DiscoverScreen Time With Mukta
Screen Time With Mukta
Claim Ownership

Screen Time With Mukta

Author: Mukta Chaitanya

Subscribed: 1Played: 0
Share

Description

नमस्कार,
स्क्रीन टाइम विथ मुक्ता या माझ्या पॉड कास्ट मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. या पॉडकास्टमध्ये आपण सायबर चॅट करणार आहोत. ऑनलाईन ट्रेंड्सपासून सायबर स्पेसचा आपल्यावर होणाऱ्या परिणामांपर्यंत सगळ्यांबद्दल मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे.
ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता
23 Episodes
Reverse
इंटरनेटमुळे आता जग अतिशय जवळ आलं आहे. त्यामुळे कधीकाळी अशक्यप्राय वाटणारी स्वप्नं, आजच्या पिढीला आता आवाक्यात आल्यासारखी वाटू लागली आहेत. ही स्वप्नं आता तरुणाईला भुरळ घालतायेत. या भुरळ घालणाऱ्या स्वप्नांपैकी एक स्वप्न म्हणजे, कोरीयन पॉप music आणि कोरियन फिल्म इंडस्ट्रीत स्टार होण्याचं स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजची तरुणाई प्रयत्न करतेय. पण याच स्वप्नाळू तरुणाईला गळाला लावण्यासाठी सायबर गुन्हेगारही सज्ज आहेत. या स्वप्नाळू तरुण - तरुणींना सायबर गुन्हेगार कशाप्रकारे फसवू शकतात? आणि त्या फसवेगिरीपासून वाचण्यासाठी तरुणाईने कशी खबरदारी घेतली पाहिजे, याबद्दल सविस्तर माहिती देणारा हा पॉडकास्ट जरूर ऐका!  सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा: सायबर मैत्र 9307474960
ऑनलाईन रमी हा प्रकार म्हणजे नेमका काय आहे? ऑनलाईन रमीला 'गेम ऑफ चान्स' म्हणणे म्हणजे एक पळवाट आहे का? 'गेम ऑफ चान्स' म्हणत म्हणत ऑनलाईन रमीच्या नावाखाली ऑनलाईन जुगार सुरु झालाय का? याचं व्यसन लागू शकतं का? 'ग्रे फाऊंडेशन'चे संचालक चैतन्य सुप्रिया यांच्याशी ऑनलाईन रमी या विषयावर आपण गप्पा मारल्या आहेत. नक्की ऐका!    सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा: सायबर मैत्र 9307474960
न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR या संस्थेवर सायबर हल्ला झाला असून त्यात ८१.५ कोली भारतीयांचा डेटा लीक झाला आहे आणि आता तो डार्क वेब मध्ये विक्रीसाठी आला असल्याचे बातमीत सांगण्यात आले आहे.  तर याच संदर्भात प्रसिद्ध सायबर इन्व्हेस्टीगेटर आणि सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ रितेश भाटिया यांच्याशी याच विषयावर मी बातचीत केली आहे. बघूया ते काय सांगतायत? सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा: सायबर मैत्र 9307474960
 ऐन दिवाळीच्या, सणासुदीच्या तोंडावर ऑनलाईन शाॅपिंग करत असताना खूप ऑनलाईन फसवणुक होत असते. त्या पासून वाचण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी ते पाहुयात आजच्या सायबरविकली मध्ये.*** सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा: सायबर मैत्र - 9307474960    
QR कोड स्कॅम घडतो तरी कसा ? QR कोड स्कॅम म्हणजे नेमकं काय ? QR कोड स्कॅन केलाच आणि पैसे गेले तर काय करावं ?आपली फसवणूक होऊ नये यासाठी काय करता येऊ शकते?स्क्रीन टाईम विथ मुक्ता चा हा भाग नक्की ऐका!  सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा: सायबर मैत्र 9307474960
