Discoverikakey ऐकाकी
ikakey ऐकाकी

ikakey ऐकाकी

Author: Sachin Pandit

Subscribed: 1Played: 0
Share

Description

ikakey - in Marathi 'Aika Ki' - means please listen, We have come up with a very unique concept of Audio Learning - That means, you can learn without looking at the screen. We have our audio learning app called ikakey, where students can listen to audio lessons from the textbook, study with the help of audio notes and enrich themselves with a different educational experience. We now aim at making a difference in the system and meaning of education by directly connecting with Students, Teachers and Parents. Through this podcast, we will connect with all enthusiasts who are keen to 'learn'.
26 Episodes
Reverse
इ-लर्निंग, ऑनलाईन लर्निंग, डिजिटल लर्निंग - हे आजच्या काळातले buzz- words आहेत. जगातील सर्व शिक्षण संस्था आणि कोर्पोरेट्स आज इ-लर्निंग चा वापर करत आहेत. जगभरामध्ये इ-लर्निंग कन्टेन्ट क्रिएशन खूप जोमाने वाढतंय आणि ह्यातील करिअर ची डिमांड सुद्धा, ह्या क्षेत्रात कशी सुरुवात करायची, काय फॉर्मल शिक्षण घेऊन ह्यात करिअर करता येईल ? Link for MIT ADT - Course information https://shorturl.at/adiH7 - https://mituniversity.ac.in/academics/faculty/faculty-of-humanities-and-social-sciences/mit-school-of-education-research/programs-offered/ MIT ADT University , लोणी काळभोर इथे MA /MSC e-learning हा कोर्स सुरु झालाय, भविष्यात हमखास काम मिळवून देणारा हा कोर्स नक्की काय आहे ? एकंदरीतच इ-लर्निंग ह्या क्षेत्राविषयीची हकीकत जाणून घेउयात ह्या एपिसोड मध्ये. आपण गप्पा मारणार आहोत डॉ. अजिता देशमुख ह्यांच्याबरोबर. अजिता देशमुख खूप वर्षांपासून इ-लर्निंग मध्ये काम करतात आणि अनेक संस्थाना त्या शैक्षणिक सल्लागार म्हणून मदत करतात. स्वतः उत्तम पॉडकास्टर असलेल्या अजिता देशमुख ह्यांच्याकडून इ-लर्निंग मध्ये करिअर विषयी जाणून घेऊयात ऐकाकि च्या ह्या एपिसोड मधून
नमस्कार विद्यार्थी मिंत्रानो , पालकांनो आणि शिक्षक्षकांनो , ऐकाकी पॉडकास्ट च्या शिक्षणानिनीती सदरातल्या ह्या भागामध्ये तुमचे स्वागत, सध्या आपण गप्पा मारतो आहोत , वेगवेगळ्या करिअर क्षेत्रात काम करणाऱ्या प्रॅक्टिशनर्स बरोबर , म्हणजे जे त्या क्षेत्रात अगदी रोज काम करतात , , CA , CS , इन्शुरन्स कन्सल्टन्ट , रिअल इस्टेट adviser , बँकिंग क्षेत्र, इ-लर्निंग, वकिली आणि अशा व्यावसायिक स्वरूपाच्या करिअर मध्ये काय घडतं , त्या क्षेत्रात काम कसं चालू करायचं , काय अडचणी असतात , कोणत्या वयात ते करता येतं. काय शिक्षण लागत , ह्या सगळ्याची माहिती फ्रॉम हॉर्सेस माऊथ आपण घेतो आहेत, ज्याचा करिअर निवडताना नक्की फायदा होणार आहे, करिअर तज्ञांनी हि माहिती देणं आणि प्रत्यक्ष मध्य असलेल्यानि माहिती देणं .. नक्कीच फरक आहे ना ? तर . आज आपण गप्पा मारणार आहोत सारंग साठे ह्यांच्या बरोबर , जे रिअल इस्टेट adviser म्हणून गेली अनेक वर्ष काम करतात, त्या संबधीचे मार्गदर्शनपर क्लासेस ते चालवतात , त्याच बरोबर त्यांची स्वतःची एक Academy आहे For *Architecture, Interior Design And Civil Engg Students Sathe Academy, ज्या मध्ये ते AutoCAD 3DS Max Sketch Up Vray Revit Architecture असे विषय शिकवले जातात , ते स्वतः उत्तम ट्रेनर आहेत आणि Having Own Book Of AutoCAD कॉल्ड easycad , https://www.youtube.com/watch?v=tdlmnjOHStw Ikakey app - apps.ikakey.com
