DiscoverEr Priti Moreस्त्री सूक्त माहात्म्य
स्त्री सूक्त माहात्म्य

स्त्री सूक्त माहात्म्य

Update: 2022-08-05
Share

Description

*।। श्री स्वामी समर्थ ।।*

🪷 *श्रीसूक्त महात्म्य* 🪷

श्रीसूक्त हे ऋग्वेदाच्या परिशिष्टात समाविष्ट आहे. यामध्ये मूळ १५ ऋचा, १ फलश्रुतीची ऋचा आणि शिवाय १ स्वतंत्र फलश्रुती आहे. या स्वतंत्र फलश्रुतीमध्ये ९ ऋचा व १ लक्ष्मी-गायत्री यांचा समावेश आहे.
श्री मध्ये ज्या गोष्टींचा समावेश आहे त्या सर्व गोष्टी मानवाच्या समृद्ध जीवनाला आवश्यक आहेत. आयुष्य भरपूर आहे परंतु निरोगी नाही, निरोगी आहे परंतु पुत्र नाही, धन नाही, वाडवडील लवकर निवर्तले, सत्ता कोठेही नाही असे असले तर माणसाला जिणे नकोसे होईल. श्री मध्ये या गोष्टींचा समावेश आहे.
व्यवहारात लक्ष्मी म्हणजे पैसा, असा अर्थ आहे पण तो श्री या पदाचा मात्र नाही ! श्री या एका पदामध्ये ज्या गुणांचा किंवा वैभवाचा समावेश आहे त्याबद्दल फलश्रुतीमध्ये एक ऋचा समाविष्ट आहे ती पुढील प्रमाणे :-
*श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधात् शोभमानं महीयते ।*
*धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ।।*
या सुक्ताचे ऋषी :- लक्ष्मी, आनंद, कर्दम, चिक्लीत आणि इंदिरासुत असे आहेत.
या सुक्ताची देवता लक्ष्मीनारायण असे मानण्यात येते. श्रीसूक्ताचा उपयोग संसारी आणि पारमार्थिक जीवनात कसा करावा हे माहीत असणे आवश्यक ठरते. हे सूक्त साधकाला पैसा प्रदान करते अशी समजूत असली तरी केवळ पैशाच्या प्राप्तीसाठी या सुक्ताचा पाठ करणे उचित नाही. *प्रापंचिक ऐश्वर्याच्या मागे जी पारमार्थिक समृद्धी दडली आहे त्याचा विचार करणेही योग्य ठरते.*
श्री या पदाच्या विस्तारात ऐश्वर्याची स्वामिनी म्हणून महालक्ष्मी गौरविली जाते. या अंबामाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवतेचे स्थान म्हणजे कोल्हापूर ! भक्तांचे आर्त पूर्ण करण्यासाठी ती त्या ठिकाणी प्रदीर्घकाळ तिष्ठत आहे. सामान्य साधकासमोर मूर्ती असल्याशिवाय उपासना होत नाही. म्हणून प्रारंभिक अवस्थेत मूर्ती समोर ठेवून पूजा - प्रार्थना केली जाते. या सर्व उपासनांचा केंद्रबिंदू महालक्ष्मी, श्रीसूक्त किंवा श्रीयंत्र हे आहेत ! मंत्र, तंत्र आणि यंत्र हे तीन उपासनेचे भाग आहेत.
१५ ऋचांपर्यंत श्रीसूक्ताचा पाठ केला जातो. या पुढील ऋचा फलश्रुती म्हणून गणली जाते. जो कोणी नियमितपणे नित्य श्रीसुक्ताच्या १५ ही ऋचांचा पाठ करील अगर तुपाच्या साहाय्याने मंत्रांच्यायोगे हवन करील त्याला सर्वसंपन्नता प्राप्त होईल.
प्रापंचिक सुविधा लाभावी म्हणून मानवाचा प्रयत्न चालू असतो परंतु यासाठी माणूस जे प्रयत्न करतो त्याचे अधिष्ठान परमेश्वर असते. श्रीसूक्ताची प्रत्येक ऋचा हा एक स्वतंत्र मंत्र आहे. श्रीमद् भागवतगीता, सप्तशती या ग्रंथातील प्रत्येक श्लोक जसा स्वतंत्र मंत्र आहे तसे श्रीसूक्ताच्या १५ ऋचांचे आहे. *मंत्राच्या व्यावहारिक अर्थापेक्षा पारमार्थिक अर्थ आणि त्यापेक्षाही त्या मंत्रातील अक्षरांच्या उच्चारामुळे निर्माण होणारे नादतरंग यांचे परिणाम सूक्ष्म आणि प्रभावी आहेत.*
श्रीसूक्त जसे प्रापंचीक सुविधा प्राप्त करून देते तसेच पारमार्थिक वैभवही देते. पारमार्थिक उपासनेत त्या देवतेची भेट होणे महत्त्वाचे असते. *देवासाठी निर्भेळ उपासना करणारा उपासक क्वचित आढळतो. या उपासनेने प्राप्त होणारे फळ कायम टिकणारे असते. एवढेच नाही तर त्या उपासनेचा फायदा पुढील पिढीलाही मिळतो.* जेथे सौंदर्य, विद्वत्ता, सत्ता, चैतन्य आहे तेथे या देवतेचे वसतीस्थान आहे.
साधकाच्या अंतःकरणातील स्फूर्ती या देवतेचे वसतीस्थान आहे. शूचिर्भूत झाल्यावर या उपासनेला प्रारंभ करावा. त्यात ध्यान महत्त्वाचे ठरते.
देवीची मूर्ती हृदयात निर्माण करून तिची प्रतिष्ठा करावी. श्रीसूक्ताच्या एकेका मंत्राने मनाने तिची पूजा करावी.
*१६ आवर्तने रोज करावी* त्यायोगे मनावर उत्तम प्रकारचे सुसंस्कार घडून सद्गुण अंगी वाढू लागतात. सांसारिक लिप्तता कमी होते. पारमार्थिक बंधता आवडू लागते.
*यामधील महत्त्वाचा अडथळा म्हणजे मी उपासक आहे हा अहंकार निर्माण होणे. तो अधोगतीला नेतो म्हणून याकडे दुर्लक्ष करावे.* सिद्धींचा त्रास होतो त्याकडे दुर्लक्ष करावे. स्वतःच्या वाणीला सामर्थ्य प्राप्त होते. यामध्ये दुसऱ्यासाठी काही करणे चूक ठरते. उदा. ब्राह्मणाकडून जप करून घेणे या व्यवहाराला या उपासनेत स्थान नाही.
चैत्र, अश्विन, पौष या महिन्यांमध्ये देवीची उपासना केली जाते.

*- अक्कलकोट स्वामीदर्शन, दिवाळी अंक २००१ मधून साभार.*


🚩🙏📿 *श्री स्वामी समर्थ* 📿🙏🚩
Comments 
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

स्त्री सूक्त माहात्म्य

स्त्री सूक्त माहात्म्य

Priti More