Discoverमेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)
मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)
Claim Ownership

मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)

Author: Vatvatkaar

Subscribed: 6Played: 35
Share

Description

वेगवेगळ्या विषयांची, वेगवेगळ्या मतांची सरमिसळ आणि दिलखुलास चर्चा.
मराठी पॉडकास्ट | Marathi Podcast

वटवटकार: सागर, पराग आणि रोहित
लोगो: राजेश गोडे

#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
#म #गप्पा #पॉडकास्ट #marathi
32 Episodes
Reverse
वत्सा, तुला काय पाहिजे तो वर माग असं विचारलं तर बिनधास्त "इकिगाई" ची डिमांड करावी. समोर मांडून ठेवलेल्या या आयुष्याच्या पसाऱ्यात समाधान कशात शोधायचं? अशा या क्लिष्ट वाटणाऱ्या प्रश्नाचं जपानी लोकांनी शोधलेलं साधं उत्तर म्हणजे "इकिगाई". आनंदी, निरोगी आणि दीर्घायुषी जीवनासाठी काही सोपे मूलमंत्र जे अनेक गोंधळून टाकणाऱ्या परिस्थितीत वाट दाखवू शकतात. #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message
चहा, कॉफी किंवा त्यापेक्षा अधिक उत्तेजक पेयांबद्दल (आणि तत्सम सवयींबद्दल) केलेला हा खल ! असं करता करता आम्ही चीन, जपान, मकाऊ आणि ध्यान-धारणा वगैरे ठिकाणहून चक्कर मारून परत एक-एक कप च्या प्यायला मूळपदावर परतलो #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message
तुम्ही आत्तापर्यंत काही देशात सुरु असलेला सरकारपुरस्कृत दहशतवाद ऐकला असेल. पण एक असा नमुनेदार देश आहे जो चक्क (डिजिटल) चोऱ्या / डाके / वाटमाऱ्या करण्यात अगदी निष्णात झाला आहे. ऐका त्याची ही डोकं चक्रावून टाकणारी गोष्ट जी पाहता पाहता आपल्या पुणे कोल्हापूरपर्यंत येऊन ठेपली. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message
थोडा आळस, काही महत्तवाची कामं व वाढते व्याप यात जरा व्यस्त झाल्यामुळे दुसऱ्या सत्रानंतर आम्ही जरा थंडावलो, पण थांबलो मुळीच नाही… येत आहोत लवकरच तुमच्या भेटीला तिसऱ्या सत्रात नवनवीन विषय घेऊन --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message
चला तर मग मेतकुटच्या दुसऱ्या सत्राची सांगता करण्याची वेळ आलेली आहे. गेल्या सत्राप्रमाणेच याही सत्रात साथ दिल्याबद्दल सर्वांचे खूप धन्यवाद. यावेळी आमच्याबरोबर आपापल्या क्षेत्रात पारंगत, आपापल्या विषयांवर प्रेम करणारी आमची काही मित्रमंडळी सुद्धा होती. त्यामुळे गप्पांचा आवाका (आणि हो... लांबी सुद्धा) जी वाढली त्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार. या सत्रात नेहमीप्रमाणेच नवे विषय, त्याच्या नव्या बाजू, नवी पुस्तकं हे तर समजलंच पण नवे शब्द, नवे पदार्थ आणि अर्थ नियोजनाच्या क्लुप्त्या सुद्धा सापडल्या. आपण सगळे एकमेकांपेक्षा इतके वेगळे असूनही केवढे एकमेकांना जोडले गेलेलो आहोत, हे प्रकर्षाने जाणवलं.    आणि हाच दुवा मनात ठेवून तुम्हा सर्वांचा निरोप घेतो आहोत. लवकरच तिसरे सत्र घेऊन परत येऊ. तोपर्यंत दुवा में याद रखना. प्रतिक्रिया कळवत राहा. या गप्प्पा तुमच्या मित्र आणि परिवारापर्यंत पोचवत राहा. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message
