प्रकृती : आरोग्याचा पॉडकास्ट | Prakruti : Health Podcast

Health is natural. Health is not dependency on medicines. Health is balance, equilibrium of the five elements within. Prakruti brings you learning and unlearning of our habits, food, exercise, rest and general daily routine. Small changes big difference. Prakruti brings you good recipes, exercises, fun and simple tricks and treatments, wonderful case studies and a lot more.

स्नान उपचार Naruropathy baths,

आपण रोजच पाण्याने स्नान करतो, मग त्यात विशेष काय? कोणकोणती स्नानं असतात ते तर आज मी सांगणारच आहे. पण त्याबरोबर आणखी काही तरी सांगणार आहे. काय होतं, की हे स्नानोपचार घेण्यासाठी तुम्हाला कुठल्यातरी निसर्गोपचार केंद्रात जावं लागतं. तिथे सगळी साधनसामग्री असते, भरपूर आणि योग्य तपमानाचं पाणी असतं, हे उपचार शिकलेले उपचारक असतात. पण सर्वच ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असेलच असं नाही.  त्यामुळे आपल्याला घरी, उपलब्ध साधनांमध्ये, त्याच्या खालोखाल काही करता येईल का तेही आपण पाहाणार आहोत. हा एपिसोड कसा वाटला ते सांगा. मला ऑडिओ मेसेज पाठवा https://audiowallah.com/prakruti       किंवा प्रकृतीच्या इन्स्टा पेज  किंवा माझ्या फेसबुक पेजवर मला मेसेज पाठवा. https://www.facebook.com/vidula.tokekar    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==  नक्की सामील व्हा. आणि तुमच्या फिटनेसबद्दल, किंवा आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.  

02-16
12:53

जादूची लपेट The Magic Band

पाणी अनेक प्रकारांनी उपचारासाठी वापरलं जातं. आज आपण पाहाणार आहोत ती जादूची पट्टी अर्थात लपेट पट्टी हा त्यातलाच एक भाग. वापरण्यास अतिशय सोपा, सुटसुटीत, सहज आणि अतिशय परिणामकारी. या  जादूच्या पट्टीचं नाव आहे, लपेट पट्टी किंवा वेट पॅक. डोकं दुखत असेल तर डोक्याला. हात पाय कंबर दुखत असेल तर त्या त्या ठिकाणी,  पोट साफ होत नसेल, घशाशी येत असेल, मूत्रविकार असतील तर पोटाला लपेटून ठेवायची. दारात बोट चेमटलं, मान लचकली, कंबर धरली, अति व्यायामाने स्नायू दुखावले, जास्त वजन उचलल, प्रवासात मान अवघडली, खरचटलं, कापलं – लपेट पट्टी. जखम झाली, लपेट पट्टी. भाजलं, लपेट पट्टी. मुका मार – लपेट पट्टी. थायरॉइड, बीपी, लठ्ठपणा -– लपेट पट्टी. कीटकदंश, मुंगी चावणे इत्यादी - लपेट पट्टी  अगदी मूळव्याधीवरसुद्धा पूरक उपचार म्हणून लपेट पट्टी.  सगळयाला ही लपेट पट्टी लपेटणे. एवढं कसं काय जमतं बुवा या लपेट पट्टीला? शास्त्र सोपं आहे त्याच्यामागचं. हा एपिसोड कसा वाटला ते सांगा. मला ऑडिओ मेसेज पाठवा https://audiowallah.com/prakruti       किंवा प्रकृतीच्या इन्स्टा पेज  किंवा माझ्या फेसबुक पेजवर मला मेसेज पाठवा. https://www.facebook.com/vidula.tokekar    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==  नक्की सामील व्हा. आणि तुमच्या फिटनेसबद्दल, किंवा आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

