# 1892: मोल नेहमीच पैशात नसतं...! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Update: 2025-11-07
Description
फळवाल्या म्हातारीला कृष्ण म्हणतो, "ती सगळीच फळं मला दे. "
म्हातारी आनंदली. म्हणाली, " हो हो देईन बाळा, पण मोल द्यावं लागेल."
कृष्ण निरागसपणे विचारतो, "मोल म्हणजे काय ?"
त्यावर ती समजावून सांगते, "लल्ला, आपण जेव्हा कोणाकडून काही घेतो, तेव्हा त्याच्या बदल्यात काही तरी देतो, त्यालाच मोल म्हणतात."
कृष्णाचं बोलणं मोठं गोड आणि मन मोहून घेणारं आहे. तो तिला म्हणतो, "माझी आई तर मला रोज दही, दूध, लोणी देते. मला हवं ते सगळं सगळं देते. पण माझ्याकडून कधी काही घेत नाही. मग ती मोल का मागत नाही? गोपी सुद्धा मला दही दूध लोणी देतात माझ्यावर खूप प्रेम करतात पण त्या माझ्याकडून काही घेत नाहीत. "
Comments
In Channel