नमस्कार विद्यार्थी मिंत्रानो , पालकांनो आणि शिक्षक्षकांनो , ऐकाकी पॉडकास्ट च्या शिक्षणानिनीती सदरातल्या ह्या भागामध्ये तुमचे स्वागत, सध्या आपण गप्पा मारतो आहोत , वेगवेगळ्या करिअर क्षेत्रात काम करणाऱ्या प्रॅक्टिशनर्स बरोबर , म्हणजे जे त्या क्षेत्रात अगदी रोज काम करतात , , CA , CS , इन्शुरन्स कन्सल्टन्ट , रिअल इस्टेट adviser , बँकिंग क्षेत्र, इ-लर्निंग, वकिली आणि अशा व्यावसायिक स्वरूपाच्या करिअर मध्ये काय घडतं , त्या क्षेत्रात काम कसं चालू करायचं , काय अडचणी असतात , कोणत्या वयात ते करता येतं. काय शिक्षण लागत , ह्या सगळ्याची माहिती फ्रॉम हॉर्सेस माऊथ आपण घेतो आहेत, ज्याचा करिअर निवडताना नक्की फायदा होणार आहे, करिअर तज्ञांनी हि माहिती देणं आणि प्रत्यक्ष मध्य असलेल्यानि माहिती देणं .. नक्कीच फरक आहे ना ? तर . आज आपण गप्पा मारणार आहोत सारंग साठे ह्यांच्या बरोबर , जे रिअल इस्टेट adviser म्हणून गेली अनेक वर्ष काम करतात, त्या संबधीचे मार्गदर्शनपर क्लासेस ते चालवतात , त्याच बरोबर त्यांची स्वतःची एक Academy आहे For *Architecture, Interior Design And Civil Engg Students Sathe Academy, ज्या मध्ये ते AutoCAD 3DS Max Sketch Up Vray Revit Architecture असे विषय शिकवले जातात , ते स्वतः उत्तम ट्रेनर आहेत आणि Having Own Book Of AutoCAD कॉल्ड easycad , https://www.youtube.com/watch?v=tdlmnjOHStw Ikakey app - apps.ikakey.com
नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो , पालकांनो आणि शिक्षकांनो, कॉलेजेस सुरु झाली आहेत, होत आहेत, आणि दहावी बारावी नंतर आपल्या अनेक मित्र मैत्रिणींनी करिअर स्ट्रीम्स निवडल्या आहेत, मागच्या एपिसोड मध्ये आपण करिअर तज्ज्ञ डॉ. श्रीराम गीत ह्यांच्याबरोबर गप्पा मारल्या होत्या. आणि त्यांनी सुचवल्या प्रमाणे आम्ही आता विद्यार्थी आणि पालक यांना परिपूर्ण माहिती मिळावी त्यादृष्टीने त्या त्या करिअरच्या संधी निवडून त्या क्षेत्रात यशस्वी पणे काम करणाऱ्या व्यक्तींशी आपण आता बोलणार आहोत , ह्यात आम्ही विशेष करून BA , बीकॉम स्ट्रीम निवडलेल्या विद्यार्थाना कोणत्या संधी असतात , त्यासाठी काय तयारी करावी लागते. आणि पुढे आपली नोकरी किंवा व्यवसाय चालू करताना तो कसा करता येतो ह्या विषयी थोडी माही घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, अगदी straight from the horse's mouth म्हणतात ना तशी हि माहिती असेल. आज आपण गप्पा मारणार आहोत स्वछंद गोखले बरोबर, व्यवसायाने CS , म्हणजे कंपनी सेकेरेटरी स्वछंद प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहे , त्यांची स्पेशालिटी Startup and NGO consultancy. तो Gokhale Bhave & Associates मध्ये पार्टनर आहे आणि Finance content creator by name “FinancebySwag”
नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो , पालकांनो आणि शिक्षकांनो, कॉलेजेस सुरु झाली आहेत, होत आहेत, आणि दहावी बारावी नंतर आपल्या अनेक मित्र मैत्रिणींनी करिअर स्ट्रीम्स निवडल्या आहेत, मागच्या एपिसोड मध्ये आपण करिअर तज्ज्ञ डॉ. श्रीराम गीत ह्यांच्याबरोबर गप्पा मारल्या होत्या. आणि त्यांनी सुचवल्या प्रमाणे आम्ही आता विद्यार्थी आणि पालक यांना परिपूर्ण माहिती मिळावी त्यादृष्टीने त्या त्या करिअरच्या संधी निवडून त्या क्षेत्रात यशस्वी पणे काम करणाऱ्या व्यक्तींशी आपण आता बोलणार आहोत , ह्यात आम्ही विशेष करून BA , बीकॉम स्ट्रीम निवडलेल्या विद्यार्थाना कोणत्या संधी असतात , त्यासाठी काय तयारी करावी लागते. आणि पुढे आपली नोकरी किंवा व्यवसाय चालू करताना तो कसा करता येतो ह्या विषयी थोडी माही घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, अगदी straight from the horse's mouth म्हणतात ना तशी हि माहिती असेल. आज आपण गप्पा मारणार आहोत स्वछंद गोखले बरोबर, व्यवसायाने CS , म्हणजे कंपनी सेकेरेटरी स्वछंद प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहे , त्यांची स्पेशालिटी Startup and NGO consultancy. तो Gokhale Bhave & Associates मध्ये पार्टनर आहे आणि Finance content creator by name “FinancebySwag”
भाग २ पहिला भाग ऐकण्यासाठी Spotify - ऐकाकी - शिक्षणनीती https://open.spotify.com/show/3W7p1jTi8XuUuodql8a0bx Amazon Music - ऐकाकी - शिक्षणनीती https://music.amazon.com/podcasts/f41a6cd1-7611-4490-bbe8-bed1fea1514f/%E0%A4%90%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80-ikakey Tune in - ऐकाकी - शिक्षणनीती https://tunein.com/podcasts/Education-Podcasts/-(ikakey)-p2716185/ करिअर समुपदेशन आणि अभियोग्यता चाचण्या महत्त्वाच्या आहेत का ? ,करिअरबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यात, मदत करण्यात अशा चाचण्या महत्त्वाची भूमिका बजावतात का ? . ह्याच विषयावर डॉ. श्रीराम गीत ह्यांच्या बरोबरच्या गप्पा ह्या पॉडकास्ट मध्ये आहेत करिअर समुपदेशनाच्या 40 वर्षांहून अधिक काळ त्यांनी काम केलय, व्यवसायाने डॉकटर आणि बदलत्या करिअरच्या लँडस्केपचे ते साक्षीदार आहेत . डॉ. श्रीराम ह्यांनी करिअर संबधी अनेक पुस्तके लिहिली असून ती खूपच मार्गदर्शक आहेत करिअर चाचणी घेऊन पालक विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक अभ्यासक्रम आणि स्पेशलायझेशन निवडण्यास सक्षम करु शकतात करिअरच्या योग्य मार्गांसह त्यांची योग्यता अधोरेखित करण्यासाठी त्या मार्गदर्शन करु शकतात बदलत्या जॉब मार्केट आणि कौशल्याच्या गरजांबद्दल एक सखोल माहिती मिळते निःपक्षपाती निर्णय घेण्यात, सामाजिक आणि कौटुंबिक दबाव कमी करण्यात अशा चाचण्या मदत करतात व्यक्तींच्या क्षमता आणि करिअरच्या संधी यांच्यातील सांगड घालून एकूणच करिअर यश मिळेल. उत्तम पॉडकास्ट ऐकण्यासाठी - https://marathipodcasters.com Are career counseling and aptitude tests relevant? , Do such tests play a significant role in helping make informed career decisions? . On the same subject, a chat with Dr. Shriram Geet is in this podcast Being a doctor by profession and witnessing career change for more than 40 years. Dr. Sriram has written many career related books and they are very guiding Parents can help students choose suitable academic courses and specializations by taking a career test They can guide you in highlighting your aptitude along with suitable career paths Gain an in-depth understanding of the changing job market and skill needs Such tests help make unbiased decisions, reducing social and family pressure The combination of individual abilities and career opportunities determines career success.