01-30
16:40

नैसर्गिक प्रथमोपचार First Aid

नेहमीच्या तक्रारी, तसं म्हटलं तर किरकोळ, पण त्रासदायक. त्यावर काहीतरी झटपट उपाय करून कामाला लागावं ही इच्छा.  पण तुमच्या निसर्गोपचारात तर परिणाम व्हायला वेळ लागतो म्हणे, मग काय, गोळीच घ्यावी लागणार ना! नाही नाही नाही... शुद्ध गैरसमज.  निसर्गोपचारात तर सगळ्यात झटपट परिणाम दिसतात. तुमच्या स्वतःच्या शरीरापेक्षा आणि निसर्गापेक्षा शक्तिमान काय आहे?  गोळी घेऊन १५ मिनिटांत तात्पुरतं डोकं दुखायचं थांबत असेल, तर नैसर्गिक प्रथमोपचारांनी ते दहाच मिनिटांत थांबणार आहे. बघा प्रयोग करून.  काय करायचं? तेच तर सांगणार आहे आजच्या एपिसोडमध्ये. हा एपिसोड कसा वाटला ते सांगा. मला ऑडिओ मेसेज पाठवा https://audiowallah.com/prakruti       किंवा प्रकृतीच्या इन्स्टा पेज  किंवा माझ्या फेसबुक पेजवर मला मेसेज पाठवा. https://www.facebook.com/vidula.tokekar    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==  नक्की सामील व्हा. आणि तुमच्या फिटनेसबद्दल, किंवा आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

01-18
15:40

पर्व दुसरे - अध्याय दुसरा

प्रकृती पॉडकास्टचे ४१ भाग ऐकल्यानंतर आता नवं काय? दुसऱ्या पर्वात काय आहे? नॅचरोपॅथीमध्ये औषधं गोळ्या इंजेक्शन असं काही नसतं. मग नॅचरोपॅथीमध्ये डॉक्टर करतात तरी काय? दुसऱ्या पर्वात आपण त्याचीच ओळख करून घेणार आहोत. शिवाय नव्या भन्नाट उपक्रमाची सुरुवात - ऐकताय काय, सामील व्हा! उपक्रमात सामील होण्यासाठी मला ऑडिओ मेसेज पाठवा https://audiowallah.com/prakruti       किंवा प्रकृतीच्या इन्स्टा पेज  किंवा माझ्या फेसबुक पेजवर मला मेसेज पाठवा. https://www.facebook.com/vidula.tokekar    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==  नक्की सामील व्हा. आणि तुमच्या फिटनेसबद्दल, किंवा आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

01-01
06:27

संकल्प करायचा तो पूर्तीसाठी

नवीन वर्षाचा संकल्प करायचा आणि तो पार पाडायचा. २०२४ मध्ये तंदुरुस्तीची एक पायरी वर चढायचीच.  ताकद, चपळपणा, लवचिकता, संतुलन आणि दमसास या पाचही आघाड्यांवर ठरवून, चांगली प्रगती करायचीच. ठरवलं की होतं! त्यासाठी संकल्प कसा करायचा आणि त्याच्या पूर्तीची आखणी कशी करायची याबद्दलचा हा एपिसोड.  तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==  आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

12-26
13:49

पडो झडो माल वाढो

निसर्गोपचाराने सगळी दुखणी, दुखापती बऱ्या होतात हे मी सगळ्यांना सांगते, पण जेव्हा माझ्यावरच बेततं, तेव्हा मी काय करते? मला झालेली बऱ्यापैकी मोठी जखम कशी बरी झाली त्याची गोष्ट. साधा, सोपा, नैसर्गिक तोच सर्वात जलद उपाय. ही गोष्ट. निसर्गोपचाराची शक्ती दाखवणारी आणि आत्मविश्वास वाढवणारी. तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==  आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

