# 1881: मुलांचे संगोपन करण्याची जपानी पध्दत. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Description
प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला एक चांगली व्यक्ती बनवायचे असते, जेणेकरून तो भविष्यात एक चांगला माणूस म्हणून घडू शकेल. जर आपण चांगल्या पालकत्वाबद्दल विचार केला, तर यामध्ये मुलाला चांगले संस्कार देणे, त्याच्या पोषणाची काळजी घेणे, मुलाच्या शारीरिक आणि मानसिक समस्या समजून घेणे इत्यादींचा समावेश होतो. मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी आपण जपानी पालकांकडून काही टिप्स घेऊ शकतो.
उत्तम पालक बनणं हे खूप कठीण काम आहे. यात बरेच चढ-उतार येतात. जपानी मुले, कोणत्याही वयाची असो, त्यांची जगण्याची स्वतःची एक विशिष्ट पद्धत असते जी त्यांना जगावेगळे व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध करते. खरं तर, जपानी मुल सार्वजनिक ठिकाणी रडताना दिसणं जवळजवळ दुर्मिळ आहे! कारण जपानी पालक मुलांच्या संगोपनासाठी खूप वेळ देतात. आपल्या मुलाला एक चांगला नागरीक बनवण्यासाठी त्यावर संस्कार करतात. म्हणून जपानी पालकत्वाची पद्धत जगभर प्रसिद्ध आहे. आज आपण मुलांचे योग्य प्रकारे संगोपन करण्यासाठी काही जपानी टिप्स पहाणार आहोत.



