Discoverगोतावळा Gotawala
गोतावळा Gotawala
Claim Ownership

गोतावळा Gotawala

Author: Setu Podcasts

Subscribed: 1Played: 5
Share

Description

लेखक शरद देशपांडे यांना आयुष्यभर भेटलेल्या माणसांचा हा गोतावळा… गंमत म्हणजे ही माणसं आपल्यालाही भेटलेली असतात. म्हणजे खानावळवाल्या मावशी, रस्त्यात थांबवून उगाच गप्पा मारणारे अनोळखी आजोबा, मुलांच्या संसारात मन रमवू पाहणारी एखादी आजी, ऑफिसातला खुनशी कलीग ते अगदी लहानपणापासून घरच्यांनी तयार केलेलं एखादं काल्पनिक पात्र… ह्या सगळ्यांची गोष्ट सांगणारा मराठी पॉडकास्ट… गोतावळा! अभिवाचन - ओम भुतकर.


Gotawala is a Marathi slang. It describes people you meet along the way and feel a strong connection with. A Marathi podcast, Gotawala will celebrate stories of people from Sharad Deshpande's life, penned in his inimitable style and narrated by Om Bhutkar.
7 Episodes
Reverse
मधु (Madhu)

मधु (Madhu)

2022-05-1216:24

Welcome to Gotawala - a world of stories by Sharad Deshpande about his special people.असं म्हणतात, एखादी गोष्ट ’आपलं बालपण संपलं’ ही जाणीव सोबत घेऊन येते. तशीच ही माझ्या आयुष्यातली गोष्ट, निर्व्याज नात्याची, निरागस आशेची आणि माझ्या लाडक्या मधुची! 
Welcome to Gotawala - a world of stories by Sharad Deshpande about his special people.अगदी घरातल्या माणसासारखं जपलेलं केळीचं रोप. ते आम्हा प्रत्येकाच्या, विशेषतः आजीच्या आयुष्याचा भाग झालं होतं. पण ज्यावर जीव जडतो ते दुरावणंही आयुष्याचाच भाग! आमच्या घरातल्या केळीच्या रोपाची ही गोष्ट, एका अबोल नात्याची आणि निसर्गाच्या चक्राची!
Welcome to Gotawala - a world of stories by Sharad Deshpande about his special people.मुलांना वाढवण्याची मोठी जबाबदारी निभावताना सोबतीला धावून आले, माझ्या ’गोतावळ्यातले’ - रामभाऊ लघाटे! हे रामभाऊ आधी माझे मित्र होते, मग माझ्या मुलांचे मित्र झाले, आता कदाचित त्यांच्या मुलांचेही होतील... कारण जोवर वडील-मुलाचं नातं आहे तोवर रामभाऊ लघाटे अमर आहेत! त्यांचीच ही भन्नाट गोष्ट!
Welcome to Gotawala - a world of stories by Sharad Deshpande about his special people.मुलं मोठी झाली, संसाराला लागली की आईच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण होते. राधाबाईंचंही तसंच झालं. मुलांना आपण नकोसे झालो का? हा प्रश्न काही केल्या पाठ सोडेना. आपला जीवाभावाचा गोतावळा सोडून आता वृद्धाश्रमात जावं लागणार का? या अस्वस्थेतूनच उलगडणारी ही राधाबाईंची गोष्ट! ऊनपावसाच्या खेळानंतरचं, नात्यांच्या मायेचं इंद्रधनुष्य दाखवणारी!
Welcome to Gotawala - a world of stories by Sharad Deshpande about his special people.मन मोकळं करायला जुनी ओळख नाही तर क्षणाचा आपलेपणा पुरतो. असे कितीतरी अनोळखी चेहरे भेटतात, जगणं सुंदर करतात. माझ्या आयुष्यातल्या अश्याच दोन अनोळखी माणसांची ही गोष्ट, मनाशी मात्र ओळख पटवणारी!
दैव (Daiva)

दैव (Daiva)

2022-04-2621:47

Welcome to Gotawala - a world of stories by Sharad Deshpande about his special people.एकटं राहताना फक्त घरची चव नाही तर घरची मायाही मिळते ती खानावळवाल्या मावशींमुळे! माझ्या गोतावळ्यातली एक खास जागा या आमच्या मावशींसाठी राखीव आहे. आमच्या नात्याची ही गोष्ट, त्यांच्या जेवणासारखीच, पोटासोबतच मनही भरुन टाकणारी!
Trailer

Trailer

2022-04-2301:08

लेखक शरद देशपांडे यांना आयुष्यभर भेटलेल्या माणसांचा हा गोतावळा… गंमत म्हणजे ही माणसं आपल्यालाही भेटलेली असतात. म्हणजे खानावळवाल्या मावशी, रस्त्यात थांबवून उगाच गप्पा मारणारे अनोळखी आजोबा, मुलांच्या संसारात मन रमवू पाहणारी एखादी आजी, ऑफिसातला खुनशी कलीग ते अगदी लहानपणापासून घरच्यांनी तयार केलेलं एखादं काल्पनिक पात्र… ह्या सगळ्यांची गोष्ट सांगणारा मराठी पॉडकास्ट… गोतावळा! अभिवाचन - ओम भुतकर. Gotawala is a Marathi slang. It describes people you meet along the way and feel a strong connection with. A Marathi podcast, Gotawala will celebrate stories of people from Sharad Deshpande's life, penned in his inimitable style and narrated by Om Bhutkar. 
Comments 
Download from Google Play
Download from App Store