# 1880: कुबेरकाठी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Update: 2025-10-25
Description
एकदा असंच कुठंसं वाचलं नी सरकारांच्या डोक्यात नर्मदा परिक्रमा करायचं खुळ घुसलं, अहो ही कथा आहे सत्तरऐंशी वर्षापूर्वीची, तेव्हा ना गाड्या ना बस अशा वेळी नर्मदा परिक्रमा करायची म्हणजे खुळच नव्हे तर काय. पण ‘आलं सरकारांच्या मना तिथं देवाचंबी चालंना‘ अशातली गत होती.
मग काय एकदा मनात आलं आणि महिनाभरात सरकारांनी प्रस्थान केलं. पार अगदी मुंडन वगैरे करुन, यथासांग अकरा महिन्यात त्यांनी परिक्रमा पूर्ण करुन गावी आले देखील…छान पारणं करायचं ठरवलं. गावाच्या शेजारच्या परिसरातील ब्राह्मणांना भोजन द्यावं असं सरकारांच्या मनी आलं…., विष्णुशास्त्री अभ्यंकरांना बोलावणं धाडलं गेलं.
Comments
In Channel