करिअर समुपदेशन आणि अभियोग्यता चाचण्या महत्त्वाच्या आहेत का ? ,करिअरबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यात, मदत करण्यात अशा चाचण्या महत्त्वाची भूमिका बजावतात का ? . ह्याच विषयावर डॉ. श्रीराम गीत ह्यांच्या बरोबरच्या गप्पा ह्या पॉडकास्ट मध्ये आहेत करिअर समुपदेशनाच्या 40 वर्षांहून अधिक काळ त्यांनी काम केलय, व्यवसायाने डॉकटर आणि बदलत्या करिअरच्या लँडस्केपचे ते साक्षीदार आहेत . डॉ. श्रीराम ह्यांनी करिअर संबधी अनेक पुस्तके लिहिली असून ती खूपच मार्गदर्शक आहेत करिअर चाचणी घेऊन पालक विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक अभ्यासक्रम आणि स्पेशलायझेशन निवडण्यास सक्षम करु शकतात करिअरच्या योग्य मार्गांसह त्यांची योग्यता अधोरेखित करण्यासाठी त्या मार्गदर्शन करु शकतात बदलत्या जॉब मार्केट आणि कौशल्याच्या गरजांबद्दल एक सखोल माहिती मिळते निःपक्षपाती निर्णय घेण्यात, सामाजिक आणि कौटुंबिक दबाव कमी करण्यात अशा चाचण्या मदत करतात व्यक्तींच्या क्षमता आणि करिअरच्या संधी यांच्यातील सांगड घालून एकूणच करिअर यश मिळेल. उत्तम पॉडकास्ट ऐकण्यासाठी - https://marathipodcasters.com Are career counseling and aptitude tests relevant? , Do such tests play a significant role in helping make informed career decisions? . On the same subject, a chat with Dr. Shriram Geet is in this podcast Being a doctor by profession and witnessing career change for more than 40 years. Dr. Sriram has written many career related books and they are very guiding Parents can help students choose suitable academic courses and specializations by taking a career test They can guide you in highlighting your aptitude along with suitable career paths Gain an in-depth understanding of the changing job market and skill needs Such tests help make unbiased decisions, reducing social and family pressure The combination of individual abilities and career opportunities determines career success.
10th Last Minute टेंशन घालवायच्या आणि नियोजनाच्या टिप्स  दहावी ची परीक्षा अगदी तोंडावर येऊन ठेपलीये , टेन्शन आलय ? घाबरू नका.    हा पॉडकास्ट पूर्ण ऐका आणि टेन्शन ला बाय बाय करा,.  जेष्ठ समुपदेशक आणि शिक्षणतज्ञ श्री. अनिल गुंजाळ सर ह्यांनी सांगितलाय कानमंत्र  त्यांची ओळख म्हणजे माजी शिक्षणाधिकारी/सहाय्यक आयुक्त,माजी सहाय्यक सचिव, एसएससी बोर्ड, पुणे ,शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य,  पस्तीस वर्षाचा शिक्षण क्षेत्रातला अनुभव  लेखक- श्री.अनिल गुंजाळ, माजी शिक्षणाधिकारी,पुणे यांची प्रकाशित पुस्तके  1.परीक्षा :एक आनंदी अनुभव.  2. माणसपरास  3  रंग मनाचे - कविता संग्रह  स्पंदन समुपदेशन केंद्र, पुणे  SPANDAN COUNCILLING CENTRE, PUNE.   स्पंदन संवाद, स्थळ -  1725 ,सदाशिव पेठ,"समर्थ टेरेस," फ्लॅट क्रमांक -01 स्काऊट गाईड मैदान समोर, उद्यान प्रसाद कार्यालयाजवळ, स्वामी समर्थ मंदिर लेन, पुणे 30. स्पंदन संपर्क -9404235145.   Are you worried about your upcoming tenth grade exam? Don't be afraid; just listen to this podcast till the end and say goodbye to tension. Anil Gunjal, Senior Counselor and Educationist, has described Tips. Mr. Anil Gunjal, a former education officer, has written several books. He is Ex-Education Officer/Assistant Commissioner, Ex-Assistant Secretary, SSC Board, Pune, Maharashtra State Department of School Education, 35 years of experience in the education sector
