# 1905: "कारल्याची भाजी आणि...हरवलेलं त्रिकूट" लेखिका : सौ विदुला जोगळेकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Update: 2025-12-01
Description
बाबांनी मला दिलेल्या शिक्षेची ना आईने दखल घेतली ना आजीने.
चुक ही चुकच असते...ती आड अंगाने,सुचवायची गोष्ट नसते,ही पालकत्वाची जबाबदारी आमच्या पिढीपर्यंत शिक्षेच्या माध्यमातून अमलात येत होती.
वाचनाचे वेड जसं वाढत गेलं,तसं आईने दोन तीन लेखकांची पुस्तके वाचायची नाहीत... असं एकदाच बजावलं होतं.आजही लायब्ररीचे भांडार समोर उभे असुन,वयाचे सारे निर्बंध संपलेले असुनदेखील,कुतूहल म्हणुनही ...काही पुस्तके हातात घ्यावीशी वाटत नाहीत.
जिम ट्रेनर, डाएटीशन, आणि काँन्सिलर हे त्रिकुट कुटुंब संस्थेतच कुठे ना कुठेतरी,कोणत्यातरी नात्याच्या रुपात लपलेलं असायचं!
======
Comments
In Channel



