Life of Stories

<p>Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.</p>

#1629 : हिंदी महासागरात आहे "ग्रॅविटी होल". ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Send us a text अभ्यासात असे आढळून आले आहे की त्याच्या निर्मितीमागील टेथिस समुद्र हे आता नामशेष झाले आहे. टेथिस समुद्राच्या मृत्यूनंतर हिंद महासागराचे रहस्यमय गुरुत्वाकर्षण छिद्र तयार झाल्याचे शास्त्रशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. टेथिस समुद्र एकेकाळी पृथ्वीच्या कवचाचा भाग होता, परंतु 180 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवरील गोंडवाना या प्रदेशाच्या विघटनादरम्यान तो युरेशियन प्लेटच्या खाली गाडला गेला होता. अशाप्रकारे पृथ्वीच्या कवचाचे तुकडे या आवरणाखाली बुडाले. गोंडवाना हा एक प्राचीन महाखंड होता, जो १८० ...

12-03
07:26

#1628 : कालभैरवाची कथा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Send us a text एकदा स्वर्गलोकांत ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांचे आपापसात श्रेष्ठ कोण यावरून कडाक्याचे भांडण जुंपले. तत्पूर्वी ब्रह्मदेवाला पाच शिरे होती. या दोघांच्या वादावर शंकरांनी तोडगा काढावा आणि निर्णय घ्यावा, तसेच दोन्ही देवांत ब्रह्मरूप कोणाचे हाही वाद उद्भवला. तेव्हा देवऋषी नारदांनी दोन्ही देवांना बदरीकाश्रमांत जाऊन तेथील महामुनींची भेट घेऊन या शंकेचे निरसन व्हावे यासाठी पाठविले. परंतु शिव हेच ब्रह्मस्वरूप आहेत, असे महामुनींनी सांगितलेले दोन्ही देवांना पटले नाही, मग पुन्हा ते ‘चार वेद...

11-28
11:19

#1627 : आभाळाचं ह्रदय असलेला उद्योजक. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Send us a text आम्ही सर्व उद्योजक आहोत. आम्ही अशी अनेक मशीन्स बघितली आहेत. तेथे गेलो होतो ,त्याला कारण म्हणजे त्या कारखान्याचे वेगळेपण पाहायचे होते. कारण तेथे एकंदर सव्वादोनशे कामगारांपैकी जवळजवळ पासष्ट कामगार गतिमंद होते. त्यांतील काही तर मतिमंद म्हणता येतील असे होते आणि तेच सुभाष चुत्तर यांच्या कारखान्याचे वैशिष्ट्य होते. व्यवस्थापकांनी आम्हाला असेम्ब्ली सेक्शन दाखवला. तेथे ‘फोर्स’ मोटरच्या गाड्यांच्या दरवाज्यांसाठी हिंजेस (बिजागरी) असेम्बल केली जात होती. तेथे तर सर्वच कामगार मतिमंद होते, इ...

11-25
11:07

#1626 : अमेरिकेतील आव्हानात्मक पहिला प्रवास. अंजली भडसावळे यांची मुलाखत. ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Send us a text लग्नानंतर आठ महिन्यांनी अंजलीचा भारतातून अमेरिकेमधे झालेला प्रवास खूप अडथळ्यांचा होता. 21 तासात पूर्ण होणाऱ्या प्रवासासाठी तिला तीन दिवस लागले. ह्या प्रवासात तिला माणुसकीचे अनोखे दर्शन घडले. ऐकूया तिच्या शब्दात तिचा तो 41 वर्षापूर्वीचा परंतु अजूनही ताजा असलेला अनुभव.

11-25
13:06

#1625 : उजवा की डावा हात? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Send us a text तुम्ही तुमचा सकाळचा कॉफीचा मग कसा उचलता, डाव्या हाताने की उजव्या? आपण अगदी यांत्रिकपणे करतो ही क्रिया.. पण तरीही, कोणी न कोणी हे ठरवत असेलच ना..? मग कोण बरं ठरवतं हे? आजकाल कसं, सगळं अगदी जेनेटिक लेव्हल पर्यंत पाहिलं आणि तपासलं जातं. मग तुमचे जीन्स किती प्रमाणात हे सगळं म्हणजे, डावखुरेपण वगैरे ठरवतात याचा विचारही होऊच शकतो.

