DiscoverNatakwala | Marathi Kavita | Stories | Information |मराठी कविता - गणपत वाणी - बाळ सीताराम मर्ढेकर
मराठी कविता - गणपत वाणी - बाळ सीताराम मर्ढेकर

मराठी कविता - गणपत वाणी - बाळ सीताराम मर्ढेकर

Update: 2020-12-11
Share

Description

मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती

कविता - गणपत वाणी

कवि - बाळ सीताराम मर्ढेकर

अभिवाचक - मंदार कुलकर्णी



गणपत वाणी बिडी पिताना

चावायाचा नुसतीच काडी;

म्हणायचा अन मनाशीच की

या जागेवर बांधिन माडी;


मिचकावुनि मग उजवा डोळा

आणि उडवूनी डावी भिवयी,

भिरकावुनि ती तशीच ध्यायचा

लकेर बेचव जैसा गवयी.


गिऱ्हाईकाची कदर राखणे;

जिरे,धणे अन धान्यें गळित,

खोबरेल अन तेल तिळीचे

विकून बसणे हिशेब कोळित;


स्वप्नांवरती धूर सांडणे

क्वचित बिडीचा वा पणतीचा

मिणमिण जळत्या; आणि लेटणे

वाचित गाथा श्रीतुकयाचा.


गोणपटावर विटकररंगी

सतरंजी अन उशास पोते;

आडोशाला वास तुपाचा;

असे झोपणे माहित होते.


काडे गणपत वाण्याने ज्या

हाडांची ही ऎशी केली

दुकानातल्या जमीनीस ती

सदैव रुतली आणिक रुतली.


काड्या गणपत वाण्याने ज्या

चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,

दुकानांतल्या जमीनीस त्या

सदैव रुतल्या आणिक रुतल्या.


गणपत वाणी बिडी बापडा

पितांपितांना मरुन गेला;

एक मागता डोळे दोन

देव देतसे जन्मांधाला

Comments 
In Channel
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

मराठी कविता - गणपत वाणी - बाळ सीताराम मर्ढेकर

मराठी कविता - गणपत वाणी - बाळ सीताराम मर्ढेकर

Mandar Kulkarni