आता बघा, असं आहे की, सगळी सोगं आणता येतात, पण पैश्याचं सोंग आणता येत नाही. मग कमाई आणि खर्च यांचा ताळमेळ करताना भविष्याच्या गरजांचा विचार पुरेसा होतो का? पैसा साठवणे आणि गुंतवणे यातला फरक काय? घराचा EMI, मुलांचं शिक्षण, मौजमजा यांत म्हातारपणात आर्थिक स्वावलंबन कसं नियोजन असावं? त्यात पुन्हा “महंगाई डायन खाये जात है”. या जंजाळात पद्धतशीर लॅनिंग कसं करावं याबद्दल गप्पा मारायला आर्थिक सल्लागार शैलेश गद्रे आणि ऋजुता बापट-काणे आपल्यासोबत मेतकूट पाॅडकास्टच्या या भागात आलेले आहेत. या भागात आलेले संदर्भ : One Idiot / Rule of 72 / 4% Rule / Harsh Realities / Your Next Five Moves ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter शैलेश, ऋजुता आणि त्यांच्या टीम सोबत संपर्क साधण्यासाठी,  Whatsapp or call +91 99308 47334 | support@gkfsindia.com । GKFS Facebook | GKFS LinkedIn  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 00:00:00 नमस्कार चमत्कार  00:08:35 पॅशन हेच करियर करण्याचं धाडस करण्या आधीची तयारी   00:16:05 आयुष्यातल्या महत्वाच्या टप्प्यांसाठी कसं नियोजन कराल  00:24:18 करियरच्या सुरुवातीलाच पेन्शनचं नियोजन? काहीतरीच काय!  00:30:50 एकीकडे महागाई, आणि दुसरीकडे आपल्या वाढ(व)लेल्या गरजा - Personal Inflation  00:36:20 आर्थिक नियोजनात स्त्रिया पुढे आहेत कि मागे?  00:42:38 बचत आणि गुंतवणूक यातला फरक   00:47:50 लहानपणापासूनच मुलांमध्ये financial literacy कशी रुजवावी?   00:59:22 भविष्यातल्या महागाईचा फटका बसू नये म्हणून नियोजन कसे असावे ?  01:09:32 गुंतवणूक करतांना होणाऱ्या सामान्य चुका  01:13:20  एकाच ठिकाणी सगळे पैसे गुंतवू नका (Portfolio diversification)  01:27:13  Life enjoy करता आलं पाहिजे  01:29:50 Financial goals - emergency fund, short / medium / long term vision  01:32:00  पैसे खर्च करताय कि वाया घालवताय?  01:44:40  सध्या काय वाचताय, पाहताय, लिहिताय?     --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message
देशाची जशी अर्थव्यवस्था असते, तशी आपापली छोटेखानी अर्थव्यवस्था पण असू शकते. कुठं खर्च करायचाय, कुठं नाही, कशासाठी तजवीज करून ठेवायची आहे, आपल्यालावर कोण अवलंबून आहेत, काही अचानक खर्च घडले तर काय? अशा प्रश्नांची एके काळी भीती जरी वाटली असली, तरी थोड्या फार प्रमाणात याचा आभ्यास केला तर याचे फायदे लगेच कळतात. अशाच या Financial literacy बद्दल आज थोडंसं. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message
जमाना बदल गया, लोग बदल गए, नव्या तंत्रज्ञानाबरोबर, नव्या प्रकारच्या चोऱ्यामाऱ्या सुद्धा सुरु झाल्या. पूर्वी घरफोडी व्हायची तशी सध्या क्रिप्टो चोरी होऊ शकते. म्हणजे चोर सुद्धा वर्क फ्रॉम होम करू शकतात. अशाच प्रकारच्या काही नव्या जुन्या फ्रॉड आणि फसवणुकींबद्दलची चर्चा करत करत आज आम्ही ऍमेझॉन कुपन्स पासून ते बँक ऑफ इंग्लंड आणि बिट कॉईन करत करत आपल्या स्वदेश NSE पर्यंत पोचलो.  तुम्हाला या बद्दल काय वाटतं? तुमच्या माहितीत असले काही किस्से असले तर तेही जरूर सांगा. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message