१० विच्या विद्यार्थाना अवघड वाटणारा विषय म्हणजे गणित / Mathematics , पण जर लक्षपूर्वक पेपर वाचला आणि योग्य पद्धतीने पेपर मध्ये मार्क्स मिळवण्याचा सराव केला तर १०० टक्के मार्क्स मिळवणे अगदीच सोप्पे आहे, जाणून घेऊयात टिप्स डॉ. जयश्री अत्रे यांच्याकडून  डॉ. जयश्री अत्रे ह्या ३० वर्षांचा अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांमधील एक प्रसिद्ध आणि आवडत्या गणित शिक्षिका आहेत. गणित शिक्षण विषयात त्यांनी पीएचडी केली आहे. 1994 पासून त्या बालभारतीच्या गणित विषय समितीच्या सदस्या आहेत. त्या संपूर्ण महाराष्ट्रात गणित शिकवण्याच्या कार्यक्रमासाठी समुपदेशक म्हणूनही काम करतात  How to score 100% in Mathematics paper  Visit our app at https://apps.ikakey.com https://supermindstudy.com/ - To get sample papers 
तुम्ही कधी गड  किल्ले फिरला आहात, रायगडावर फिरताना प्रत्यक्ष रायगडावरच्या बाजारपेठेत व्यवहार कसे चालायचे आणि आता आपल्या बाजारपेठेमध्ये जे व्यवहार चालतात त्यात काही साम्य आहे ? . सचिन तेंडुलकरच्या १०० शतकांमागचा इतिहास तुम्हाला माहितीये का ? भारतामध्ये आज आपण ज्या लोकशाही पद्धतीमध्ये वावरतो ती कुठून आली आणि त्याचे पुढचे टप्पे काय असतील ? युक्रेन रशिया मधील युद्ध तिसऱ्या महायुद्धात कन्व्हर्ट होईल का ? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जर आपण सहावी ते बारावी ची आपण इतिहास आणि नागरिकशास्त्र किंवा राज्यशास्त्र हि पुस्तकं नुसती चालली तरी मिळतील. तरी आपण म्हणतो इतिहास का शिकायचा ? परवा एका मैत्रिणीच्या मुलांनी मला हाच प्रश्न विचारला , आणि मग ठरवलं कि हि इतिहाची पाठपुस्तकं जे लिहितात थेट त्यांनाच हा प्रश्न विचारायचा - इतिहासाचं पाठयपुस्तक उघडलं कि साधार तिसऱ्या चौथ्या पानावर तुम्हाला डॉ. गणेश राऊत हे नाव दिसेल. डॉ गणेश राऊत  डॉ. गणेश राऊत यांनी इतिहास या विषयात पीएचडी प्राप्त केली आहे. त्यांचा अध्यापन क्षेत्रात १७ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे.  त्यांनी इतिहासविषयक ९ संदर्भग्रंथांचं लेखन आणि १६ पुस्तकांचं संपादन केलं आहे. त्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे प्रकाशित ‘दत्तक गावांचा इतिहास’ या पुस्तकाच्या दोन खंडांचं संकलन आणि संपादन केल आहे. महाराष्ट्रात त्यांची इतिहास विषयावर १५००हून अधिक व्याख्यानं झाली आहेत. तसंच, मोडी लिपी, हेरिटेज वॉक, किल्ले दर्शन अशा कार्यक्रमांच्या आखणीमध्ये त्यांचा साकीर्य सहभाग असतो. चला तर मग - हि पाठ्यपुस्तक लिहिण्यात ज्यांचा सहभाग आहे त्यांना थेट विचारुयात का करायचा आम्ही इतिहासाच्या अभ्यास ?
बोर्ड परीक्षा तोंडावर आल्यात, म्हणून ताण अजिबात घेऊ नका. तयारीसाठी कमी वेळ शिल्लक असताना परफेक्ट टेक्निक वापरुन तयारी केली तर पेपर तर सोप्पे जातीलच पण मार्क्स पण खात्रीशीर वाढतील.  अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या तंत्राविषयी प्रसिद्ध अशा टाकळकर सरांचे मार्गदर्शन खास या podcast च्या माध्यमातून. फक्त दहावी, बारावी साठी नाही तर सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन.. नक्की ऐका , आणि शेअर करा   १५ दिसेबर २०२२ रोजी सरांचा फक्त पालकांसाठी एक मोफत सेमिनार पुण्यात होणार आहे, त्यालाही आवर्जून जा.  https://takalkarclasses.com/ Do visit our https://marathipodcasters.com/ for more podcasts  Board exams are around the corner, so don't stress at all. If you prepare using perfect technique when there is less time left for preparation, the papers will not only go easier but marks will also increase for sure. Takalkar sir's guidance about study and exam technique is specially through this podcast. Not only for 10th, 12th but useful guidance for all students.. Be sure to listen and share