12-23
10:38

60@60

माझ्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी १२ तासांत ६० किमी अंतर चालले त्याची ही गोष्ट. आणि त्यानंतर लगेच नेहमीसारखी कामाला लागले, एकही दिवस शिणवटा आला नाही, हा गोष्टीचा उत्तरार्ध. का, कसं, कशासाठी, कुठे, केव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एपिसोडमध्ये आहेत. ६० किमी हा काही विशेष पराक्रम नाही, तुम्ही खरोखरचे मोठे पराक्रम केले असतील तर मला कळवा, आपण ते सर्वांपर्यंत पोचवू. किंवा असं काहीतरी तुम्हाला करावंसं वाटत असेल, तरी मला सांगा, तुम्हाला मदत करायला मला नक्कीच आवडेल.  तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==  आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

09-13
33:22

कर्बोदके Carbohydrates

कर्बोदकं सदैव वादात अडकलेली असतात. एका बाजूला लो कार्ब डाएटचा हिरीरीने पुरस्कार करणारे आणि दुसऱ्या बाजूला हाय कार्ब डाएटच कसं आवश्यक आहे हे पटवून सांगणारे तज्ज्ञ असतात. तुम्ही यांच्या मध्ये कुठेतरी असाल. पण पुष्कळांच्या मनात शंका असतेच की कार्ब्ज खाऊ की नको? मी जास्त तर खात नाहीये ना? कार्ब्ज कमी पडली तर प्रोटीन लॉस तर होणार नाही ना? ही कर्बोदकं शरीरात नेमकं असं काय करतात की जेणे करून माणसांना त्यांच्याबद्दल इतकी शंका वाटते ते पाहू.  तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==  आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

08-26
10:30

जीवनसत्त्वे आणि खनिजे Vitamins and Minerals

आज आपण मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा जीवनसत्त्वं आणि खनिजं यांच्याबद्दल बोलणार आहोत. फक्त मायक्रोग्राम आणि मिलिग्राममध्ये आवश्यक असणारे अन्नघटक इतकं अत्यावश्यक काम करत असतात की त्या मायक्रोग्राममधला एक कण दोनचार दिवस कमी पडला तर आपल्या जीवनक्रियांवर परिणाम होतो. म्हणूनच त्यांना जीवन-सत्त्व म्हटलं आहे.  नियोजन - स्वयंपाकाचं, स्वास्थ्याचं या भाग तुम्ही इथे ऐकू शकता. तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==  आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

08-19
13:13

शक्तिमान प्रथिने Powerpacked Proteins

प्रथिनं – प्रोटीन्स आपल्या शरीरात जात आहेत, ती कमी पडत नाहीत ना, याबद्दल किशोरवयीन मुलामुलींपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना अत्यंत काळजी असते. ती बरोबरच आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाची काळजी असायला हवी ती म्हणजे ती शरीरात शोषली जात आहेत ना, म्हणजेच अंगी लागत आहेत ना, म्हणजेच पचत आहेत ना याची. दूध - सत्य आणि मिथ्य या भाग तुम्ही इथे ऐकू शकता. तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==  आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.    

08-12
15:01

कानफाट्या स्निग्ध पदार्थ!

या भागात आपण बोलणार आहोत स्निग्ध पदार्थ उर्फ चरबी उर्फ फॅट्स बद्दल. स्निग्ध! किती गोड, स्नेहाळ, शांत शब्द आहे ना! पण बहुतेक याचा धसका घेतल्यासारखं वागतात. आणि तसं करताना आपण किती विनोद करतो आणि सहज जे खाल्लं जातं, पचतं, अंगी लागतं, त्याऐवजी अधिक गुंतागुंतीचं, अधिक महाग, अधिक जड असं फॅट कसं खातो तेही मी सांगणार आहे.  तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो ते मला नक्की सांगा.  तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==  आणि माझ्याशी तुमच्या आरोग्याबद्दल बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

08-05
11:31

तंतुमय पदार्थ Dietray fiber

प्रत्यक्ष न पचता पचनक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारा, आतड्यांचं आरोग्य चांगलं राखणारा, कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणारा, साखरेची पातळी नियंत्रित ठेवणारा,वजन आटोक्यात ठेवणारा अत्यंत महत्त्वाचा, बहुगुणी पण दुर्लक्षित अन्नघटक म्हणजे तंतुमय पदार्थ.  One of the most important factor for digestion, that keeps the gut healthy, reduces cholesterol, controls blood sugar, controls weight - A crucial yet neglected food component - Dietary Fiber!  तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो ते मला नक्की सांगा.  तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==  आणि माझ्याशी तुमच्या आरोग्याबद्दल बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

07-30
12:37

पावसाळ्यात नाही भिजायचं तर कधी? It's Mad Monsoon!!!

