# 1889: उत्सवाचं रसायन. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Update: 2025-11-03
Description
अगदी आदिमानवाच्या काळापासून उत्सव ही माणसाच्या मनाची गरज आहे. आदिमानव शोधीपारधी होता. अन्नाच्या, शिकारीच्या शोधात वणवणताना त्याला सगळीकडून शत्रूंचं, संकटांचं भय असे. त्या वेगवेगळ्या संकटांवर लक्ष ठेवायची जबाबदारी त्याच्या मेंदूतल्या एका केंद्राची होती. ते मेंदूच्या बुडाशी असलेलं बदामाच्या आकाराचं केंद्र (Amygdala) सतत धोक्याची घंटा वाजवत राही. मेंदूच्या इतर सगळ्या कर्त्याकरवत्या केंद्रांचं लक्ष नेहमी त्या बदामकेंद्रावरच खिळून असे.
Comments
In Channel