11-19
06:42

#1624 : कालबाह्यतेचा सापळा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Send us a text आपल्या लहानपणी पेनमधील शाई संपली की नवी रिफील घ्यायची प्रथा होती. आता तो पेन कचऱ्यात फेकून नवा पेन घ्यायची प्रथा रुजली आहे. आज ही मी जेव्हा पेन च्या रिफिलचा शोध घेत फिरतो तर बहूतांश पेनच्या रिफीलच मिळत नाहीत. कारण तेच. मग दुप्पट किंमतीला विकले जाणारे नवे पेन कोण विकत घेईल ? या "नियोजित अप्रचलन" नावाच्या विकृत व्यापार फंड्यामूळेच.. ‘वापरा आणि फेका’ ... नावाचा 'भस्मासुर' जन्माला आला.

11-17
10:02

#1623: गिरनार परिक्रमा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Send us a text भवनाथ म्हणजे तलेटी, येथील दुधेश्वर शिवमंदिरापासून प्रदक्षिणेला सुरूवात करतात. गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेऊन त्याला प्रदक्षिणा घालणे यालाच परिक्रमा करणे असे म्हणतात. पुरातन काळापासून सदर परिक्रमा चालू आहे गिरनारच्या भोवतीने पूर्ण जंगल आहे. जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे. वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही; फक्त या परिक्रमेच्या कालावधीत ५ दिवस सर्वांसाठी प्रवेश मिळतो. या जंगलात मुंगी, विंचू या पासून अगदी सिंहा पर्यंत भरपूर प्राणी आहेत, पण या ५ दिवसात हे ...

11-16
07:11

# 1622: म्हणून पृथ्वीच्या फिरण्याचा वेग झाला कमी? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Send us a text जेव्हा थ्री गॉर्जेस धरण बांधले गेले तेव्हा यांग्त्झी नदीचे 42 बिलियन टन पाणी त्या धरणाच्या मागे समुद्रसपाटीपासून 175 मीटरपर्यंत अडवले गेले. यामुळे पृथ्वीचा जडत्वाचा क्षण थोडासा बदलला, ज्यामुळे पृथ्वीचं रोटेशन अधिक हळू होतंय. पृथ्वीचे परिभ्रमण कमी झाल्यामुळे, एका दिवसाची वेळ 0.06 मायक्रोसेकंदने वाढली आहे. म्हणजेच दिवस आता काही क्षणांनी मोठा झाला आहे. थ्री गॅार्ज डॅमच्या बांधकामामुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुव देखील आपापल्या ठिकाणाहून प्रत्येकी 2 सेंटीमीटर सरकले आहेत असेही म्हट...

11-12
07:05

# 1914: काळजी करू नकोस बेटा, सॅम आमचा आहे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Send us a text तितक्यात मी एक विलक्षण दृश्य बघितले. एक सहा फुट उंच, रुबाबदार अशी व्यक्ती तिथे आली, पटकन जमिनीवर खाली एक गुडघा टेकवून बसली, सॅमचा हात आपल्या दोन्ही हातांनी प्रेमाने धरून त्यांनी तो हात स्वतःच्या डोक्याला आणि ओठाना लावला, अतिशय मृदू आवाजात नम्रपणे ती व्यक्ती सॅम सरांबरोबर बोलत होती. खाली जमिनीवर अगदी सॅम सरांच्या पायाशी बसून त्यांचा संवाद चालू होता.

12-11
08:37

# 1913: सुगरण पक्षिणी नव्हे तर पक्षी बांधतो घरटे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Send us a text ‘अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला’ ही बहिणाबाई चौधरी यांची कविता आपण सर्वांनी ऐकलेली आहे. परंतु, वास्तवात मादी नव्हे तर नर सुगरण पक्षी काडी-काडी जमा करून खोपा विणतो आणि मादीला आकर्षित करतो. त्याच झाडाच्या वेगवेगळ्या फांद्यांना किंवा झाडांना तो किमान दोन तर कमाल आठ ते दहा घरटी बांधतो.

