S2.E4 - बातम्यांच्या महापुरात ... आशिष दीक्षित बरोबर
Description
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे प्रसारमाध्यमं. हा विषय इतका महत्वाचा असला तरी आपण या चौथ्या स्तंभाला किती गंभीरतेने घेतो? आपणच कशाला? पत्रकारितेमध्ये असलेले लोक याला किती गंभीरतेने घेतात? प्रेक्षकवर्गात बसून आपल्याला सर्वाना हे प्रश्न पडत असतीलच. पण खुद्द पत्रकार कोणी असेल तर त्यांचे प्रश्न काय असतील? त्यांचा प्रवास कसा असेल? त्यांना आलेले भलेबुरे अनुभव कुठले असतील? भरमसाठ चॅनल, वृत्तपत्र आणि ऑनलाईन माध्यमांच्या गर्दीत BBC मराठी या डिजिटल ओन्ली प्लॅटफॉर्मने एक वेगळाच ठसा उमटवलाय. BBC मराठी च्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलणारा त्या वाहिनीचा संपादक आशिष दीक्षित मेतकूट पॉडकास्ट वर गप्पा मारायला आलाय.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter
या भागामध्ये आलेले संदर्भ:
१७७२ च्या लंडन गॅझेट मध्ये शिवाजी महाराजांची बातमी