फेक न्यूज कशी ओळखली जाते? फेक अकाऊंट काढल्याबद्दल अटक होऊ शकते का? फेक अकाऊंट काढल्याबद्दल कोणती शिक्षा होते? सोशल मीडियावरील पोस्टचं लॉजिक शोधायचं कसं? सोशल मीडियावर दिसणारा फोटो जर फोटोशॉप केलेला असेल तर? ह्या एपिसोडमधून फेक न्यूज ओळखण्याच्या सोप्या टिप्स तुम्हाला समजतील. एपिसोड नक्की ऐका! शेअर  करा.  सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा: सायबर मैत्र 9307474960
इझ्रायल आणि हमास यांच्यात सायबर युद्धही सुरु झालं आहे.दोनच दिवसांपूर्वी इझ्राएल मधील द जेरुसलेम पोस्ट न्यूज एजन्सीची यंत्रणा हॅक करण्यात आली आहे. त्यांची बेवसाईट सायबर हल्ल्यांमुळे क्रॅश झाली. हमासला पाठिंबा देणाऱ्या हॅकर्स कडून हे हल्ले होत असल्याचं सांगण्यात येत आहे. मुळात सायबर हल्ले म्हणजे नक्की काय? हे सायबर युद्ध घडतंय तरी कसं ? या हल्य्यापासून वाचण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? यातून वाचण्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो? सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा: सायबर मैत्र 9307474960
सतत-सतत युट्युब बघून अभ्यास नको असं टीनएजर मुलामुलींना वाटू लागलाय का?या टीनएजर पिढीला युट्युबमधून अभ्यास शिकवासा का वाटतो ?पुस्तकं वाचली तरच ज्ञान प्राप्ती होते ही संकल्पनाडिजिटलायझेशननंतर झपाट्याने बदलली आहे.म्हणूनच आता तरी आपण आपल्या शिकवण्याच्या पद्धती,मुलांच्या जगाकडे बघण्याची नजर बदलणार आहोत का? नेमकं काय घडतंय मुलांच्या जगात? सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा: सायबर मैत्र 9307474960 
सोशल मीडिया चॅलेंजमध्ये भाग घेणं धोकादायक असू शकतं? तुम्ही जे फोटो शेअर करता त्यांचा दुरुपयोग होऊ शकतो हे तुम्हाला माहीत आहे का? सोशल मीडिया ट्रेंड आपला वैयक्तिक डेटा गोळा करण्यासाठी अनेकदा वापरले जातात हे तुम्हाला माहितेय? मग या मोहापासून लांब राहायचं कसं? ट्रेंडमध्ये भाग घेतला नाही तर नक्की आपलं काय बिघडतं? या प्रश्नांची नेमकी उत्तरं शोधूया जरा.. ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता powered by, सायबर Maitra-center for cyber, digital and psychosocial health.A Joint initiative by Adhishthan and Gry Foundation.  सायबर मैत्र संपर्क: ९३०७४७४९६०contactmaitra@gmail.com मराठी पॉडकास्ट ऐकण्यासाठी: www.marathipodcasters.com या साइटला भेट द्या.
OTT व्यसन म्हणजे काय?आपण सतत एका पाठोपाठ एक वेब सीरिअल्सचे सीझन्स संपवतो म्हणजे नक्की काय करत असतो?वेब सीरिअल्स बघण्याच्या व्यसनाची लक्षणं काय?ती तुमच्यात आहेत का हे कसं ओळखाल?जाणून घ्या, स्क्रीन टाइम विथ मुक्ता च्या या भागात! ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता powered by, सायबर Maitra-center for cyber, digital and psychosocial health.A Joint initiative by Adhishthan and Gry Foundation.  सायबर मैत्र संपर्क: ९३०७४७४९६०contactmaitra@gmail.com मराठी पॉडकास्ट ऐकण्यासाठी: www.marathipodcasters.com या साइटला भेट द्या. 
