Discoverजरा चुकीचे जरा बरोबर!
जरा चुकीचे जरा बरोबर!

जरा चुकीचे जरा बरोबर!

Author: shailesh Jawadekar

Subscribed: 0Played: 0
Share

Description

आपलं आयुष्य कधी "जरा चुकीचे" तर कधी "जरा बरोबर" असतं.
मीही आजवर खूप चुका केल्या आहेत आणि आता त्या सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे.

हे पॉडकास्ट म्हणजे , रोजच्या आयुष्यातला ,छोट्या छोट्या गोष्टींमुळे येणारा stress कायमचा संपवून आपलं आयुष्य आनंदी , समाधानी आणि समृद्धं बनवायचा एक प्रामाणिक प्रयत्न.
57 Episodes
Reverse
आपल्या सगळ्यांना माहीत आहे की " Gossip" करणं चुकीच आहे, Healthy नाहीये पण तरीसुद्धा जोपर्यंत आपला चकाट्या पिटण्याचा स्वभाव आहे .... तोपर्यंत "Gossip" रहाणार आहे. पण आपल्या Healthy Mental Health साठी आपण गोस्सिप टाळलच पाहिजे आणि ते शक्य आहे, हे तुम्हाला हा एपिसोड ऐकल्यावर पटेलच.
आपल्या डोक्यात सतत काहीतरी विचार चालू असतात. हे, झालं तर, काय होईल? ते, झालं तर काय होईल? मी तेव्हा असं करायला नको होतं ! माझी चुकच झाली .... हे Overthinking आपल्याला इतकं Busy ठेवतं की प्रत्यक्ष आपल्या हातून काही कृतीच होत नाही . हा एपिसोड तुम्हाला Overthinking तुम्ही कसं थांबवू शकता किंवा पुष्कळ प्रमाणात control कसं करू शकता ... हे तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न आहे आणि ह्यासाठी मी आधार घेतला आहे Stoicism मध्ये सांगितलेल्या नियमांचा .
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण कधी न कधी तरी " नाकारले जातो", Reject होतो. Rejection मुळे खचून न जाता त्याकडे एक संधी म्हणून आपण पाहिले तर ? ते Rejection आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतं.... आपलं आयुष्य एक वेगळ्याच वळणावर जाऊ शकतं हा एपिसोड ऐका म्हणजे मी काय म्हणतोय.... ते नेमकं कळेल तुम्हाला !
10 Actionable Measures To Control Anger I रागावर कसा Control मिळवाल ! #marathipodcast राग ही फार महत्त्वाची आणि मूळ भावना आहे. रागापासून कुणाचीही सुटका नाही . आपल्याला रागाशी रोज Deal करावं लागतं. खरतर राग Control करावा लागतो नाहीतर जगणं मुश्किल होऊन जाईल. Stoicism..... म्हणजे रोजच्या जगण्यातला शहाणपणा आणि ह्या शहाणपणात Seneca ह्या जगट्विख्यात Stoic Philosopher ने रागावर कंट्रोल मिळवण्यासाठी "अमलात आणता येण्यासारखे " असे 10 नियम सांगितले आहेत हयापैकी बरेचसे नियम मी अमलात आणू शकलो, राग कंट्रोल करू शकलो ..... तुम्हीही ते करू शकाल..... मला 100% खात्री आहे.
आज Parenting..... हा सर्वात Challenging Job आहे आणि आई-वडिलांचा Performance हा आपल्या मुलांना Direct Impact करणार आहे. आज मुलांची बोलायची गरज चॅटिंग मूळे संपत चाललीय का ?........ हे आई-वडीलांनाही कळत नाहीये, कारण मुलांचं त्यांच्याबरोबर बोलणच हळू हळू बंद होत चाललय मुलं बोलली नाहीत तर त्यांची भाषा Develope होणार नाही , त्यांना बाहेरच्या जगाशी संवाद साधता येणार नाही आणि हे होणं प्रचंड धोकादायक आहे. आज मुलांना बोलतं करणं हे खूपच महत्त्वाचं झालं आहे.
Stop seeking External Validation I लोकांनी "चांगलं" म्हणावं हा हट्टं बंद करा ! #marathipodcast आपण आपल्याला आनंदी, समाधानी ठेवू शकतो .......ह्यावर आपला विश्वास उडायला लागलाय आणि त्याचं मुख्य कारण आहे .... Social Media ला आपल्या आयुष्यात दिलं गेलेलं अवाजवी महत्त्व. हा एपिसोड तुम्हाला आत्मविश्वास मिळवून देईल की तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी पुरेसे आहात. FOLLOW - https://www.instagram.com/jarachukiche_jarabarobar FOLLOW - https://www.facebook.com/profile.php?id=61556797551989 FOLLOW - https://podcasters.spotify.com/pod/show/shailesh-jawadekar5
10 simple strategies to deal with Anxiety II रोजची अस्वस्थता कमी कशी करता येईल ? #marathipodcast Anxiety आपल्याला खूप disturb करत असते , पण तिच्याकडे डोळसपणे पाहिलं तर तिच्याशी नक्कीच Deal करता येईल, आणि ते फारसं अवघडही नाहीये... पूर्ण एपिसोड ऐका ...... आणि तुमचं तुम्हीच ठरवा ! #depression #fear #anxiety
