पूरस्थितीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या तर आधी महापालिका निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने शिंदेंच्या शिवसेनेशी युती केली तरी अन्य महापालिकांत भाजपला मित्रपक्षाची गरज नाही. स्वबळावरच निवडणुका लढविल्यास पक्षाला जास्त फायदा होऊ शकतो, अशी कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांची भावना आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील युतीचा विषय लांबणीवर पडलेला आहे. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics 2025, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Political analysis India, Local Body Election, Maharashtra Election, BJP, Devendra Fadnavis
लडाखला राज्याचा दर्जा देण्याच्या आणि घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी नुकतेच तेथे मोठे आंदोलन झाले. लडाखचे संकट संपलेले नसून, ते अद्याप कायम आहे. लडाखच्या जनतेसाठी सोनम वांगचुक यांची भूमिका, त्यांचे ठाम राहणे सरकारने मांडलेल्या रचितकथनापेक्षा अधिक वजनदार आहे. लडाखमधील नागरिकांचा त्यांच्या आंदोलनाला आणि त्यांनी मांडलेल्या भूमिकेला पाठिंबा कायम आहे. तो का आहे? आणि हा भडका नेमका का पडला? याबाबत सरकारनामासाठी लिहिले आहे, श्रीनगरच्या जावेद मात्झी यांनी. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics 2025, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Political analysis India, Ladakh, Ladakh Issue, BJP, National Issue in india
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) नुकतेच प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. तसेच कांदाप्रश्नी आक्रोश मोर्चाही आयोजित केला होता. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश देणाऱ्या नाशिकमध्ये विधानसभेत मात्र अपेक्षित यश मिळवता आले नाही. शरद पवार यांना नाशिक जिल्ह्याने सातत्याने साथ दिली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर महायुतीला शह देण्यासाठी पवारांनी नाशिकची निवड केली. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics 2025, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Political analysis India, Nashik, NCP, Sharad Pawar.
पोलिस दलात उच्च पदांवर असलेले अनेक जण न्यायाची, सत्याची कास धरण्यात, कायद्याची यथायोग्य अंमलबजावणी करण्यात, कायद्यासमोर सर्वांना समान लेखण्यात कमी पडतात. पण सदानंद दाते यांच्यासारखे काही त्यास अपवाद आहेत. घटनेचा मान राखण्याची शपथ तंतोतंत पाळणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांमध्ये दाते यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचा मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये दौरा झाला. लोकसभेत मराठवाड्यातील एकमेव खासदार आणि विधानसभेत जिल्ह्यात सहा आमदार असे घवघवीत यश मिळाल्यानंतर शिंदे तब्बल 14 महिन्यानंतर संभाजीनगरच्या मतदारांचे आभार मानण्यासाठी आले. अर्थात निमित्त होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची पूर्वतयारी आणि पक्षांतर्गत कुरबुरी थांबवण्यासाठीचा खटाटोप.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मुंबईत का धडकले, सरकारने आंदोलकांना थोपविण्यासाठी काय प्रयत्न केले, मुंबईतील मराठा आंदोलन सरकारने कशा पद्धतीने हाताळले... या सर्वच प्रश्नांवर चर्चा करण्याची गरज आहे. आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी एकीकडे प्रशासकीय यंत्रणा मार्ग काढत असताना राजकीय पातळीवर आंदोलन कसे हाताळले गेले, हेही तपासणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात असल्यानंतर संघाच्या संपर्कामुळे आगामी निवडणुकीत मदत होईल, उमेदवारी मिळविण्यात अडचणी येणार नाहीत असे इच्छुकांना वाटत आहेत. त्यामुळे संघाच्या कामाकडे एक नामी संधी म्हणून भाजप कार्यकर्ते पाहत आहेत.
मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि सुरेश वरपूडकर भाजपात दाखल झाले. तर परतूरचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
80-90 च्या दशकातील काँग्रेस नेतृत्वाला कट्टरपणे विरोध करणारे नेतृत्व म्हणून अण्णासाहेब डांगे यांची ओळख होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अनेक पराभव पचवत भाजप रुजवण्यासाठी प्रयत्न केले. आता पुन्हा ते भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे भाजपला त्याचा फायदाच होईल.