२०३० पर्यंत स्मार्टफोन वापरणे बंद होणार आहे का?आपण खरंच वेअरेबल आणि इम्प्लांट टेक्नॉलॉजी वापरायला लागू?उद्या आपल्या मेमरीज हॅक झाल्या तर?आपला मेंदू दुसऱ्याच्या ताब्यात गेला तर?काय आहे स्मार्टफोनचं भविष्य?स्मार्टफोन ऐवजी आपण नक्की काय वापरू?समजून घेण्यासाठी स्क्रीन टाइम विथ मुक्ताचा हा भाग नक्की ऐका! पॉडकास्ट शेअर करा. सबस्क्राईब करा.  ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता powered by, सायबर Maitra-center for cyber, digital and psychosocial health.A Joint initiative by Adhishthan and Gry Foundation.  सायबर मैत्र संपर्क: ९३०७४७४९६०contactmaitra@gmail.com मराठी पॉडकास्ट ऐकण्यासाठी: www.marathipodcasters.com या साइटला भेट द्या. 
तुमचं मूल मोबाईल कधी वापरायला लागलं?  मुलांना फोन देताना,त्यातल्या धोक्यांविषयी त्यांच्याशी बोलला होतात का?ते धोके तुम्हाला माहित आहेत का?मुलांच्या फोन वापराला काही नियम केले आहेत का?अवघड वाटतंय हे सगळं? काळजी करू नका...या एपिसोडमध्ये मुलांशी या सगळ्याविषयी कसंबोलायचं याच्या भरपूर टिप्स आहेत. पॉडकास्ट शेअर करा. सबस्क्राईब करा.  ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता powered by, सायबर Maitra-center for cyber, digital and psychosocial health.A Joint initiative by Adhishthan and Gry Foundation.  सायबर मैत्र संपर्क: ९३०७४७४९६०contactmaitra@gmail.com
जगभरात रोज जवळपास २.३ बिलियन फोटो घेतले जातात. त्यातले ४ टक्के म्हणजे ९२ मिलियन फक्त सेल्फीज असतात.काय आहे सेल्फी मागची मानसिकता? सेल्फी काढण्याचं खरंच व्यसन लागू शकतं का? स्वतःचे सतत फोटो काढणं हा कुठला आजार असू शकतो का?सतत सेल्फीचा मोह टाळायचा आहे?माहित करून घ्यायचं आहे? मग स्क्रीन टाइम विथ मुक्ता चा हा भाग नक्की ऐका. पॉडकास्ट शेअर करा. सबस्क्राईब करा.  ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता powered by, सायबर Maitra-center for cyber, digital and psychosocial health.A Joint initiative by Adhishthan and Gry Foundation.  सायबर मैत्र संपर्क: ९३०७४७४९६०contactmaitra@gmail.com
व्हॉट्सअप एकदा उघडलं की किती वेळ जातो लक्षातच येत नाहीये?गेमिंगची शेवटची पाच मिनिटं कधीच येत नाहीत?मुलांच्या हातातल्या मोबाईलचं करायचं काय समजत नाहीये?मोबाईलचं व्यसन लागू नये यासाठी नेमकं काय करायचं हे समजून घ्यायचं असेल, काही सोप्या युक्त्या आणि टिप्स हव्या असतील तर स्क्रीन टाइम विथ मुक्ता चा हा भाग नक्की ऐका. स्क्रीन टाइम विथ मुक्ता Powered by Maitra - Center for cyber, digital and psychosocial health. अधिष्ठान आणि ग्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला उपक्रम.अधिक माहितीसाठी संपर्क: मैत्र - 9307474960 किंवा contactmaitra@gmail.com विविध मराठी पॉडकास्ट ऐकण्यासाठी भेट द्या: https://marathipodcasters.com/
तुम्ही कधी 'फोमो'चा अनुभव घेतला आहे?कितीही लाईक्स मिळाले तरी मस्त वाटत नाही, असं कधी झालं आहे?सोशल मीडियावर होणाऱ्या वादावादीमुळे, ट्रोलिंगमुळे निराशा आली आहे?सोशल मीडिया डिप्रेशन म्हणजे काय? त्याचे आपल्यावर काय परिणाम होतात? आणि त्यातून बाहेर पडायचं कसं? हे समजून घेण्यासाठी ऐका स्क्रीन टाइम विथ मुक्ता. विशेष संवाद कौन्सिलर गौरी जानवेकरबरोबर.  Powered by Maitra - Center for cyber, digital and psychosocial health. अधिष्ठान आणि ग्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला उपक्रम.अधिक माहितीसाठी संपर्क: मैत्र - 9307474960 किंवा contactmaitra@gmail.com विविध मराठी पॉडकास्ट ऐकण्यासाठी भेट द्या:  www.marathipodcasters.com