IQ is " Intelligence Quotient" & EQ is "Emotional Quotient (Intelligence) जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर फक्त IQ वर भर देऊन चालणार नाही, तर त्याला EQ ची जोड ही द्यावीच लागेल. हा एपिसोड तुम्हाला EQ चं महत्त्व नक्कीच पटवून द्यायला आणि EQ कसा वाढवायचा हे समजून घ्यायलाही मदत करेल. Subscribe: youtube.com/@jarachukiche (Link is in Bio) FOLLOW - https://www.instagram.com/jarachukiche_jarabarobar (Link is in Bio) FOLLOW - https://www.facebook.com/profile.php?id=61556797551989 (Link is in Bio)
मोकळेपणे शेवटी कधी हसला होतात? आठवतंय का ? आपण हसणं विसरत चाललोय असं मला वाटतय. Actually...खोटं हसणंसुद्धा फायद्याचं आहे. हा एपिसोड ऐकल्यावर तुम्हालाही पटेल. #smile #smiley #smilemore FOLLOW - https://www.instagram.com/jarachukiche_jarabarobar FOLLOW - https://www.facebook.com/profile.php?id=61556797551989 मराठी पॉडकास्ट - जरा चुकीचे जरा बरोबर हा YouTube Channel Like, Share, Subscribe करा #jarachukiche
"एकटेपणा" घालवण्यावर ईलाज काय ? II How To Beat Loneliness ? Personal Stories #marathipodcast #loneliness #lonely Are you feeling Lonely? Have you ever experienced the feeling of Loneliness? Stress खालोखाल "एकटेपणा" हा सर्वात भयंकर आजार समजला जातो आणि तो प्रचंड वेगाने जगभरात पसरतो आहे. त्यावर आपण ईलाज शोधलाच पाहिजे. मला खात्री आहे की हा एपिसोड तुमचा "एकटेपणा", Feeling of Lonelyness, नक्की घालवेल FOLLOW - https://www.instagram.com/jarachukiche_jarabarobar FOLLOW - https://www.facebook.com/profile.php?id=61556797551989 Follow - youtube.com/@jarachukiche
हा सवयीतला शेवटचा टप्पा. सवय सहज, आकर्षक, सोप्पी आणि समाधान देणारी असेल तरच ती लागू शकते. इथे Habit Loop पूर्ण होतो. हा एपिसोड पहा YouTube वर चॅनल नाव आहे : मराठी पॉडकास्ट जर चुकीचे जरा बरोबर youtube.com/@jarachukiche
सवयी खरोखरच आयुष्य बदलू शकतात हे मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. आयुष्यातले छोटे छोटे बदल, तुम्हाला प्रचंड यशस्वी बनवू शकतात. हे बदल करणं सोप्पं आहे. हा एपिसोड ऐकून ते बदल तुम्ही करा ......... सवयींना सोप्पं बनवा.
कालच मध्यरात्री आपल्या यूट्यूब चॅनल वर 1100 Subscribers झाले आहेत. तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या ह्या Support बद्दल अगदी मंनापासून धन्यवाद. असाच पाठिंबा देत रहा.........
सवयींना Attractive बनवूया .... हे तुम्हाला वाचायला एखाद वेळेस विचित्र वाटेल पण ते फार गरजेचं आहे कारण चांगल्या सवयी आपलं आयुष्य बदलू शकतात . अशा सवयी लागण्यासाठी, त्यांना Attractive बनवावाच लागेल. हा एपिसोड ते तुम्हाला पटवून देईल ...... माझी खात्री आहे Subscribe - https://youtube.com/@jarachukiche मराठी पॉडकास्ट - जरा चुकीचे जरा बरोबर https://www.instagram.com/jarachukiche_jarabarobar
सवयी आपल आयुष्य बदलू शकतात , कसं ते पाहाण्यासाठी आम्ही Atomic Habits ह्या पुस्तकाचा Review - 4 भागात करतोय. हा पहिला भाग आहे. Subscribe our YouTube Channel - https://youtube.com/@jarachukiche https://www.instagram.com/jarachukiche_jarabarobar
यशस्वी माणसं आयुष्यात फार लवकर "नाही" म्हणण्याचं महत्व ओळखतात. आपल्याला आयुष्यात प्रगति कराची असेल तर "नाही" म्हणणं शिकावच लागेल. "नाही" का?......... आणि कसं ?.............म्हणायचं हे ऐका ह्या एपिसोड मध्ये आणि मला comments सांगा , तुम्ही कुठल्या गोष्टीला नाही म्हणालात हा एपिसोड ऐकल्यावर आणि त्याचा तुम्हाला कसं फायदा झाला ? आता हे पॉडकास्ट YouTube आहे. चॅनल च नाव - मराठी पॉडकास्ट जरा चुकीचे जरा बरोबर link - youtube.com/@jarachukiche
आपलं रोजचं जगणं सोप करायचा हा एक प्रयत्न आहे. माझे विचार आणि माझं वागणं ह्या 3 philosophies वर Based आहे. तुम्हाला काय वाटतं ? मला नक्की कॉमेंट्स मध्ये कळवा.
आयर्नमॅन, ही फक्त एक स्पर्धा नाही आहे. ती एक स्वतःची स्वतःला ओळख करून देण्याची प्रक्रिया आहे. बहुतेक वेळा आपल्याला आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता, किती आहे हेच माहीत नसतं आणि म्हणूनच ह्या स्पर्धा आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतात. एक अनन्यसाधारण आत्मविश्वास मिळवून देतात.
माणसाचा सर्वात प्रेमळ मित्र कसा आहे आणि त्याचं अद्भुत जग कसं आहे, हे ऐकूया, राष्ट्रीय पातळीचे प्रशिक्षक Shailesh Omkar ह्यांच्याकडून.
हे एपिसोड्स ऐकल्यावर तुमच्या वाईट किंवा तुम्हाला बदलायला अवघड वाटण्याऱ्या सवयी तुम्ही नक्कीच बदलू शकाल आणि आयुष्यात यशस्वी होऊ शकाल.
loading
Comments