मुंबई शहरात कबुतरप्रेमी नागरिक आक्रमक झाले आहेत, तर तिकडे कोल्हापूरातील शिरोळ येथील मठामधील माधुरी हत्तीणीला वनतारा पुनर्वसन केंद्रात नेल्याने हजारो नागरिक रस्त्यावर आले आहेत. या दोन्ही प्रकरणांत जैन समाज हा समान धागा आहे.
राज ठाकरे जेथे जातील तेथे प्रसारमाध्यमे पोहोचतातच. ते प्रसारमाध्यमांना काही ना काही बातम्या पुरवतातच. इगतपुरीच्या या ‘रिसॉर्ट’वर ठाकरेंनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक संवाद साधला. त्या गप्पांच्या ओघात त्यांनी ‘तुमच्या नाशिकमध्ये काय चाललेय हे तुम्हाला माहीत नाही का? असा सवाल पत्रकारांना केला. तिथूनच 72 अधिकारी, राजकीय नेत्यांच्या ‘हनी ट्रॅप’च्या चर्चेला तोंड फुटले.
मराठी भाषा मारहाण करून शिकून येणार नाही, असे मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले. मात्र आवड, सहिष्णुता आणि परप्रांतीयांना मराठी भाषेचा लळा लागावा, यासाठी प्रेमाने काय करता येईल, याबाबतचे मार्गदर्शन राज्यपालांनी करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर मराठीच्या हितासाठी राज्यपालांनी राज्य सरकारलाही काही गोष्टी सांगणे अत्यंत गरजेचे आहे.
2014 मध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला. एकट्या भाजपला 282 जागा जिंकता आल्या. 1984 नंतर पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले होते. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर 2019 आणि 2024 या लोकसभा निवडणुकांत भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला.
मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेचा एक एक शिलेदार अडचणीत येत आहे. अर्जुन खोतकरांपासून सुरु झालेले संकट आता संजय शिरसाट यांच्यापर्यंत येऊन पोहचले आहे. या सर्वांमुळे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विशेषतः यामुळे शिंदे आणि शिवसेनेची प्रतिमा मालिन होत आहे
अपंग बांधवांच्या हक्कासाठी गाडी अडवणाऱ्या, आंदोलनातून सरकारला जागं करणाऱ्या आणि राजकारणात लोकाभिमुखतेची नवी ओळख निर्माण करणाऱ्या बच्चू कडू यांच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अपंगांचं न्यायासाठीचं आंदोलन, आणि मंत्री झाल्यावरही लोकांच्या दारात पोहोचणारा थेट भिडणारा नेता – हा आहे विदर्भातून उभा राहिलेल्या एका खऱ्या लोकनेत्याचा प्रवास
ज्येष्ठांचा सन्मान कसा राखायचा, राजकारणात शालीनता कशी जपायची, हे शिवराज पाटील चाकूरकर यांनी दाखवून दिलं आहे.अय्यूब कादरी
महाराष्ट्राला लाभलेल्या सुसंस्कृत राजकीय नेत्यांमध्ये, सर्वात उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांमध्ये विलासराव देशमुख यांची गणना होते.अय्यूब कादरी
राजारामबापू पाटील यांनी शिक्षण, सहकारक्षेत्रात अमूल्य असं योगदान दिलं आहे. शालेय जीवनापासूनच ते देळाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते.अय्यूब कादरी
उमरग्याचे दोनदा आमदार आणि धाराशिवचे एकदा खासदार राहिलेल्या प्रा. रवींद्र गायकवाड यांनी धर्मनिरपेक्षतेची मूल्ये खऱ्या अर्थाने जपली आहेत. अय्यूब कादरी
आपण एक झालो तर राज्यकर्ती जमात बनू शकतो, याचं राजकीय आत्मभान दलित आणि अन्य मागासवर्गीयांमध्ये कांशीराम यांनी जागृत केलं होतं. अय्यूब कादरी
Viju Kumar
It SEEMS that you are on payroll against BJP. असे वाटते की भाजपा विरोधाची ठेकेदारी घेतली आहे. प्रेताला किती ही फुलाने झाकले तरी त्याचा भयाणपणा लपत नाही. काश्मीर, राम मंदिर, तीन तलाक, भारताची सध्याची प्रगती, जगात आताची धमक, उरी स्ट्राइक, balakot bombing etc हे सर्व विसरलायला एक पिढी जावी लागेल. तो पर्यंत करा तमाशा.