तुमची मुलं किंवा तुम्ही स्वतः स्क्रीन ॲडीक्ट झाला आहात का ? स्क्रीन ॲडीक्शन रेड झोन मध्ये आहे का ?  कसं समजायचं कि हे स्क्रीन ॲडीक्शन आहे कि नाही , त्याचे काही दुष्परिणाम आहेत का ?  का आपण स्क्रीन वर येवढे अवलंबून आहोत , काही शास्त्रशुद्ध उपाय आहे का ?  ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधताना गाठ पडली भारती त्रिवेदी ह्यांच्याशी , पहिल्या काही मिनिटातच त्यांनी पालकांच्या भावना समजून घेऊन बोलायला सुरुवात केली. त्यांना पॉडकास्ट वर याल का अशी विचारणा केल्यावर कधी रेकॉर्ड करुयात? असेच विचारले. माझे मराठी उत्तम आहे आणि नक्की ह्या विषयावर गप्पा मारू अशी खात्री त्यांनी दिली. मग काय, अजिबात वेळ न दवडता रेकॉर्डिंग केले आणि आज दहावा एपिसोड रिलीज करतो आहे.  खूप मजा येतीये. श्रोत्यांना ह्या पॉडकास्ट च्या माध्यमातून काहीतरी उपयुक्त माहिती मिळते आहे आणि तसा प्रतिसाद ही मिळत आहे.  अनेक विषय आहेत मनामध्ये... long way to go भारती त्रिवेदी गेली २५ वर्ष एक उत्कट ग्राफोलॉजिस्ट आणि करिअर समुपदेशक म्हणून काम करतायेत, Nurturing Minds ह्या संस्थेच्या त्या संस्थापक आहेत  अनेक विद्यार्थ्यांना, व्यावसायिक आणि गृहिणींना करिअरचे योग्य मार्ग निवडण्यास मदत केली आहे. चाईल्ड कॉन्सलर , सायकॉलॉजिस्ट म्हणून त्या खूप प्रसिदध आहेत, मुलांशी बोलताना त्यांच्या हावभावावरून , त्यांच्या बोलण्यातून आणि निरक्षणातून त्या मुलांची सायकॉलॉजि परफेक्ट समजतात आणि तसा संवाद साधतात  अजून एक खूप महत्वाची ओळख म्हणजे - अतिशय मनापासून एक खूप मोठे सामाजिक कार्य करतायेत , कवच नावाची एक चळवळ त्यांनी उभी केले आहे ज्यामध्ये मुलांना लंगिक शिक्षण देण्याचं काम त्या करतात , विशेषतः मुलींना , महिलांना लैंगिक स्वच्छतेच्या बाल जागरूक करण्याचे काम त्या करतात , अंडर प्रीव्हीलेज्ड महिला आणि मुलींसाठी कवच किट नावाचे एक किट त्या डिस्ट्रीबुट करतात twitter - https://mobile.twitter.com/trivedibharati https://kavachamovement.org/  https://www.facebook.com/bharati.trivedi.10?mibextid=LQQJ4d
जर गणितातील किंवा विद्यानातील सूत्रे, नागरिकशाश्त्रामधील नियम कामाचे लक्षात ठेवण्याची जादुई पद्धत तुम्हाला समजली तर ? मार्क्स मिळवण्यासाठी ह्याचा फायदा तर होईलच , पण मुलभूत संकल्पना कायमच्या पक्क्या होतील. ऐकुया तरी अशी काय युक्ति आहे ? गेली पन्नास वर्षे विद्यार्थ्यांना जे गाण्यातून , कवितेतून आणि नाविन्यपूर्ण संकल्पनामागून शिक्षण देतायेत, मनोरंजनातून शिक्षण आणि त्यातून मूलभूत संकलपनांची पक्की तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेण्याचा ध्यास ज्यांनी घेतला आहे , असे ‘Excellence in Teaching Mathematics' अवॉर्ड विजेते  डॉक्टर प्रदीप आगाशे सर    महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये त्यांनी आजपर्यंत ८ हजारापेक्षा कार्यक्रम करून हि संकप्लना रुजवली आहे, त्यांचे हजारो विद्यार्थी आज अनेक क्षेत्रात अग्रेसर आहेत.  असे शैक्षणिक कवी आणि उत्तम शिक्षक डॉक्टर प्रदीप आगाशे.  Creating interest among students is the primary aim of teaching. Mathphobia is created largely by parents even before their children enter school. If the teachers create an interest in math at an early age using activity-based learning, then mathematics is not only an interesting subject but also one of the simplest”, said Dr Agashe, Math trainer.