मी आणि माझ्या मुलीनं नो स्क्रीन डे केला. म्हणजे नेमकं काय केलं?कसा होता आमचा अनुभव?नो स्क्रीन डे चॅलेंज घेणार असाल तर काय करा आणि काय करू नका.. हे जाणून घेण्यासाठी ऐका, स्क्रीन टाइम विथ मुक्ता Powered by Maitra - Center for cyber, digital and psychosocial health. अधिष्ठान आणि ग्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला उपक्रम.  अधिक माहितीसाठी संपर्क: मैत्र - 9307474960 किंवा contactmaitra@gmail.com
एखादा मेसेज आपल्याला मिळाल्यावर तो मेसेज खरा आहे की खोटा हा प्रश्न आपण स्वतःला विचारतो का? एखादा अफवा पसरवणारा मेसेज आलाच तर नक्की करायचं काय? मेसेज फॉरवर्ड करताना कुठल्या पाच गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजेत? हे माहीत करुन घेण्यासाठी ऐका, स्क्रीन टाईम विथ मुक्ता Powered by Maitra - Center for cyber, digital and psychosocial health. अधिष्ठान आणि ग्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला उपक्रम.  अधिक माहितीसाठी संपर्क: मैत्र - 9307474960 किंवा contactmaitra@gmail.com
वय वर्ष 10 पासून मुलं porn बघायला लागतात असं अनेक अभ्यासातून दिसून आलं आहे. भारतात 5 ते 11 वयोगातले 6.6 कोटी मुलं ऍक्टिव्ह इंटरनेट युजर्स आहेत. अशावेळी porn मुलांपर्यंत पोचतं कसं हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे.त्याचप्रमाणे मुलांशी porn विषयी कसं, कधी आणि काय बोलायचं?पालक आणि शिक्षकांच्या मनातल्या या प्रश्नांची उत्तर! Music by <a href="https://pixabay.com/users/ashot-danielyan-composer-27049680/?utm_source=link-attribution&utm_medium=referral&utm_campaign=music&utm_content=131746">Ashot-Danielyan-Composer</a> from <a href="https://pixabay.com/music//?utm_source=link-attribution&utm_medium=referral&utm_campaign=music&utm_content=131746">Pixabay</a>
पुण्यातल्या एका तीस वर्षीय महिलेने मॅट्रिमोनिअल फ्रॉडमध्ये २० लाखांहून अधिक रक्कम गमावली आहे. रोज देशभरात कुठे ना कुठे अशा पद्धतीच्या फसवणुकीच्या बातम्या येत असतात. हा सगळा प्रकार काय असतो? कशापद्धतीने लोकांना टार्गेट केलं जातं, आपण अशा कुठल्याही जाळ्यात सापडू नये यासाठी काय केलं पाहिजे, हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच हा सगळा विषय आपण समजून घेणार आहोत प्रसिद्ध सायबर वकील ऍड. वैशाली भागवत यांच्या कडून.. ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता
कोरोना महामारीत आपण सोशल डिस्टनसिंगची सतत चर्चा करत होतो, पण व्हर्चुअल सायकॉलॉजीकल डिस्टनसिंगचा कधी विचार केलाय का? आपण गुंतून पडलो आहोत का आभासी जगात? भावनिक आणि मानसिक वेळ किती द्यायचा हे ठरवण्याची वेळ आली आहे का? सोशल मीडियावर आपला किती वेळ जातो याचा कधी विचार केलाय का? जाणून घ्या, या भागात!
loading
Comments 
loading
Download from Google Play
Download from App Store