DiscoverUtsav Sanancha, Mel Sanskruti Paramparanchaजेष्ठ महिना, फेडू देणे निसर्गाचे, स्मरण करूया थोर लढवय्यांचे
जेष्ठ महिना, फेडू देणे निसर्गाचे, स्मरण करूया थोर लढवय्यांचे

जेष्ठ महिना, फेडू देणे निसर्गाचे, स्मरण करूया थोर लढवय्यांचे

Update: 2022-06-14
Share

Description

नमस्कार ...!
आम्ही सृजनसख्या Ep log मीडियाच्या संयुक्त विद्यमाने वर नमूद केलेल्या विषयावरील  पाॅडकास्ट खास आपल्या श्रोत्यांसाठी घेऊन आलो आहोत.

"आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण पृथ्वी ग्रहावर राहू शकतो. निसर्ग आपल्याला संदेश देतोय की "स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणे गरजेच आहे" 5 जूनच्या पर्यावरण दिनाच्या वेबसाईटवर लिहीलेले हे वाक्य आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवणं फार गरजेच आहे. अशा पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पना आपल्या हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने सांगितलेल्या आहेत, त्यापैकीच एक सण म्हणजे वटपौर्णिमा ... सर्वात जास्त प्राणवायू देणारा वटवृक्ष.. त्याच्या सानिध्यात करायची पूजा हीच वटपौर्णिमा. याबद्दलही काही खास जाणून घेऊया. त्याचप्रमाणे भारत वर्षाला लाभलेली २ शक्तीची प्रतीके... राणी लक्ष्मीबाई व छत्रपती शिवाजी महाराज. यातील राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी व शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन हेही या ज्येष्ठ महिन्यातच आहेत. त्यानिमित्ताने त्यांचेही पुण्यस्मरण करूया आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या "राजा शिवछत्रपती" या पुस्तकातील शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगाचे अभिवाचन ऐकुया आणि मंत्रमुग्ध होऊया...

या मालिकेद्वारे आपल्या हिंदू सण समारंभाची माहिती आम्ही तुमच्या पर्यंत पोहचवतो. अभिवाचन ,गोष्टी ,विवेचन, लोकगीत गायन, गजर, भजन-कीर्तन या सर्व कला प्रकारांनी ही माहिती रंजक पद्धतीने तुमच्यासमोर सादर करणे हा आमचा मानस. 
आतापर्यंत चैत्र आणि वैशाख महीन्यात आपले पाच podcast रिलीज झाले. ज्येष्ठ महिन्याचा पाॅडकास्ट आम्ही आज म्हणजेच १४ जून या वटपौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. 

 आपल्या हिंदू धर्मात सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सर्व सणांना एक धार्मिक, सामाजिक व वैज्ञानिक बैठक आहे. या सणांच्या निमित्ताने कुटुंबातील तसेच समाजातील एकोपा वाढतो. सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी, सद्भावना या भावना वृद्धिंगत होतात. आजच्या आपल्या धकाधकीच्या, वेगवान आयुष्यात हे सण साजरे करण्याचे स्वरूप बदलले, तरी त्यामागचा उत्साह तेवढाच आहे. अशावेळी आपल्या प्रत्येक सणांची थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी व हे सण साजरे करण्याचा तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा, ह्या हेतूने आम्ही सृजन सख्या, Ep.Log Media यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ही podcast मालिका... उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा..
अंतर्गत भाग- जेष्ठ महिना, फेडू देणे निसर्गाचे,
स्मरण करूया थोर लढवय्यांचे
हा भाग नक्की ऐका, like करा, शेअर करा..

आम्ही सृजन सख्या,  आपल्या संस्कृती आणि परंपरांचा योग्य तो मान राखून, मनोरंजन आणि प्रबोधन होईल असे दर्जेदार  कार्यक्रम प्रेक्षकांसमोर सादर करीत आहे.
विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी निगडित असलेल्या आम्ही सृजन सख्या, सर्व आबालवृद्धांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी आम्ही रसिकांच्या गरजेनुसार अनेक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या सहा वर्षापासून करत आहोत. आपली संस्कृती, आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या प्रकाराने नेण्याचा दृष्टीने हा आमचा एक खारीचा वाटा. मंगळागौर, वाढदिवस, डोहाळेजेवण, बारसे, मुंज, विवाह अशासारख्या अगदी कौटुंबिक कार्यक्रमांपासून ते मोठमोठ्या संस्था आणि सोसायटीच्या स्नेहसंमेलनांपर्यंत सर्व प्रकारचे कार्यक्रम आम्ही सादर करतो. कार्यक्रमामध्ये सर्वसमावेशक खेळ किंवा इतर माध्यमातून प्रेक्षकांनाही कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचा आमचा प्रयत्न असतो. आपल्यासारख्या रसिकांना आमचे हे कार्यक्रम आवडतात, त्यांची दाद आम्हाला नेहमीच मिळते, त्यामुळे अधिकाधिक चांगले काम करत रहाण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

Eplog Media ह्या मिडीया कंपनीद्वारे आजपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांच्या जसे लेखक, कवी, दिग्दर्शक, अ‍ॅक्टर्स, डॉक्टर्स.. खरंतर सगळ्याच कलाक्षेत्रातील प्रथितयश कलाकारांच्या वेगवेगळ्या पाॅडकास्ट मालिका हिंदी, मराठी व इंग्रजी भाषेतून आपल्यासमोर आणल्या आहेत. उत्तमोत्तम साहित्य सर्व लोकांपर्यंत घेऊन येण्याचा प्रामाणिक प्रयत्न Eplog Media गेले पाचसहा वर्ष करत आहेत आणि जगभरात सर्व कानाकोपऱ्यांपर्यंत पोचून त्यांनी सर्व प्रेक्षकांचे दर्जेदार   podcast कार्यक्रमांद्वारे  मनोरंजन केले आहे. 
'उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा' ह्या खास पॉडकास्टच्या निमित्ताने 'सृजन सख्या' व Eplog मीडिया एकत्र येऊन तुमच्यासाठी ही सण-उत्सवांची मालिका घेऊन आले आहेत..चला तर आमच्याबरोबर ह्या सणांच्या वारीत सहभागी व्हा. त्यासाठी Eplog मीडियाच्या वेब पेजवर जा किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट चॅनलला...आमचा हा podcast नक्की ऐका, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा ...

😊 धन्यवाद...🙏

संकल्पना व लेखन - सृजन सख्या... सौ. अपर्णा मोडक, सौ. सरोज करमरकर, डॉ. सौ. स्वाती कर्वे...

You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,

For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media.

If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media

See omnystudio.com/listener for privacy information.

Comments 
In Channel
loading
00:00
00:00
1.0x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

जेष्ठ महिना, फेडू देणे निसर्गाचे, स्मरण करूया थोर लढवय्यांचे

जेष्ठ महिना, फेडू देणे निसर्गाचे, स्मरण करूया थोर लढवय्यांचे

Ep.Log Media