शाळा कॉलेजमध्ये धो धो शिकून पुढे कॉर्पोरेट कल्चर मध्ये घुसल्यानंतर धक्का बसल्यासारखं होतं का? कोणत्या गोष्टी बदलतात? कोणत्या गोष्टी आधीच माहिती असत्या तर बरं झालं असतं असं वाटतं? कधी हा विचार मनात येतो का की आपल्याकडे व्हाट्सऍप, फेसबुक किंवा इतरही नवे शोध का बरं लागले नसतील? नासामध्ये बसून उपग्रह सोडणं महत्त्वाचं की एखाद्या गावात लाईट बल्ब लावणं महत्वाचं अशा स्वरूपाचा प्रश्न पडून तुमचा मोहन भार्गव होतो का? अशाच काही प्रश्नांची उजळणी, आणि काही उत्तरांची नव्याने ओळख असा आजचा भाग घेऊन आम्ही आलेलो आहोत. हे चर्चा सत्र अजून लांबेल असं दिसतंय. तेव्हा पुढचा भाग घेऊन लवकरच परत येऊ. आणि तेव्हा तुमच्यापैकी कोणाला आपलं मत मांडायचं असेल, तुमचा एखादा वेगळा मुद्दा असेल, तर जरूर सांगा. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message
अन्न हे पूर्णब्रह्म, असं ऐकत आपण सगळे मोठे झालो. पण या देवासमान अन्नामध्ये दडलेल्या तेहेतीस कोटी छटा यांची ओळख कधी बरं झाली? भारताबाहेर पडल्यावर, भारतीय जेवण म्हणजे पंजाबी जेवण अशा ओळखींमधून बाहेर येता येता आपण दक्षिण भारतीय जेवणाच्या वळणाला लागून आत्ता कुठं थोडं फार मराठमोळ्या पक्वांनांपर्यंत व्याख्या रुंदावू शकलोय. पण याच्याही पलीकडे आपण जे खातो, जसे खातो, त्याचा इतिहास, त्याचा लहेजा, त्यामागच्या रूढी आणि परंपंरा उलगडून दाखवणारा, त्याची माहिती जाणून घ्यायला उत्सुक करवणारा उपक्रम राबवणारी व्यक्ती म्हणून प्रीती आणि राजेश देव यांची ओळख. त्यांच्या याच उपक्रमाबद्दलची अधिक माहिती, त्यामागची प्रेरणा आणि त्यांना आलेले अनुभव जाणून घेणे हा यंदाच्या एपिसोडचा उद्देश.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter या भागात आलेले संदर्भ:  Two Hands UK / My UK Kitchen  रुचिरा / Julie & Julia / नल पाकदर्पण / भोजनकुतूहलम / सूपशास्त्र / Paat Paani दीन मोहम्मद शेख / आजीबाई बनारसे / वेणूताई चितळे   मनोज वसईकर / पूर्णब्रम्ह (जयंती कठाळे) / Chef's Table Shank's (film) / भारतीय पाककृतींची अन्नयात्रा Ethopian Cuisine in Spitalfields Market / झोमॅटो-स्विगी ची चलती  --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message
आपण 'ऑनलाईन' जगात नेहेमी 'कनेक्टेड' राहतो असं आपल्याला वाटतं. पण आपल्या जवळच्या माणसांच्या वाढदिवसाची आठवण करून देण्यासाठी, "हे पुस्तक/विडिओ/ सिनेमा/गाणे  तुला आवडू शकेल' असं सांगण्यासाठी आणि अगदी घरपोच आणून देण्यासाठी सुद्धा आपण चेहरा नसलेल्या एका मोठ्या तांत्रिक व्यवस्थेवर अवलंबून असतो. त्याचे फायदे आपल्या सगळ्यांना माहिती आहेतच.   पण या गोष्टी ऑफलाईन करणारा एक माणूस याच जगात आणि याच काळात वावरतोय यावर तुमचा विश्वास बसेल?   तुम्ही विचाराल कोण आहे हा माणूस ?आणि मुख्य म्हणजे का करतो हे असं काही?   