12-10
04:50

# 1911: "मी आहे कौरव नंबर 101" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Send us a text भगवंत म्हणले, "पाप काय आहे हे दुर्योधनच काय, तूही जाणतोस. तुला माहीत आहे ‘हे हेल्दी नाही’ तरीसुद्धा तू जेवण निवडताना तळण, चीज, ब्रेड, पिझ्झा, बर्गर असं जिभेला आवडणारं तेच निवडतोस." "तुला रात्री झोपायची वेळ कळते. सकाळी उठायचं महत्वही कळतं. पण तरीही रात्र–रात्र जागून सिनेमे, सीरियल्स, रील्स पाहत बसतोस." "दुर्योधनाने माझं सांगणं ऐकलं…पण आपल्यात बदल करायचा नाकारला." "तुझे तरी वेगळे कुठय? आई, बाबा, आपले मन यांचे ऐकलेस कधी?......" ================

12-08
06:00

# 1912: "एकमेव प्रवासी" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Send us a text या स्टेशनचा एकमेव नियमित प्रवासी होती हायस्कूलमध्ये शिकणारी काना हराडा. तिच्या शिक्षणासाठी प्रवासाचा हा एकमेव मार्ग होता. स्टेशन बंद झालं असतं, तर तिची शाळाच बंद पडली असती. हे लक्षात येताच जपानी रेल्वेने आपला स्टेशन बंद करण्याचा निर्णय ३ वर्षे थांबवला....

12-08
04:11

# 1910: जोनास सॅाल्क: पोलिओ लस संशोधक. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Send us a text हजारो वर्षे पोलियो सक्रिय परंतु स्थिर अवस्थेत अस्तित्वात होता. १८८० नंतर पोलियोच्या साथींचे युरोपामध्ये मोठे उद्रेक होऊ लागले आणि नंतर लगेचच अमेरिकेत पोलियोच्या साथीचा प्रसार झाला. १९१० पर्यंत जगात पोलियोचा खूपच प्रसार झाला होता, आणि त्याच्या साथींचा उद्रेक ही अगदी नेहेमीची घटना होऊ लागली. या साथींमुळे हजारो मुले आणि प्रौढ व्यक्ती अपंग झाल्या, व यामुळे पोलियोवर उपायकारक लस शोधण्यासाठी 'महाशर्यत' सुरू होण्यास जोर मिळाला.

12-06
05:51

# 1909: स्पर्श. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Send us a text नॅन्सी त्या बाळाजवळ गेली. तिने तिचा चेहरा बाळाच्या अगदी शेजारी आणला आणि ती बाळाशी बोलू लागली. "कसं आहे आमचे बाळ? तू किती सुंदर आहेस हे तुला माहिती आहे का? किती गोड आहेस तू" असे बोलत नॅन्सीने त्या अत्यंत आजारी बाळाला हळुवारपणे उचलून घेतले. त्याला जवळ घेऊन ती थोडावेळ बसून राहिली. तिने गाणे गुणगुणत त्याला दुधाच्या बाटलीने दूध पाजले. परत त्याच्याशी गोड आवाजात बरच काही बोलली. बाळाला झोपवून तिने त्याला अलगद पाळण्यात ठेवले. हे तिने एकदाच नाही पण त्या रात्री अनेकवेळा केले. जणू का...

12-05
04:55

# 1908: Safety pin. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Send us a text वॉल्टर हंट एका मित्राचा १५ डॉलर्सचा कर्जदार होता. कर्ज फेडायचं होतं पण हाताशी पैसे नव्हतेच मुळी . हंटच्या हातात होती ८ इंच लांबीची पितळी तार. त्याने ती तार बोटांनी वाकवायला सुरुवात केली. वळणावर वळण, एका टोकाला स्प्रिंगसारखी रचना, आणि दुसऱ्या टोकाला टोकदार सुई झाकणारी सुरक्षित कवच. आणि मग काही वेळातच……त्या विलक्षण क्षणी . सेफ्टी पिनचा जन्म झाला.

12-04
05:12

# 1907: "गुरुदक्षिणा" डॉ. सुरेश कोठारी यांची मुलाखत. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Send us a text “तुझ्या गणिताच्या शिकवणीची फी फक्त एक पैसा. पण मला गुरुदक्षिणा द्यावी लागेल. तू बोर्डाच्या दोन्ही गणिताच्या पेपरमध्ये प्रथम येऊन दाखव.” बर्वे सर ठामपणे म्हणाले. श्रीरंग गुणे सरांनी सुरेशचं इंग्रजी घडवलं. त्याच्यात दडलेलं तेज त्यांनी ओळखलं आणि त्याला सामान्यपणात अडकू दिलं नाही. सतत पुढची दिशा दाखवत, त्याला मोठं होण्यासाठी प्रवृत्त करत राहिले. या दोन्ही गुरुवर्यांचा मान राखत सुरेश बोर्डाच्या परीक्षेत अडतिसावा आला. पुढे अमेरिकेत गेला आणि डॉक्टरेट मिळवली. आज तो आवर्जून सांगतो...