इंग्रजी भाषे मध्ये प्रभुत्व कसे मिळवायचे ? बर्‍याच पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी ह्या विषयासंदर्भात एक भीती असते, न्यूनगंड असतो. परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यासाठी काय प्रयत्न करायला हवे हे समजत नाही, मग ही भाषा परकी वाटू लागते आणि मग बोलतानाही अडथळा येतो, संवाद साधायला एका विशिष्ट भाषेची गरज नसली तरी इंग्रजी भाषा म्हणून आत्मसात करायला हवी असेल तर ती कशी करावी हयाविषयीच्या गप्पा , भाषा तज्ञ शीतल करंदीकर बरोबर  Many parents and students have a fear and inferiority complex about English as a subject. They do not understand what efforts should be made to get good marks in the exam. Then we start ignoring the language. Even if you don't need a specific language to communicate, if you want to learn English as a language, how to do it, listen to this podcast with Language Expert Sheetal Karandikar
प्रयोगशील शाळेमध्ये आपल्या पाल्याला घालायचा विचार करताय ? थोडे थांबा हा पॉडकास्ट ऐका मग निर्णय घ्या.  Alternative  School हि संकल्पना नवी नसली तरी त्याचा म्हणावा तसा विस्तार झालेला दिसत नाही. ह्या शाळांमध्ये वेगळं काही शिकवलं जातं ? पहिली ते दहावी पूर्णपणे एका प्रयोगशील शाळेमध्ये आपल्या मुलीला शिकवल्यानंतर तिच्या पालकांचे मत काय आहे ?  चित्रा खरे ह्यांच्याशी मारलेल्या गप्पा  ऐकाकी मग ! What is the process they follow in alternative schools. Is it worth to send your child there for education? Lets here from the parent of one of the such school. 
आज आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित ह्यांच्या बरोबर.  गेली २७ वर्ष त्या मराठी रंगभूमी, चित्रपट, TV  सेरिअल्स मधून आपल्याला भेटत आलेल्या आहेत आणि त्यांच्या सहज अभिनयाने स्वतः:ची अशी एक वेगळी शैली त्यांनी निर्माण केलेली आहे . मराठी भाषा हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा विषय असलेल्या चिन्मयी वाचन संस्कृती जपण्यासाठी खूप काम करतात. पण आज पण कलाकार चिन्मयी बरोबरच पालक चिन्मयी ह्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. चिन्मयी सुमित ह्यांचं शिक्षण क्षेंत्रामध्ये खूप योगदान आहे, मग ते पालक - शिक्षक ह्यांच्या मध्ये एक दुवा साधण्याचे काम असो , मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी पालकांना आवाहन करणे असो , किंवा अगदी शाळेमध्ये जाऊन पालकांना मार्गदर्शन करणे असो.  आज आपण पालक चिन्मयी सुमित ह्यांच्या शी गप्पा मारणार आहोत , बऱ्याच वेळेला पालक अशी तक्रार करतात किंवा असा excuse देतात कि आम्हाला मुलांच्या शिक्षणाकडे बघायला वेळ नाही, किंवा शाळेत काय चालू आहे माहिती नाही, , पालकांच्या बिझी असण्याचा  मुलांच्या शिक्षणावर काय परिणाम होतो ? असं असताना काही पालक मात्र हा बॅलन्स सांभाळताना यशस्वी होताना देखील दिसतात , ह्याच मुद्यावर कला क्षेत्रात व्यग्र असलेल्या चिन्मयी बरोबर आपण आता गप्पा मारुयात    In todays world working parents most of the  times complains that , they are not able to devote time for education of their kids, Do they need to worry ? 
आज केजी ते पीजी मधले सर्व विद्यार्थी अगदी काही नगण्य अपवाद वगळले तर प्रतेय्क जण अभ्यासक्रमातील विषय शिकण्यासाठी ट्युशन , क्लास , कोचिंग . थोडक्यात काय तर शाळा किंवा कॉलेज व्यतिरिक्त  पर्याय निवडताना दिसतात . काही ठिकाणी उघडपणे नसलं तरी कॉलेज फक्त नावाला असतं. अशी काय अपरिहार्यता निर्माण झाली आहे कि अभ्यासक्रमातील विषय शिकण्यासाठी शाळा कॉलेज व्यतिरिक्त इतर पर्याय शोधावे लागतात.  आणि ह्याच विषयावर आपण हार्ड हीटिंग गप्पा मारणार आहोत पुण्यातील विख्यात बेहेरे क्लासेस च्या बेहेरे सरांशी  प्राध्यापक चंद्रशेखर बेहेरे हे  बेहेरेज क्लासेस या पुण्यातील 42 वर्ष जुन्या कॉमर्स प्रशिक्षण संस्थेचे फाउंडर डायरेक्टर, आकड्यामध्ये बोलायचे झाले तर आज पर्यंत एक लाख तासांपेक्षा जास्त शिकविण्याचा त्यांचा अनुभव आहे , 53 हजार विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन  केलय. त्यापैकी 5000 पेक्षा जास्त विद्यार्थी सीए, सी डब्ल्यू ए किंवा सीएस. 15000 पेक्षा जास्त विद्यार्थी एम कॉम किंवा एमबीए झाले आहेत, बेहेरे सरांना राष्ट्रीय शिक्षा सन्मान पुरस्कार, गुरु द्रोणाचार्य अवॉर्ड, मदर तेरेसा मेमोरियल अवॉर्ड असे अनेक सन्मान प्रताप आहेत. असे सन्माननीय ,बहुआयामी बेहेरे सर  