हा माणूस म्हणजे "ग्रंथ तुमच्या दारी" ही चळवळ उभी करणारे आणि पुस्तकांना लोकांपर्यंत घेऊन जाणारे पुस्तक-वेडे व्यक्तिमत्व विनायक रानडे. मेतकूट च्या आजच्या भागातले पाहुणे.   आता दुसरा प्रश्न - पण का?  "पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचावी" या पेक्षाही मोठे, महत्वाचे आणि मनाला समाधान देणारे काहीतरी आहे हे विनायक रानडे यांच्याशी बोलताना सतत जाणवते. ते काय आहे हे समजण्यासाठी मात्र तुम्हाला एपिसोड ऐकावं लागेल. आणि हो ते काय आहे असे वाटते ते पण आम्हाला जरूर कळवा. बघूया या निमित्ताने आपण 'कनेक्ट' होतोय का?   ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter "ग्रंथ तुमच्या दारी" यासंदर्भात विनायक रानडे यांच्याधी संपर्क साधण्यासाठी +91 9922225777 (फक्त बोलण्यासाठी) +91 9423972394 (फक्त व्हाट्सएपसाठी) (ग्रंथ तुमच्या दारी - लंडन मध्ये) --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे प्रसारमाध्यमं. हा विषय इतका महत्वाचा असला तरी आपण या चौथ्या स्तंभाला किती गंभीरतेने घेतो? आपणच कशाला? पत्रकारितेमध्ये असलेले लोक याला किती गंभीरतेने घेतात? प्रेक्षकवर्गात बसून आपल्याला सर्वाना हे प्रश्न पडत असतीलच. पण खुद्द पत्रकार कोणी असेल तर त्यांचे प्रश्न काय असतील? त्यांचा प्रवास कसा असेल? त्यांना आलेले भलेबुरे अनुभव कुठले असतील?   भरमसाठ चॅनल, वृत्तपत्र आणि ऑनलाईन माध्यमांच्या गर्दीत BBC मराठी या डिजिटल ओन्ली प्लॅटफॉर्मने एक वेगळाच ठसा उमटवलाय. BBC मराठी च्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलणारा त्या वाहिनीचा संपादक आशिष दीक्षित मेतकूट पॉडकास्ट वर गप्पा मारायला आलाय.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter या भागामध्ये आलेले संदर्भ:   १७७२ च्या लंडन गॅझेट मध्ये शिवाजी महाराजांची बातमी केसरी चा पहिला अंक आरण्यक  The Silent Sea  नझल  The Assassination Podcast  Cut the clutter आहे मनोहर तरी  मी अल्बर्ट एलिस:  मुकुल देविचंद यांचं बातम्या देणारं AI  --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message
तुम्ही जगाकडे कोणत्या खिडक्यांमधून पाहता?   काही सेकंदाचे, काही मिनिटांचे व्हायरल होणारे व्हिडीयो, शे-दोनशे अक्षरांतल्या प्रतिक्रिया, सतत माहितीचे विस्कळीत किंवा अनावश्यक असे तुकडे घेऊन घेणार्‍या ब्रेकिंग न्यूज आणि कमी कमी होत चाललेला आपला अटेन्शन स्पॅन... यात क्षणभर थांबून विचार करून, विश्लेषण करून या माहितीच्या तुकड्यांची सांगड घालून आजूबाजूचे जग समजावून घ्यायला जमतय का आपल्याला?   काहीही चटपटीत आणि बथ्थड गोष्टी “व्हायरल” करण्याच्या शर्यतीत भाग न घेता शांत आणि संयत “व्हायटल” (सकस) विश्लेषण करणारे “थिंकबॅंक” हे यूट्यूब वरचे एक दर्जेदार मराठी चॅनल. आजुबाजूस होत असलेल्या राजकिय, सामाजिक आणि आर्थिक स्थित्यांतरे याकडे सापेक्ष नजरेतून बघत आपल्या जगण्याशी थेट भिडणाऱ्या या डिजीटल चॅनलचा संपादक विनायक पाचलग मेतकूट पाॅडकास्ट वर गप्पा मारायला आज आपल्या सोबत आहे.  जाणून घेऊया त्याचा आणि थिंकबॅंकचा आजपर्यंतचा प्रवास.    