याची. पण ती व्यवहार्य असेलच असं नाही, म्हणुन आपला व्यवहारी मेंदू व्यवहारी बाजुच निवडतो. पण खरा आनंद असतो मनाच्या ओढीकडं. होकायंत्राने दाखवलेल्या दिशेकडं.
क्षणभंगुर या आयुष्यात थोडे निर्णय मनाने घेऊयात. थोडा वाटा निर्भेळ आनंदाचाही सोबत ठेऊयात.

Comments
In Channel