आजचा आपला विषय हा अनेक पालकांच्या आणि शिक्षकांच्या मनातला इंग्रजी माध्यमाची शाळा - मराठी वातावरण - समतोल कसा साधायचा ? इंग्रजी माध्यमाच्या शाळा हा आजकालच्या शैक्षणिक निवनातला अविभाज्य घटक बनला आहे. आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालताना त्याला उत्तम इंग्रजी बोलता यावे हि प्रत्य्येक पालकाची इच्छा असते. ह्यासाठी साठी शाळेमध्ये पूर्णपणे इंग्रजीच बोलले गेले पाहिजे का ? घरात कोणी इंग्रजी बोलणारे नसेल किंवा तसे वातावरण नसेल तर पालकांनी काय करावे? ह्या सगळ्या प्रश्नांवर रमा कुलकर्णी मुख्याध्यापिका, एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे  ह्यांच्याशी साधलेला संवाद. ह्या विषयावर काही मतांतरे असतीलही, पण ह्यावर संवादातूनच मार्ग निघू शकतो हे नक्की. 
आपला पाल्य खेळाडू आहे का ? त्याच्या कडे एखादी कला आहे का? हे ओळखून आपला पाल्य आपण कसा घडवू शकतो. हे मोठे खेळाडू असतात त्यांच्या पालकांची काय विचार प्रक्रिया असते. जाणून घेऊया अशाच एक पालकांकडून.  How they built champions in sports? Lets here from proud parents.  हा एपिसोड स्पॉन्सर केलाय "सुपरमाइंड" ह्या संस्थेनी [https://supermindstudy.com] , जर तुम्ही हे पॉडकास्ट चॅनेल follow आणि लाइक करून त्याचा स्क्रीनशॉट मला ईमेल केलात ikakey.podcast@gmail.com ह्या ईमेल ID वर तर तुम्हाला सुपर माइंड च्या प्रोडक्टस वर 10% सवलत मिळेल. In this very first episode, we will have a fantastic conversation with Prachi Sathe,  an educationalist. Dear students, parents and teachers.. Who is primarily responsible for good marks or good educational progress of the student? So , The subject of the day is . Who is primarily responsible for better marks or good educational progress of the students? Parents, teachers or...?. Let's discuss this with our guest for today and possibly discover a new perspective.
ह्या सत्रातल्या दुसर्‍या पॉडकास्ट चा विषय आहे - पालक आणि शिक्षक ह्यांचे नाते कसे असावे?  हा जो त्रिकोण आहे पालक , शिक्षक आणि विद्यार्थी , तर ह्या मध्ये तुम्ही कसे पाहता हयाकडे  मुळात असे काही असावे का ? म्हणजे नाही बोलेले पालक आणि शिक्षक एकमेकांशी , काय फरक पडतो ?  पूर्वी असे नाते असण्याची गरज होती ?  प्रत्येक शिक्षक हा आदर्श शिक्षकच असला पाहीजे , अशी पालकांची अपेक्षा असते का? आणि असली तर त्या काय चूक आहे ?  विद्यार्थ्यांच्या कोणत्या वयात हे नाते तयार झाले पाहिजे , म्हणजे केजी,प्री प्रायमरी , high school ,  collage  शिक्षक घाबरतात पालकांशी बोलायला  , किंवा टाळतात का ? कसं define करता येईल हे नातं ? friendly , आदरयुक्त , mentor ? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधूयात ह्या भागात. शिक्षणतज्ज्ञ प्राची साठे ह्यांच्या बरोबर गप्पा मारून .. In this second Episode we will have a conversation with Prachi Sathe, an educationalist on Parent teacher relationship हा एपिसोड स्पॉन्सर केलाय "सुपरमाइंड" ह्या संस्थेनी [https://supermindstudy.com] , जर तुम्ही हे पॉडकास्ट चॅनेल follow आणि लाइक करून त्याचा स्क्रीनशॉट मला ईमेल केलात ikakey.podcast@gmail.com ह्या ईमेल ID वर तर तुम्हाला सुपर माइंड च्या प्रोडक्टस वर 10% सवलत मिळेल. Please visit https://apps.ikakey.com - ikakey - Audio Learning app
loading
Comments 
loading