भिजणं, वारा खाणं, ऊन अंगावर घेणं, समुद्रात लाटांशी मस्ती करणं, डोंगर दऱ्या पालथ्या घालणं, हाडापर्यंत कुडकुडणं, वाऱ्याची शांत झुळुक, हसरं चांदणं अंगावर घेणं हा सगळा त्या निसर्गाचा स्पर्श आहे. चला, पावसाळ्याच्या निमित्ताने निसर्गाला स्पर्श करायला, त्याच्या कुशीत शिरायला सुरुवात करू या.  तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो ते मला नक्की सांगा. तुमच्या वर्षासहलींचे फोटो पाठवा,  तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar   https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en  आणि माझ्याशी तुमच्या आरोग्याबद्दल बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

07-07
09:20

योग दिन विशेष Yog Day Special

योग म्हणजे केवळ योगासने नाही शारीरिक कसरती नाही, श्वासोच्छ्वासाचे वेगवेगळे प्रकार नाही. मग योग म्हणजे काय? शरीरं मन, बुद्धी, आतमा यांचं एकीकरण - योग साधण्याच्या आठ पायऱ्या. एक सम्यक जीवनपद्धती. सांगत आहेत तरुण योगसाधक श्रुती शिंदे आणि गायत्री शेटे. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो ते मला नक्की सांगा. तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar   https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en  गायत्री आणि श्रुती यांच्या सुहासिनी योग संस्थेची माहिती मिळेल https://www.facebook.com/SuhasiniYogaClasses/ त्यांच्या यूट्यूब चॅनलची लिंक आहे https://www.youtube.com/channel/UCZKi-WaCzwni0UKd4e4KWxw 

06-20
37:50

मुलींनो तुमची त्वचा कशाला घाबरते? Scary Skincare

शृंगार तातडी आणि अंगाची निघाली कातडी अशी एक रोखठोक म्हण मराठीत आहे.  सौंदर्यप्रसाधने, समजुती, गैरसमजुती आणि पर्याय यांच्याबद्दल ऐका या एपिसोडमध्ये. तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar   https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

06-06
15:37

मोठ्ठी तिची सावली Mother's Day Special

खाण्यापासून ते झोपेपर्यंत, चांगल्या सवयी लावाव्या अशी आईची तळमळ. आणि मला समजतंय ग मी काय करतेय ते हे मुलाचं म्हणणं. यात आपण कॉमन मिनिमम नाही तर म्युच्युअल ॲबंडंट प्रोग्राम बघणार आहोत.    आईने मुलांसाठी काय करावं आणि मुलांनी आईसाठी काय करावं.....काही सवयी आईसाठी आणि काही सवयी मुलांसाठी.आई आणि मुलांनी एकमेकांचे लाड करण्याची ही अष्टसूत्री.  तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar   https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en  दुधाबद्दलच्या एपिसोडची लिंक आहे https://open.spotify.com/episode/13ikuhbCoYsi1JIMoW4CJY?si=00313886e52b4542  