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~  प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter Think Bank YouTube Channel,  या भागामध्ये आलेले संदर्भ,  1. https://www.goodreads.com/book/show/53452906-ten-lessons-for-a-post-pandemic-world  2. https://www.goodreads.com/book/show/54828853-deep-fakes-and-the-infocalypse 3. https://www.goodreads.com/book/show/55987594-jugalbandi 4. https://www.goodreads.com/book/show/60129018-raoparva 5. Amit Verma’s podcast https://seenunseen.in/ 6. Advertising is dead: https://shows.ivmpodcasts.com/show/advertising-is-dead-RxHPjV6WU3QJURnD 7. Filter Coffee: https://shows.ivmpodcasts.com/show/the-filter-koffee-podcast-REzRDso5YvWdg9XE 8. https://the-ken.com --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message
मातृभाषा हा खूप मजेशीर विषय आहे. शाळा होती तोपर्यंत भीती वाटायची आणि शाळा सोडल्यावर अभिमान वाटू लागला. मग आता "आपली" भाषा टिकावी, वाढावी, समृद्ध व्हावी या हट्टापायी भलेबुरे प्रयत्न आपण करतोच की. हे आत्ताच असं नाही. हे पूर्वापार चालत आलंय. पण भाषेच्या वृद्धीसाठी भाषेवर प्रेम परता आलं पाहिजे हेच खरं. मग ती स्वतःची असो, किंवा दुसऱ्याची. तुम्हाला काय वाटतं? शुद्ध-अशुद्ध भाषा, लिपी, व्याकरण, दुसर्‍या भाषेतून आलेले शब्द, भाषेतून वाहणारी संस्कृती, परंपरा, अस्मिता असा हा सगळा भाषेचा  नुसताच पसारा आहे की भाषेचे सौंदर्य वाढविणारा पिसारा आहे? एक विषय म्हणुन शाळेत शिकण्यात, नंतर भाषा टिकवण्यात आणि त्याच्या राजकारणात भाषेतील गम्मत समजायची राहून जाते का? आजच्या या भागामध्ये आम्ही या सगळ्यांमधल्या गंमतींवर गप्पा मारलेत. वेगवेगळ्या भाषेतील भन्नाट किस्से, आणि त्यातले बारकावे सांगायला आमच्यासोबत आहे अर्निका परांजपे.  अर्निकाची लेटेस्ट आणि आमच्या आवडीची ओळख म्हणजे तिचं "बांधणीच्या कविता" हे युट्युब चॅनेल. तिथे ती मराठी कवितांच्यातलं "मीटर" आणि ताल हे सगळं उलगडून सांगते. तिच्या चॅनेलला भेट दिला नसाल, तर आवर्जून द्या. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter या भागामध्ये आलेले संदर्भ: १. https://timesofindia.indiatimes.com/life-style/spotlight/different-languages-spoken-by-the-british-royal-family/photostory/80214184.cms?picid=80214200  २. रोमन लिपीत लिहिलेल्या बॉलिवूडच्या पटकथा  ३. https://en.wikipedia.org/wiki/Eliezer_Ben-Yehuda ४. हिब्रूचं पुनरुज्जीवन   ५. सफरचंद  ६. माधव ज्युलियन यांची छंदोरचना ७. सुनीता देशपांडेंचे कविता वाचन  भाग १, भाग २ ८. केवढे हे क्रौर्य ९. Why is Manike Mage Hithe so catchy?  १०. Iambic pentameter ११. रुडयार्ड किपलिंगची "If" कविता १२. https://www.theguardian.com/books/2020/sep/10/when-we-cease-to-understand-the-world-by-benjamin-labatut-review-the-dark-side-of-science १३. बहादूर अलास्त याचं युट्युब चॅनल : पोर्तुगीज आणि मराठीतली साम्य / संस्कृत आणि पर्शियन मधील साम्य --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message