12-03
07:56

# 1906: "काल आणि उद्याचा संगम असणाऱ्या बेटांची गुढ कहाणी" लेखक: संतोष कारखानीस. कथन: (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Send us a text बेरिंग सामुद्रधुनीत दोन छोटी बेटं आहेत – लिटल डायोमीड आणि बिग डायोमीड. या दोन्ही बेटांमधील अंतर फक्त साडेतीन किलोमीटरचं… पण वेळेचं अंतर तब्बल 21 तासांचं आहे! हिवाळ्यात जेव्हा समुद्र गोठतो, तेव्हा हे दोन बेटं बर्फाच्या पुलानं जोडली जातात. काही धाडसी लोक चालत एक बेटावरून दुसऱ्या बेटावर जातात – म्हणजे आज मधून उद्यात किंवा उद्यातून आज मधे ! एका बेटावर दिवस संपत असतो, तर समोरच्या बेटावर तोच क्षण पुढच्या दिवसाचा असतो.

12-02
07:08

# 1905: "कारल्याची भाजी आणि...हरवलेलं त्रिकूट" लेखिका : सौ विदुला जोगळेकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Send us a text बाबांनी मला दिलेल्या शिक्षेची ना आईने दखल घेतली ना आजीने. चुक ही चुकच असते...ती आड अंगाने,सुचवायची गोष्ट नसते,ही पालकत्वाची जबाबदारी आमच्या पिढीपर्यंत शिक्षेच्या माध्यमातून अमलात येत होती. वाचनाचे वेड जसं वाढत गेलं,तसं आईने दोन तीन लेखकांची पुस्तके वाचायची नाहीत... असं एकदाच बजावलं होतं.आजही लायब्ररीचे भांडार समोर उभे असुन,वयाचे सारे निर्बंध संपलेले असुनदेखील,कुतूहल म्हणुनही ...काही पुस्तके हातात घ्यावीशी वाटत नाहीत. जिम ट्रेनर, डाएटीशन, आणि काँन्सिलर हे त्रिकुट कुटुंब संस्...

12-01
07:16

# 1904: वंदेमातरम् ची १५० वर्षे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Send us a text या वर्षी आपण वंदेमातरम या गीताची १५०वर्ष पूर्ती साजरी करत आहोत. सात नोव्हेंबर या दिवशी १८७५ साली बँकिंचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम ही सहा दिव्य श्लोक किंवा कडवी असलेली स्वर्गीय रचना केली. जगाच्या पाठीवर एव्हढी उदात्त रचना झाली नाहीये आणि होणार ही नाही.... कारण मातृभूमी बद्दल एव्हढी उदात्त संकल्पना ही याच भूमीचं, याच संस्कृतीचं देणं आहे.... या भूमीला केवळ माताच नव्हे तर देवीचे स्थान देणारी आपली संस्कृती.... आणि पारतंत्र्याच्या काळात सर्व समाजाला जागृत करणारं हे महाकाव्य याच उद...

11-30
06:21

# 1903: प्रार्थना. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Send us a text बालपणापासून आपल्याला ‘जीवनातील प्रार्थनेचं महत्व‘ सांगितले जाते. जेव्हा काही समजतही नव्हते, तेव्हासुद्धा देवासमोर उभं करून हात जोडायला शिकवले जायचे. थोडे समजायला लागल्यावर “बाप्पाला सांग मला चांगली बुद्धी दे”, असं बोलायला शिकवले. आणखी थोडे समजदार झाले तेव्हा स्वतःला जमेल, पटेल तशी प्रार्थना करायला लागलो. या प्रार्थनेमध्ये मनाला शांत करण्याची अमाप शक्ति आहे. म्हणून आयुष्यात कोणतेही संकट आले की मनुष्य ईश्वराच्या दारी धाव घेतो.

11-29
09:20

Recommend Channels