05-13
14:17

काय भुललासी वरलिया रंगा Reading healthy food lables

हेल्दी, न्यूट्रिशस, पोषक, ग्रोथ, मिलेट्स ही की वर्ड्स आहेत आपल्याला अंध करण्याची.  म्हणजे आपण उघड्या डोळ्यांनी हे बौद्धिक अंधत्व स्वीकारतो. असं काहीतरी नाव असलं, की आपल्याला वाटतं, खरंच हेल्दी असणार, उगीच लिहितील का तसं? तरी आपण त्याची लेबल्स वाचतो. घटक पदार्थ वाचतो. तरीही आपल्याला काही कळत नाही, उमजत नाही,  या एपिसोडमध्ये आपण अशाच काही की वर्डस् गुंफलेल्या पदार्थाचीं लेबल्स वाचणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला अशी काही लेबल्स सांगणार आहे, की ती शंभर टक्के प्रामाणिक आहेत.  त्यामुळे हा एपिसोड शेवटपर्यंत ऐका. म्हणजे तुम्हाला खरा खरा हेल्दी खाण्याचा चॉइस करायचा असेल तर कुठली प्रॉडक्ट्स उचलायची ते अचूक कळेल.  

05-09
13:17

दुखणं पोटाला अन् चिंधी डोक्याला symptoms? illness?

उपचार कशावर होताहेत? लक्षणांवर की आजारावर? लक्षणं आणि आजार यांच्यातला फरक कसा ओळखायचा? आजार पटकन कसा बरा होतो? ऐका या भागामध्ये. म्हणजे दुखणं पोटाला अन् चिंधी कपाळाला, अशी अवस्था होणार नाही. What are you treating really? Symptoms or the illness? how do you differentiate between the two?  How do you CURE the illness quickly?  Listen to this episode and know about it!  तुम्ही प्रकृती पॉडकास्ट ऐकून काय काय बदल केेले हे मला नक्की कळवा.  फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar   https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en  The links of the articles mentioned in the episode: https://www-hopkinsallchildrens-org.translate.goog/Patients-Families/Health-Library/HealthDocNew/How-Do-Pain-Relievers-Work?_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=mr&_x_tr_pto=rq#:~:text=When%20you%20take%20a%20pain,message%20as%20quickly%20or%20clearly. दि. २६ मार्च २०२३ ला पाहिली. https://doi.org/10.1080/13814780701377497     दि. २६ मार्च २०२३ ला पाहिली. both referred to on March 26, 2023.  

03-28
11:45

उपवास Fasting

लंघनं परमौषधिं असं म्हटलं आहे ते खरंच आहे. पोटाला विश्रांती दिल्याने शरीरातल्या विषद्रव्यांचा निचरा होतो, शरीर ताजंतवानं होतं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. उपास कसा करायचा आणि कसा सोडायचा, कधी, किती काळ करायचा, त्याचे काही साइड इफेक्ट्स होतात का. उपास करणं सोपं आहे, ते आपल्याला जमेल हा आत्मविश्वास देणारा हा एपिसोड ऐका आणि ऐकवा. Fasting is the best medicine. Fasting is the best health routine. Your body will thank you if you give rest to your stomach regularly.  The episode will give you confidence that you can keep fasting week after week and stay healthy forever.  प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा. तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar  https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en     

03-10
19:20

खेळाडू ते चँपियन sportsman to champion

खेळाडू व्हायचंय? खेळाडूपासून चँपियन पर्यंत जायचंय? तुमच्या मुलांना खेळाडू व्हायचंय? फिटनेसमध्ये नवे विक्रम करायचेत? शरीर कमवायचंय? मॅरेथॉन धावायची आहे? तर मग हा एपिसोड ऐकलाच पाहिजे. हे अविश्वसनीयच सत्य आहे याची प्रचीती घेतलीच पाहिजे.  Are you a sportsperson? Want to become a champion? Want your kids to excel in sports? Wish to achieve new heights in fitness? Building your body? Training to run a marathon? Then this episode is a must for you. You will realise that THIS IS THE TRUTH!  Dr. Anand Kelkar is the national level weight lifter and  a coach, fitness advisor and the naturopathy Guru. He can be reached at Kelkar Health Solutions, Sadashiv Peth, Pune, Telephone number 9423003196; email anandkelkar19@gmail.com प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा. तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar  https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en   

02-25
41:21

Recommend Channels