भाषेच्या नावानं चांगभलं अनेकांसाठी भाषा हा केवळ शाळेत शिकायचा विषय राहून जातो. पण त्यातल्या अनेक गमती जमाती आणि जगभरात भाषेमुळे झालेल्या उलथापालथी आपल्याला माहीतच नसतात. अशाच भन्नाट गोष्टींविषयी मेतकूट मराठी पॉडकास्ट वर गप्पा मारायला येत आहे Arnika Paranjape, जी भारतीय भाषाच नाही तर इंग्रजी, ग्रीक आणि पर्शियन भाषा सुद्धा अंगाखांद्यावर लीलया खेळवते. पूर्ण एपिसोड लवकरच युट्युब आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट ॲपवर येत आहे. पटकन सब्सक्राईब करा म्हणजे पुढचा भाग मिस नाही होणार (आता हे वाक्य शुद्ध मराठीत म्हणून दाखवा) युट्यूब  किंवा https://anchor.fm/metkoot वर आपल्या आवडत्या पॉडकास्ट ॲपची लिंक सापडेल (spotify, apple podcast, google podcast) --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message
रस्ता लांबचा आहे. पुस्तकी शिक्षणापासून ते कौशल्य आधारित शिक्षणापर्यंतचा आहे. शिक्षणापासून नोकरीपर्यंतचा आहे. कुठे आर्थिक प्रगतीचा आहे तर कुठे जगण्याच्या संघर्षाचा आहे. माहितीचा महापूर किंवा दुष्काळ यापासून योग्य ती माहितीचा असण्याचा आहे. या रस्त्यावर ठेच खाल्लेल्या पण त्यानंतर दुसऱ्यांना शहाणे करून सोडण्याचा संकल्प सोडलेल्या केतनशी आम्ही या भागात गप्पा मारल्या आहेत. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी Friends Union for Energising Lives (F.U.E.L.) ही NGO स्थापन करून भारतातल्याच नव्हे तर परदेशातल्याही लाखो मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आत्मनिर्भर होण्यासाठी विश्वास देणारा असा हा केतन देशपांडे आता कौशल्य आधारित शिक्षणासाठी सुसज्ज असे विद्यापीठ पुण्यात लवकरच सुरु करतोय.  आजूबाजूच्या परिस्थितीला केवळ दोष देण्यापेक्षा आपल्या परीने शिक्षणाला केवळ नोकरी/उद्योगाशीच नाही तर जगण्याशी जोडून घेणारा केतनचा प्रवास, आणि त्याचे विचार नक्की ऐका. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे पण जरूर कळवा. #youth_empowerment #social_entrepreneurship #STEM #शिक्षण #कौशल्य_आधारित_शिक्षण #रोजगार  या भागात आलेले संदर्भ:  केतन देशपांडे Friends Union for Energising Lives Atal Tinkering Labs  वटवटकार: पराग, सागर आणि रोहित प्रतिक्रियेसाठी : Facebook: https://www.facebook.com/MetkootPodcast Instagram: https://www.instagram.com/metkootpodcast/ Twitter: https://twitter.com/metkootPodcast https://www.youtube.com/watch?v=B7ytTj1ALdw #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message
गेल्या तीन महिन्यात आपण दर रविवारी भेटत आलो. २०२१ सोबत आपण मेतकूट पॉडकास्टच्या पहिल्या सत्राची सांगता सुद्धा केली. या प्रवासात आत्तापर्यंत तुम्ही दिलेली साथ, सल्ले, सूचना, आणि महत्वाचं म्हणजे प्रतिक्रिया खूपच आवडल्या. त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप आभार. आता as promised, आम्ही मेतकूट पॉडकास्टचे दुसरे सत्र तुमच्याकडे घेऊन येण्यासाठी सज्ज आहोत. जशी साथ, जे प्रेम तुम्ही गेल्या तीन महिन्यात दिलं, ते वृद्धिंगत होईल ही आशा करतो. लवकरच