DiscoverCementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)
Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)
Claim Ownership

Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)

Author: NACHIKET KSHIRE & LEENA PARANJPE

Subscribed: 339Played: 572
Share

Description

Marathi podcast which will try to uncover mysteries of married life..

लग्नं म्हंटल कि मनात खूप प्रश्न येतात, मुळात लग्न करायचं का? करायचं तर कोणाशी? love की arrange? registered की big fat wedding? compatible partner कसा शोधायचा? अशे अनेक प्रश्न असतात आपल्या मनात.

तुम्ही लग्न करणार असाल , तुमचं पाल्य लग्नाळु असेल, लग्न झालं आहे पण खटके उडतात आहेत किंवा पुनर्विवाहाचा विचार करत आहात, तुम्ही ह्या पैकी कोणीही असाल तर तुम्ही हा पॉडकास्ट नक्की ऐकायला हवा, कारण इथे millennial marriage coach  लीना परांजपे ह्यांना ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला बोलतं केलं आहे आपला होस्ट नचिकेत क्षिरे ह्यांनी
16 Episodes
Reverse
complaint mode मधून बाहेर या आणि स्वतः सोलुशन शोधास्वतः फक्त आपण व्हिक्टिम आहोत असं समजून रडत राहण्यापेक्षा हा विश्वास बाळगला पाहिजे कि जरी समोरचा व्यक्ती चूक असेल तरी त्याला बदलायची जवाबदारी माझी आहे..समोरच्याची चूक त्याला सांगताना त्याला त्याच्या भाषेत म्हणजे त्याला समजेल अश्या पद्धतीने सांगणे तितकेच आवश्यक आहे..आणि उगाच complaint mode  मध्ये राहण्या पेक्षा काही गोष्टी unlearn करून नव्याने शिकणे आवश्यक असते..लीना परांजपे ह्यांचा इंस्टाग्राम हॅन्डल आहे -माझा इंस्टाग्राम -
सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर.  हा सिजन ३  चा चौथा एपिसोड आहे  - डोळस प्रेम म्हणजे काय ?  असं म्हणतात प्रेम आंधळं असतं. सुरवातीला ते असेलही, पण हळू हळू त्या प्रेमाला डोळस पणे पाहून नात्याला भक्कम करण्यासाठी आवश्यक गोष्टींवर काम करायला हवं.  पैसे, नौकरी, personality, स्वभाव , कुटुंबाची आर्थिक/ सामाजिक परिस्थिती ह्या भौतिक गोष्टींच्या पलीकडे जाऊन आपलं नातं भावनिक, मानसिक, बौद्धिक , लैंगिक बाबतीत ही भक्कम आहे का हे तपासायला हवं आणि नसेल तर दोघांनी एक टीम म्हणून सोबत त्या वर काम करायला हवं.  ह्या सगळ्याची जाणीव नसल्याने अनेक वर्ष सोबत राहून नाते तुटतात ह्या खूप महत्वाच्या विषयावर ह्या भागात गप्पा केल्या आहेत.  आम्हाला इंस्टाग्राम भेटा - @mipodcaster @leennaparannjpe  
प्रेम आणि  compatibility मध्ये फरक आहे  S3 EP0३ - प्रेम आणि  compatibility मध्ये फरक आहे  सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर.  हा सिजन ३  चा तिसरा  एपिसोड आहे  - प्रेम आणि  compatibility मध्ये फरक आहे  Made for each Other ही संकल्पना असली तरी तो एक प्रवास आहे, एकमेकांवर प्रेम असणं हेच फक्त चांगल्या लग्नासाठी पूरक नसतं. अनुरूपता म्हणजे compatibility ही खूप आवश्यक आहे. ती नसल्यामुळे कठीण प्रसंगांमध्ये एकमेकांची साथ देता येत नाही आणि नाती तुटतात.  आजकाल अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर नाती तुटतात, त्यामुळे नात्यांची काही guarantee नसते आणि ती नसल्यामुळे तरुण एक हात पार्टनर च्या हातात तर दुसरा हात security म्हणून पालकांच्या हातात ठेवतात. हि भीती मनातून काढून टाकून दोन्ही हात पार्टनरच्या हातात का द्यावे ह्या खूप महत्वाच्या मुद्द्यावर बोललो आहे ह्या एपिसोड मध्ये.   आम्हाला इंस्टाग्राम भेटा - @mipodcaster @leennaparannjpe  
S3 EP0२ - प्रॉब्लेम च्या मुळाशी जाऊया सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज हा मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर.  हा सिजन ३  चा दुसरा एपिसोड आहे  -  प्रॉब्लेम च्या मुळाशी जाऊया !! बरेचदा अप[आपण समोरच्या व्यक्तीला judge करतो, पण ती व्यक्ती तशी का वागते ह्याचा विचार आपण करत नाही. एखाद्या गोष्टीचा मुळापासून विचार करून समोरच्याला judge न करता वागलो तर कदाचित नात्यांमधील गोष्टी अजून सोप्या होतील.  आम्हाला इंस्टाग्राम भेटा - @mipodcaster @leennaparannjpe  
सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज हा मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर.  हा सिजन ३  चा पहिला एपिसोड आहे  -  मेड फॉर इच अदर ही एक संकल्पना आहे सत्य नाही..  मेड फॉर इच अदर ही एक संकल्पना आहे सत्य नाही पण ही एक प्रोसेस आहे आणि आपल्याला मेड फॉर इच अदर बनता येतं पण त्या साठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. एक टीम म्हणून काम करावं लागेल. ते कश्याप्रकारे करता येऊ शकेल ह्या बद्दल बोललो आहे ह्या एपिसोड मध्ये..  आम्हाला इंस्टाग्राम भेटा - @mipodcaster @leenaparanjpe1    
जर नातं घट्ट असेल तर आपल्या संसारात कोणीच लुडबुड करू शकणार नाही.  Dos and Donts फॉर couple, जर परिस्थिती हाता बाहेर गेली तर काय करावे अश्या प्रश्नांवर बोललॊ आहे ह्या season २ च्या ५ व्य भागात 
आपल्याला लग्नाच्या आधी या ओळखता येतं का, की पार्टनर इमोशनल आहे की प्रॅक्टिकल ? लग्नं झाल्यावर समजा वाद होतं असतील तर पाहिलं पाऊल कोणी टाकायचं ? ज्या पार्टनरला awareness असेल त्यांनी काय करावं ? अश्या विषयांवर गप्पा केल्या आहेत ह्या एपिसोड मध्ये  तुमच्या प्रतिक्रिया www.leenaparanjpe.com ; www.mipodcaster.com  ह्या website वर भेट देऊन आमच्यापर्यंत नक्की पोहचावा 
लग्नानंतर जर असं लक्षात आलं  की सारखे वाद होतात आहे, आणि हे सतत एक महिन्या पेक्षा जास्त चाललं तर असं समजावे की दोघांच्या मूळ स्वभावात फरक असल्यामुळे हे होतं आहे. अश्यावेळेस experts चा सल्ला नक्की घ्यावा. तुम्हाला हा Marathi Podcast कसा वाटतो आहे हे आम्हाला नक्की कळवा www.leenaparanjpe.com www.mipodcaster.com
मला नवरा नको मित्र हवा - मला बायको नको मैत्रीण हवी . आपण हे वाक्य आजकाल अनेकदा ऐकले असतील, पण लीना ताईचं म्हणणं आहे की मित्र बनण्याच्या भानगडीत ना नवरा बायको बनता येतं ना मित्र. सुरवातीला नवरा बायको बना आणि मित्र आपोआप बनाल. ह्या थोड्या जरा वेगळ्या विषयावर बोललॊ आहे season २ च्या ह्या दुसऱ्या भागात.  Your husband is not your friend, and your wife is also not your friend. why is Leena saying so? Lets talk in this second episode of season 2.  
लग्नं करतांना सगळया गोष्टींचं प्लांनिंग केल्या जातं बरीच गुंतवणूक केली जाते, पण होणाऱ्या नात्यात गुंतवणूक केली जातं नाही. जर गुंतवणूक नाही केली तर परतावा कसा मिळणार ? म्हणून नात्यात गुंतवणूक करा आणि आयुष्यभर परतावा घेत राहा.. हि गुंतवणूक नेमकी कशी करावी हे बोललो आहे season २ च्या ह्या पहिल्या एपिसोड मध्ये..  Lot of planning goes into a wedding, a lot of investment is also done, but when it comes to marriage do we really care? If we don't invest in relationships can we expect returns on investment? What kind of investment is actually required to be made in relationships? How it can be done, these are few things we have discussed in this 1st episode of Season 2..  
सल्ला देणं आणि लुडबुड करणे ह्यात एक पुसटशी रेष आहे.  ती रेष कशी ओळखावी? पालकांनी कसे वागावे किंवा वागू नये ? ह्यावर बोललो आहे ५व्या एपिसोड मधे. 
संसार चालू झाला की एकमेकांचे स्वभाव लक्षात यायला लागतात, मग वाद पण सुरु होतात.  दोघांच्या सवयी वेगळ्या असतात, भाषा ( approch ) वेगळे असतात, मग भिन्न स्वभाव असलेल्या लोकांनी एकमेकांशी कसं जुळवून घ्यायचं ? समोरच्याची भाषा कशी समजावून घ्यावी ? ह्या मुद्द्यांवर बोललो आहे ह्या एपिसोड मध्ये  
लग्नं सोहळ्याचं महत्त्व आहे का? honeymoon चं उद्देश काय ? मुलींना honeymoon मध्ये  काय अपेक्षित असतं ? मुलांना honeymoon मध्ये  काय अपेक्षित असतं ? ह्या विषायावंर चर्चा केली आहे cementing wedding with marriage च्या तिसऱ्या एपिसोड मध्ये 
लग्न नेमकं कोणाशी करावं ? अनुरूप स्थळ कोणतं ? Compatibility म्हणजे नेमकं काय ? कुठल्या प्रकारच्या compatibilities असतात ? अश्या विषयांवर गप्पा केल्या आहेत एपिसोड २ मध्ये 
मुळात लग्न करावं का ? लिव्ह इन मध्ये राहिलं तर काय हरकत आहे ? मी लग्नाला तयार आहे हे कसं कळणार ? अश्या काही प्रश्नांवर बोललो आहे पॉडकास्ट च्या पहिल्या एपिसोड मध्ये. 
Trailer Episode

Trailer Episode

2021-02-0704:00

मी नचिकेत क्षिरे आणि subject matter expert  लीना परांजपे  ह्या पॉडकास्ट मध्ये, लग्नं ह्या गूढ विषयावर चर्चा करणार आहोत.  contact details  - contact@leenaparanjpe.com ; cwwmpodcast@gmail.com    
Comments 
Download from Google Play
Download from App Store