नवे भाग प्रदर्शित करू. त्यासाठी पॉडकास्टच्या चॅनेलला spotify, apple podcast, google podcast किंवा youtube यापैकी तुम्हाला जे काही आवडत असेल तिथे subscribe करून ठेवा. त्यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत पोचायला मदत होईल. यंदाच्या सत्रामध्ये आमच्या काही मित्र मैत्रिणींना सुद्धा आम्ही आमंत्रित केलेले आहे. त्यांच्या आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम, आणि म्हणून घडलेला त्यांचा दृष्टिकोन तुमच्यापर्यंत आणण्याचा आमचा मानस आहे. यातून ज्या काही गप्पा जमल्या, त्यांची सरमिसळ करून बनलेलं हे मेतकूट. हे लोक कोण आणि त्यांचे विषय कोणते हे लवकरच सांगू. सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा  Twitter: @metkootPodcast / Facebook: @MetkootPodcast / Instagram:  @metkootpodcast #marathipodcast #podcast #म #marathi #मराठीभाषा #metkoot --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message
#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट  मेतकूट च्या पहिल्या सत्राला मिळालेला प्रतिसाद पाहता आम्हांला दुसऱ्या पर्वाची तयारी करण्यासाठी उत्साह संचारला आहे. लवकरच भेटू पुढच्या आठवड्यापासून दर रविवारी एका नवीन भागात, एका नवीन स्वरूपात काही इंटरेस्टिंग पाहुणे मंडळींना सोबत घेऊन.  तुमच्या आवडीच्या पॉडकास्ट माध्यमातून (Spotify, Apple Podcast / Google Podcast / Anchor) सब्सकाइब करा म्हणजे तुम्हाला पुढचे सगळे भाग तुम्हाला पटकन ऐकता येतील.  सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा  Twitter: @metkootPodcast / Facebook: @MetkootPodcast / Instagram:  @metkootpodcast #marathipodcast #podcast #म #marathi #मराठीभाषा #metkoot --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message
तर याप्रकारे मेटकूटच्या पहिल्या आवृत्तीची आज सांगता करत आहोत. त्यासाठी गेल्या दहा आठवड्यांचा हा धावता आढावा. पुढच्या आवृत्तीची तयारी जोरात सुरू आहेच. थोडी पाहुणे मंडळी, थोडं वेगळं ठिकाण, आणि तुमचे नेहमीचेच वटवटकार घेऊन आम्ही काही आठवड्यात परत प्रकट होऊच. पण तोपर्यंत, तुमचं प्रेम असंच देत राहा. आपल्या मित्र मैत्रिणींना या पॉडकास्ट बद्दल सांगा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचावा. आता हे मेतकूट जमू लागलंय. बाकी, नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. आणि सुरक्षित राहा. काळजी घ्या. हे सांगायला नकोच. Please subscribe and share. वटवटकार: पराग, सागर आणि रोहित प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message
इतक्या आठवड्यात इतके विषय बघितले, मग उगाच असा विचार आला, थोडासा लाईट लिया जाये. म्हणून मग या आठवडयात बीना विषय भेटलो, गप्पा मारल्या. जुन्या लहानपणीच्या आठवणी असं घ्यायचं ठरलं होतं, पण त्याच जे काय झालं ते तुम्हाला कळेलच.  वटवटकार: पराग, सागर आणि रोहित प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message
loading
Comments 
Download from Google Play
Download from App Store